माझ्या इंग्रजी कविता

मित्रांनो, माझ्या काही इंग्रजी कविता/ लेख indian blog world वर प्रसिध्द झाले आहेत. कृपया ते जरूर वाचावे व प्रतिक्रिया द्याव्या. याने लिहिण्याचा आनंद मिळतो. आपल्यातील लेखक/ कवी चांगले विचार मांडण्यासाठी प्रवृत्त होतो. तर मग जरूर वाचा अशी आग्रहाची विनंती.

http://indianblogworld.com/2010/11/the-eyes/

http://indianblogworld.com/2010/11/life-clock/

तू आता ये रे बाबा!

आपणाकडे पाहुणे येत असतात. काही पाहुणे हवे हवेसे असतात तर काही नको नकोसे. काही पाहुणे नवऱ्याच्या आवडीचे असतात तर काही बायकोच्या. अहो, जर आपला मेव्हणा घरी आला तर तो आपल्याला २-३ दिवस बारा वाटतो. नंतर कबाब मी हड्डी होतो. तसेच बायकोचे असते. तिच्या माहेरच कोणी आल तर विचारायलाच नको. पण आपल कोणी आल तर कपाळावर ……. जाऊ द्या ते. पण एक पाहुणा अगदी नकोसा झाला आहे बघा.

अहो, पाऊस. जून मध्ये तो येतो आणि दिवाळी संपली तरी चिपकुनच बसलेला असतो. जायचे नावच घेत नाही. असे मागच्या ४-५ वर्षापासूनच चालले आहे. त्यापूर्वी तो अगदी वेळेवर यायचा आणि वेळेवरच जायचा. पण आता?

अहो देवाला सकले घालावे लागते त्याला जा म्हणण्यासाठी अशी परिस्थिती आहे. आता बघा नोव्हेंबर संपायला आहे पण तो काही केल्या जायला जायला तयार नाही. ह्याचे कारण काय? ग्लोबल वार्मिंग दुसरे काय. अजून हि आपण डोळे उघडले नाही तर काही दिवसांनी तो वर्ष भर येत राहील. त्या गोऱ्यांच्या देशा सारखा.

आताच आपणाकडे पिकांचे नियोजन बदलायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून नियोजन केले नाही तर असेच शेतमालाचे नुकसान होत राहणार.

मी तर मागच्या ३-४ वर्षापासून मित्रांना सांगत आलो आहे कि आता निसर्ग बदलला आहे.  आता पिक घेण्याची वेळ बदलावी लागेल. अन्यथा आपले काही खरे नाही. कारण आपण ग्लोबल वर्मिन्ग्कडे कानाडोळा करीत आहोत.

अनोखी माणसं

जगामध्ये वेगवेगळी माणस आपल्याला दिसून येतात. पण त्यातील काही जगावेगळी असतात. असे काही रिपोर्ट्स टी. व्ही. वर येत असतात कि डावखुरी माणस खूप पुढे जातात. आपला अमिताभ बच्चन आणि हो सचिन तेंडूलकर हे डावखूरेच आहेत कि.  अहो जगात असे मोठी डावखुरी मानस खूप आहेत. यात बिल क्लिंटन व जॉर्ज बुश यांचा हि समावेश आहे. खात्री करायची असेल तर ह्या साईटला भेट द्या. Left Handed Celebrities

आता मी माझ्या खऱ्या मुद्दावर वळतो. नुकतेच आपल्या देश्याला  एका दबंगाने भेट दिली.अहो तेच ते अमेरिकेचे राष्ट्रपती श्रीमान बराक ओबामा.  त्यांनी आपल्या देशाचा खूप धसका घेतला असावा असे वाटते कारण त्यांनी आपल्या देशाची  मन भरून स्तुती केली.

असो, माझा मुद्दा वेगळाच आहे. आपल्या पैकी कोणी तरी ओबामांकडे बारकाईने लक्ष दिले का? दिले असेल कदाचित. नसेल तर मी त्यांच्या एका जगावेगळ्या खुबी कडे आपण सर्वांचे लक्ष वेधू इच्छित आहे. मी आता पर्यंत ओबामान्सारख्या पद्धतीने लिखाण करणारा एक हि मनुष्य बघितलेला नाही. ते वेगळ्याच पद्धतीने लिहितात. ह्या चित्रात बघा.

डाव्या हाताने लिहितात.  पण संपूर्ण पंजा वरच्या बाजूला करून वरून पेन खाली आणून मग लिहितात. मी तरी आता पर्यंत अशा पद्धतीने लिहिणारी व्यक्ती बघितली नाही.

कायापालट

कायापालट  कोणाचा हि होऊ शकतो. जसे एखादा वाईट सवयी असलेला मनुष्य सद्गुणी माणसांसोबत राहू लागला कि त्याच्यात बदल घडून येतो. म्हणजे त्याचा कायापालट झाला असे म्हटले जाते.  एखादा गरीब मनुष्य लॉटरी लागली आणि त्याच्या कडे खूप पैसा आला  तेव्हा ही आपण त्याचा कायापालट झाला असे म्हणायला हरकत नाही.

येथे मी नद्यांचा कायापालट झालेला दाखविणार आहे. नदी आणि नाला ही नावं उच्चारता बरोबर आपल्या डोळ्यासमोर त्यांची चित्रं उभी राहतात. मोठ पात्र दिसत ती नदी आणि छोटस पात्र दिसते तो नाला अस आपण म्हणतो. नदीची लांबी जास्त असते पण नाला अगदी थोड्या अंतरापर्यंत जातो आणि आपल स्वतंत्र अस्तित्व हिरावून बसतो. कारण तो मोठ्या नदीला मिळालेला असतो. एखाद्या नदीच चित्रं आपण पाहू. या शेजारच्या चित्रात आपल्याला दोन नद्याचा

संगम दिसत असेल. नदी थोडी मोठी झाली कि ती या दुसऱ्या चित्राप्रमाणे दिसते.

येथे एक नदी व त्यावरील पूल दिसून येतो. हे चित्र एका नदीच आहे असे पाहताक्षणी वाटते.

पण हल्ली नद्यांचे दिवस सुध्दा पालटले आहेत हे आपल्याला ह्या तिसऱ्या चित्रावरून दिसेल. येथे नदीच पात्र बघा किती सुंदर

दिसत आहे. प्रथम दर्शनी ती नदी आहे असे वाटत नाही. पण तुम्हाला ठाऊक नसेल ती नदीच आहे. ती पुणे शहरातून वाहणारी नदी आहे जिची कायापालट झाली असून आता तिने असे वस्त्र परिधान केले आहे. काही लोकांना नदीचे हे रूप पसंद पडत नाही. ते या नदीला नाव ठेवतात. अहो सर्वांचे दिवस पालटतात मग नदीचे का नको.असो नदीचे हे अनोखे रूप मला तरी खूप आवडले आहे.

नदीचा कायापालट

दिवाळीची संध्या

मी  देवाला प्रार्थना करतो है कि
हे ईश्वारा माझ्या सर्व ब्लोग मित्रांना व

सर्व देशवाशीयांना

गजाननाची   सिद्धी
लक्ष्मी ची  वृद्धि,
चाणक्यची  बुद्धि,
विक्रमादित्य चा  न्याय,
हरिश्चन्द्र ची  सत्यता,
मीरा ची  भक्ति,
कुबेराची संपत्ती,
गंगेसारखी  पवित्रता,
मातेची  ममता

लाभू दे.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ही दिवाळी व नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे व समाधानाचे जावो हीच इच्छा

 

 

 

ह्या दिवाळीला आपणा सर्वांना निमंत्रण आहे. फराळ तयार आहे. जरूर यावे.