माझा नवीन ब्लॉग

नव वर्षाचे निमित्त साधून मी एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. जे माझे आवडते आणि वाचनीय ब्लॉग आहेत त्या सर्वांना मी माझ्या ब्लॉग वर एकत्र आणून ‘ब्लॉग कल्लोळ’ सुरु केला आहे.  याचा उपयोग एकाच कि आपणाला एकाच ब्लोगवर येऊन सर्व ब्लॉग वाचता येतील.

मला हे ब्लॉग वाचणे जमत नसायचे. यावरूनच मला हि कल्पना सुचली. मी माझ्या मित्रांना न विचारता त्यांच्या ब्लॉगला लिंक दिली आहे. याबद्दल मी त्यांचे सर्वांची आधीच माफी मागतो. मी येथे त्यांची कोणतीही पोस्ट/ लेख चोरी केलेला नाही. त्यामुळे प्रश्न उद्भभावात नाही.

असो जरूर बघा आणि वाचा.

 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

मी तयार केलेले ग्रीटिंग-१

माझी कविता मी काढलेल्या फोटोवर मीच लिहिलेली

हे पण मीच तयार केले आहे.

योग गुरु स्वामी रामदेव!

पतंजली योगपीठाचे सर्वेसर्वा स्वामी रामदेव यांचे नावलौकिक आता जगभर पसरले आहे. आणि त्यांच्यामुळेच योग्क्रीयेच नाव सुध्दा जगभर प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय बाबांनी आयुर्वेदिक उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. ह्याचे मला कौतुक करावेसे वाटते. ३-४ वर्षपूर्वी मला जेव्हा समजले मी स्थानिक केंद्राकडे गेलो आणि तपास केल्यावर आयुर्वेदिक बिस्कीट सुद्धा उपलब्ध होते. तेव्हा पासून घरी त्यांचेच बिस्कीट वापरतो. अंघोळीचे साबण त्यांचेच. दंत-पेस्ट जेव्हापासून उपलब्ध झाला त्यांच्याच कडून आणला. आता तर टूथ ब्रश सुध्दा उपलब्ध आहे.

काल केंद्रावर गेलो काही साहित्य घेतले. आणि केरी बेग मागितली तर त्यांनी मला वर्तमानपत्राने तयार केलेली केरी बेग दिली. अप्रतिम बेग आहे ती तिचा फोटो येथे टाकत आहे. मला कधी हि अस्वस्थता वाटली मनात चल बिचल होत असेल तर मी २ मिनिटे दीर्घ श्वसन करतो. लगेच बरे वाटायला लागते. जमेल  तेव्हा प्राणायाम करताच असतो.

कला

कला हा एक दैवी गुण आहे. प्रत्येकालाच कला येते असे नाही. माझे वडील गणपतीची हुबेहूब मूर्ती स्वतःच्या हाताने बनवायचे. ठशाच कोठेही वापर करीत नसत. मी स्वतः लहान असंतांना चित्रकला करीत असे.  घराची परिस्थिती नसल्याने रंग काम करणे शक्य झाले नाही.

मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेत माझ्याच हातचे पोस्टर भिंतींवर लावलेली असायची. सुभाषिते आणि मी साइंस चा विद्यार्थी असल्याने भौतिक रसायन आणि गणिताची हि चित्रे तयार करून भिंतीवर लावली जात असत. बाकायदा प्राचार्यांच्या परवानगीने बर का? प्राचार्यांचा मी लाडका होतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि गणिताची कोणती चित्र लावली जात असावी? अहो ती प्रमेय असायची न ती. इतकेच नाही तर शाळेच्या वार्षिक प्रदर्शनात गणिताच्या प्रमेयांची थ्री डी प्रतिकृती सुध्दा मी करीत असे. ती विद्यार्थ्यांना समजायला सोपी जात होती. अर्थात याचे श्रेय माझ्या गणिताच्या प्राध्यापकांना जाते. कारण त्यांनी मला ती मोडेल्स तयार करण्याची कल्पना दिली होती.

मागच्या बऱ्याच वर्षांपासून मी वेळ मिळत नसल्याने स्केचीन सोडून दिले आहे. पण माझी सुकन्या स्केचिंग करते. तिचा हि ब्लॉग आहे. नाव आहे ‘थोडेस मनातले’. त्यावर तिने केलेली स्केचेस टाकली आहेत. पण काळ तिने जे स्केच तयार केले ते मला अतिशय आवडले म्हणून तिचे कौतुक करावेसे वाटले म्हणूनच हा प्रपंच.

तिचे स्केच येथे टाकत आहे. बघा तर. यात डोळ्यांवर जास्त लक्ष केंद्रित करा. कारण डोळे बोलके आहेत. अप्रतिम स्केच आहे.

 

पेठे काकांनी तिला बोलावले होते पण ती गेली नाही. एखादे दिवशी तिला त्यांच्या क्लास ला घेऊन जावे लागेल.

 

 

 

 

 

 

 

मैत्री

 

मैत्री- एक अतूट नाते. होय मैत्री हे एक अतूट नाते आहे. लहानपणापासून अनेक मित्र आपल्या जीवनात येत जातात. काही फक्त मित्र असतात तर काही जीवनभराचे मित्र असतात. सुख-दुखात सोबत करणारे मित्र असतात. जसजसे आपण मोठे होत जातो तसे नाव नवीन मित्र आपल्या जीवनात येतात. काही आठवणीत राहून जातात तर काहींच्या आठवणी येतात पण ते भेटत नाहीत. मला आज ही माझ्या बालपणी म्हणजे री-रीत असतांना एक-दोन मित्र होती, त्यांचे चेहरे आठवतात.

नंतर नौकरीला लागल्यावर सहकार्यांपैकी काहींची खूप जवळीक होते. तसेच शेजारी-पाजारी, आणि कामावर सोबत जाणारे-येणारे मित्र तयार होतात.

मी १९८५ मध्ये मुंबई मध्ये नौकरीला लागलो तेव्हा पासून कल्याणमध्ये राहत असल्याने व्ही.टी. म्हणजे आताचे शिवाजी टर्मिनस येथून रोज सायंकाळी ६.०३ ची कसारा लोकल पकडायचो. कायम एकाच जागी बसत असल्याने ग्रुप तयार झाला होता. जवळ जवळ १० वर्ष तो ग्रुप होता. नंतर बदली झाल्याने मी बाहेर पडलो. १९९६ मध्ये पत्नीच्या आजारपणाने आम्ही नाशिकला स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. आणि माझा मुंबई नाशिक प्रवास सुरु झाला.

साभार-गुगल इमेज

नाशिक-मुंबई पास मिळत होता आणि एक बोगी पासधारकांसाठी होती हे समजल्यावर मी त्या बोगीने प्रवास करायचे ठरविले. पहिल्याच दिवशी ज्या जागेवर बसलो होतो तेथे ग्रुप असल्याने व देवळाली केम्पला नेहमीची मंडळी चढल्याने त्यांनी मला उठवून दिले. मला ग्रुपचा अनुभव असल्याने व माझ्या सहनशील स्वभावधर्मामुळे मी सहज उठून उभा राहिलो. सोमवारी पंचवाटी एक्सप्रेसला खूप गर्दी असायची. काही काळाने ज्या गृहस्थाने मला उठविले होते, त्यांनीच मला बसायला चौथी शीट दिली. मी ही बसलो.

पुढच्या सोमवारी पुनः त्याच जागेवर गेलो. पुनः तेच झाले. मी धीट असल्याने ठेठेच उभा राहिलो आणि त्यांनी मला जागा दिली. मग बोलचाल सुरु झाली. आणि पाहता पाहता मी ग्रुपचा सदस्य झालो. ज्या सद्गृहस्थानी मला उठवून दिले होते तेच माझे परम मित्र झाले.

नंतर माझी नाशिकला बदली झाली आणि तोही ग्रुप तुटला. नंतर नंतर त्या आमच्या ग्रुपमध्ये २०-२५ सदस्यांपैकी ३-४ सदस्य उरले. जेव्हा-जेव्हा मी ट्रेन ने मुंबईला कामानिमित्त प्रवास करायचो तेव्हा त्याच जागेवर जाऊन बसल्याशिवाय चैन पडत नसायची.

आज मी पुण्यात आहे. त्या परम मित्राचा फोन आला नाही तर मला मनात असे वाटायला लागते कि ते मला विसरले असावेत. किंवा माझे काही तरी चुकले असावे म्हणून त्यांना राग आला असावा. मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्यांचा फोन नव्हता म्हणून २-३ दिवसांपासून मनात शंका कुशंका घर करीत होत्या. आणि काल दुपारी अचानक त्यांचा फोन आला. मी फोन घेतला आणि त्यांना एकच बोललो कि तुम्हाला निरोप पोहोचला वाटते? ते आश्चर्य चकित झाले आणि नाही म्हणाले. थोड्यावेळाने त्यांच्या लक्षात आले कि मी काय म्हणायचं प्रयत्न करीत आहे. ते म्हणजे ‘टेलीपेथी’.

झाले असे कि मी इकडे त्यांची आठवण कधीत होतो आणि त्याच वेळी ते ही माझी आठवण कधीत होते. त्यांना ही २-३ दिवसांपासून मला फोन करायची इच्छा होत होती. हीच टेलीपेथी आहे.

आपल्या परम मित्र किंवा परम स्नेहींची आपण आठवण केली मनापासून केली तर आपल्या मनातील तरंग किंवा संदेश त्या व्यक्ती पर्यंत जरूर जरूर पोहोचतो. हा अनुभव मी कित्तेक वेळा घेतला आहे. मात्र तुम्ही निस्वार्थीपणे त्या व्यक्तीची आठवण काढायला हवी.

आपले वाडवडील आपल्याला सांगत असतात कि जेवण करतांना ठसका लागला किंवा इतर वेळा हिचकी लागली कि कोणीतरी आठवण काढतंय. त्यांचे असे म्हणणे हे ‘टेलीपेथी’. चेच उदाहरण नाही का म्हणता येणार?

तुंम्हाला असा अनुभव आला असेल तर प्रतिक्रियेत जरूर नमूद करा. वाचून मला आनंदच होईल.

आणि नसेल तर प्रयत्न करून पहा.

 

 

 

हा कसला परिणाम?

 

ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरातील वातावरणावर परिणाम झाला आहे हे आपण दररोज वाचत आणि बोलत आहोत. पावसाळा हल्ली जवळजवळ ६ महिने असतो. अवकाळी पाऊस येऊन बरेच नुकसान करून जातो. मग थंडी पडते आणि ती हि रेकोर्ड तोडते. या वर्षी म्हणे पहिल्यांदाच पेरिस मधील आयफेल टॉवरच्या परिसरात बर्चाची पंढरी चादर

साभार: गुगल

पसरली आहे.

 

आपणाकडे थंडीने कहर केला आहे. काळ पुण्याचे तापमान ६.५ डिग्री होते. नाशिक ५.९ वर स्थिरावले होते. वर्धा सर्वात थंड म्हणजे ४.५ डिग्री होते. पण मूळ मुद्दा वेगळाच आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणवले जाणारे महाबळेश्वर १५ डिग्री वर स्थिरावले होते. मागील काही वर्ष पासून मी या गोष्टी कडे लक्ष ठेऊन आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आता उष्ण झाले आहे. आणि नाशिक पुणे त्यापेक्षा थंड झाले आहे. हे कसे

साभार: गुगल

काय? याला कश्याचा परिणाम म्हणायचे.

 

 

 

पूर्वी उन्हाळ्यामध्ये थंड हवेसाठी पर्यटक महाबळेश्वर येथे जात असत. मला वाटते आता हिवाळ्यात सुध्दा उष्णतेसाठी पर्यटकांना महाबळेश्वर येथे जावे लागेल. बरोबर. चला तर मग महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी जाऊ या आणि थंडीपासून आपले संरक्षण करू या!

कळस

( दिवाळीत श्रीयुत प्रमोद देव म्हणजे बाझाकारांचे देवकाका यांनी दीपज्योती हा अंक प्रकाशित केला होता. त्यात माझी एक हास्य कथा प्रकाशित झाली होती. ती मी येथे माझ्या ब्लॉग मित्रांसाठी प्रशिध्द करीत आहे.)

आज दिवाळी असल्याने सुनिधी स्वयंपाक घरात सकाळ पासूनच व्यस्त होती. त्यामुळे ती खूप थकली होती. काय करीत होती ह्याचा उलगडा सुमितला काही केल्या होत नव्हता. त्याला वाटले ती एव्हढा काय स्वयंपाक करीत आहे. ( स्वयंपाक घरात दुसर काय करणार त्याला असे वाटले). अचानक तिने तिचा अर्धांगिन(बायकोला अर्धांगिनी म्हणतात मग नवऱ्याला काय म्हणतात हे मला माहित नाही बर का! त्यावरून मी हा शब्द तयार केला आहे.) सुमितला ओरडून आवाज दिला, अरे सुमित, हे बघ मला जरा एका ताम्ब्यामध्ये पाणी आणून दे बर!

सुमित हॉल मध्ये टी.व्ही. वर बातम्या ऐकून ऐकून कंटाळा येऊन झोपी गेली होता.( माणसांना दुसर काय येत म्हणा.). त्याला तिचा आवाज काही ऐकू आला नाही. तिने काही क्षण त्याची वाट पाहिली. पण तो न आल्याने ती चिडली आणि दिवाणखान्यात येऊन त्याच्यावर खेकसली, अरे मी तुला एव्हढे ओरडून बोलावीत आहे. ऐकायला येत नाही का तुला.तो खडबडून जागा झाला. अग, काय झालं एव्हढे ओरडायला. तो थोडा नारामैनेच बोलला, कारण त्याने तिचा रागरंग ओळखला होता.

अरे, माझे हात बघ आणि मी पाणी घेऊ शकते का अशा हातांनी याचा जरा विचार कर.

काय झाले तुझ्या हातांना? भाजले गीजले नाही न! नाही तशी अपेक्षा ही करीत नाही. पण ते आपल सहज विचारलं. त्याने थोडी थट्टा करून तिचा मुद् बदलेल असा विचार करून म्हटले.

काय अपेक्षा काय आहे तुझी? माझा हात भाजावा असे वाटते काय तुला? ती रागेरागे म्हणाली.

अरे देवा मी मिस्कीलीने म्हणालो आणि हिला तर ते जास्त वाईट वाटलेलं दिसते आहे. आता काय करावे? हा प्रश्न त्याला पडला.

ती पुनः त्याला म्हणाली,अरे मी तुला पाणी भरून तांब्या मागते आहे तो मला किचन मध्ये आणून दे पटकन. ती परं ओरडून म्हणाली आणि तो ताडकन जागेवरून उतला. त्याला उठतांना बघून ती सुध्दा पाय आपटत किचन मध्ये गेली.

सुमितने किचन मध्ये जाऊन तांब्या शोधायचा प्रयत्न केला पण त्याला तांब्या कोठे ठेवला जातो हे काही ठाऊक नव्हते. तो अगदी हळू आवाजात म्हणाला नव्हे पुटपुटला, अग, आपण तांब्या कुठे ठेवतो?

तिने ते ऐकले आणि म्हणून म्हणते मी जरा बायकोच्या कामाला हातभार लावत चल.

हे काय मी हातभारच लावतो आहे न!

हा लावला. घरातल्या वस्तू कोठे ठेवतो ते विचारणारा माणूस घर कामात बायकोला हातभार लावत असेल हे शेंबड्या मुलाला तरी पटेल का? अरे बाळा जरा इकडे ये बर हे काका काय म्हणता आहे बघ! तिने किचन मधील खिडकीतून बाहेर डोकावून रस्त्यावरील लहान मुलाला हाक मारली. आणि सुमित धावतच तिच्या जवळ गेला आणि,अग असे काय करीत आहे. कशाला कोणाला बोलावून माझे धिंडवडे काढतेस. हा बघ मी तांब्या घेऊन आलो. तो आता आपली पंचाईत होणार असे वाटल्याने तिची विनवणी करू लागला.

ती म्हणाली, आता आला न लाईनवर. नवऱ्याला आपल्या मुठीत असे ठेवावे ह्याची शिकवणी घ्यायला सुरुवात करावी असे मला वाटते.

त्याने तिला हात जोडले आणि म्हणाला,अग बाई तुला कसली शिकवणी घ्यायची आहे ती घे पण मला आता येथून बाहेर जाऊ दे. कळस झाला आहे अगदी. तो वैतागून म्हणाला.

हो काय, कळस? आज दिवाळीचा सन आहे नाही तर मी कळस नक्कीच गाठला असता.

त्याने तिचे ते रौद्र रूप पाहून पुनः माघार घेतली आणि, अग, तुला नाही म्हनालो मी. मी तर स्वतःला कळस गाठला असे म्हणालो.

अजून काही नाही जरा ही दिवाळी सुरळीत पण पार पडू द्या मग दिवाळ काढून कळस गाठते कि नाही ते बघा.

आणि त्याचा उतरलेला चेहरा बघून ती हसायला लागली.अरे हे काय रे सुमित मी तुझी थट्टा केली. तू उगाच आपला घाबरून गेला. मी काहीही मागणार नाही रे तुला. चल आता दिवाळीची तयारी जवळ जवळ झालीच आहे, आता जा तू. आणि त्याने सुटकेचा स्वास घेतला.

आम्ही धन्य झालो!

हल्ली संपूर्ण जागा मध्ये ज्याचा बोलबाला आहे, ज्याने जगाला हादरवून सोडले आहे आणि ज्याला सर्व उच्च पदस्त घाबरतात तो म्हणजे ‘विकीलीक्स’. हा विकीलीक्स आज माझ्या इंग्रजी ब्लॉग ‘My Blog’ वर कसा झळकला देवच जाणे.

झाले असे कि मी रोजच्या कुतूहला प्रमाणे वर्डप्रेस मध्ये शिरलो आणि आपले विविध ब्लॉग चे स्टेट्स कसे आहेत हे तपासायला घेतले. तेव्हा इंग्रजी ब्लॉग च्या स्टेट्स मध्ये एक लिंक दिसली कि ज्यावरून कोणीतरी आपल्या ब्लॉगला विजीट केले असते. ती लिंक विकीलीक्स ची होती. मी त्या लिंकवर गेलो तर तेथे माझ्या ब्लॉग ची कोणतीच लिंक दिसली नाही. किंवा नाव सुध्दा दिसले नाही. मला  असा रीफरेंस कसा आला हे कळले नाही.

असे बऱ्याचदा होते. कोणी तरी ह्या गोष्टीवर प्रकाश टाकेल का?

मला समजावेल का?

मी सोबत त्या लिंक ची इमेज देत आहे. वाचता आली नाही तर कृपया इमेज सेव करून मोठी करून पहावी.

गाजर हलवा

प्रत्येकाचा हात पेंटच्या खिश्याकडे जातांना दिसत आहे. तोंडाला सुटलेले पाणी म्हणजेच लाळ तोंडातून बाहेर पडायला करतेय कि नाही. असेच होते खायच्या पदार्थाचे नाव जरी काढले कि तोंडाला पाणी सुटते, पोटात भूक लागते आणि मन विचलित होऊन जाते.

याचाच फायदा काही लोकं घेतात आणि आपल्याला फसवतात. मग ते फक्त खायच्याच पदार्थ असेल असे नाही. इतर बाबतीत हि असेच होत असते. आपल्या मानसिकतेचा

साभार- गुगल

फायदा काही मंडळी घेत असतात.

माझ्या ह्या पोस्टचे हेडिंग गाजर हलवा जरी असले तरी मी तुम्हाला काही गाजर हलवा करून खायला निमंत्रित करीत नाही. एक गम्मत सांगायची आहे.

बऱ्याच वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. आम्ही नाशकात राहत होतो. कन्या बरीच लहान होती. गणेश उत्सव सुरु होता. गल्लोगल्ली गणपतीचे  देखावे सजवलेले  होते. सुटी असल्याने रात्री मी घरच्यांना गणपती बघायला घेऊ

न गेलो.

एका देखाव्या जवळ खूप गर्दी होती. लहान मुल ओरडत होती. ५ रुपयात गाजर हलवा-५ रुपयात गाजर हलवा.

साभार-गुगल

 

अहो ओळीने लोकं उभी होती आणि आतुरतेने आपला नंबर येण्याची वाट बघत होती. प्रत्येकाला स्वस्तात गजर हलवा मिळत असल्याचा आनंद होत होता.

एक गोष्ट माझ्या निदर्शनास येत होती. आत जाऊन आलेली मानस बाहेर येत नव्हती.  बारकाईने निरीक्षण केल्यावर दिसले कि त्यांना बाहेर येण्याचा मार्ग लांब कोठे तरी होता.

आम्ही सुध्दा ५-५ रुपयाप्रमाणे तिकीट घेतले आणि आत प्रवेश केला. आणि पाहतो तर काय. आत एका सुतळीला  एक गाजर टांगलेले होते. तेथे एक मुलगा उभा होता. तो म्हणाला गजर हलवा. म्हणजे तहाने टांगलेल्या गाजराला हलवा. आमचा चांगलाच पोपट झाला होता. आमचाच नव्हे प्रत्येकाचाच पोपट केला होता त्या लहानग्यांनी. आमची हसून हसून धूम झाली होती.

विकतचे दुखणे……

माणसाला वातावरणातील बदलाणे किंवा आणखी काही कारणाने आजारपण येतच असते. पण कधी कधी बाहेरचे काही खाल्ल्याने आजार येतो. असा अनुभव मी उपभोगत आहे.

झाले असे कि काल कन्येची सेट ची परीक्षा होती. तिला सेंटरवर सोडून घरी आलो. परीक्षा दिवसभर होती.  मधला लंच टाईम २ तासाचा होता. तिची जेवणाची व्यवस्था काय? म्हणून आम्ही दोघे हि सेंटरवर गेलो. आणि म्हटले कधी मुलगी आणि सौ. ह्या हॉटेलात जेवणाला येत नाहीत मग आता तशी वेळ आली आहे तर घेऊन जाऊ यांना जेवणाला. शोधून शोधून थकलो. जवळ पास कोठेच चांगले होटेल सापडले नाही.

खूप शोधल्यावर एक डायनिंग हॉल सापडला. खूप छान होता. दर सुध्दा खूप जास्त होते. म्हटलं येथील जेवण खुपच चांगले असेल. आपल्याकडील मानवाची हि समाज झाली आहे कि जी वस्तू महाग असते ती चांगली असते. महागडा डॉ. चांगला इलाज करतो. महागड्या हॉटेलचे जेवण अतिशय चांगले असते. त्यामुळे मी तेथे जेवण करण्यासाठी यांना घेऊन गेलो.

अनलिमिटेड जेवणं होत. पण आपल जेवण काय तर दोन पोळ्या थोडी भाजी बस. सोबत स्वीट म्हणून जिलेबी होती. त्यतील दोन पीस खाल्ले. आणि रबडी हि होती. ती आवडली म्हणून २-३ वाट्या खाल्ल्या. आणि पोट भरलं? अहो भरलं नाही जास्त झाल.

घरी येईस्तोवर हात पाय गळून गेल्यासारखे झाले. अस्वस्थता वाढली. आणि सायंकाळी ७ च्या दरम्यान वांती होऊन सर्व बाहेर पडल. तेव्हा थोडं बर वाटायला लागलं. रात्री जेवण केल नाही. रात्री सौ. म्हणाल्या कि ती रबडी सीताफळाची होती. अग, बाई तेव्हा काय झाले होते सांगायला. मी उत्तरलो.

अहो त्या रबडी मुलेच तुम्हाला त्रास होत आहे.

बरोबर आहे ग बाई तुझ.

आणि रात्री काय तर जुलाब सुरु झाले. रात्र भर हैराण झालो. कमजोरी एव्हडी वाढली आहे कि चालणे कठीण वाटत आहे. ऑफिस जाणे आवश्यक आहे. पण सुटी घेता येत नाही. सुट्या शिल्लक आहेत. पण नाही घेता येत. त्या आता वाया जातील.

शेवटी हे विकतचे दुखणे घेऊन आल्या सारखे झाले आहे बघा.

आता कान पकडले. बाहेरचे जेवण करायचे नाही.

तसे मला सुरुवाती पासूनच बाहेरचे जेवण अगर काहीही आवडत नाही.