मैत्री


 

मैत्री- एक अतूट नाते. होय मैत्री हे एक अतूट नाते आहे. लहानपणापासून अनेक मित्र आपल्या जीवनात येत जातात. काही फक्त मित्र असतात तर काही जीवनभराचे मित्र असतात. सुख-दुखात सोबत करणारे मित्र असतात. जसजसे आपण मोठे होत जातो तसे नाव नवीन मित्र आपल्या जीवनात येतात. काही आठवणीत राहून जातात तर काहींच्या आठवणी येतात पण ते भेटत नाहीत. मला आज ही माझ्या बालपणी म्हणजे री-रीत असतांना एक-दोन मित्र होती, त्यांचे चेहरे आठवतात.

नंतर नौकरीला लागल्यावर सहकार्यांपैकी काहींची खूप जवळीक होते. तसेच शेजारी-पाजारी, आणि कामावर सोबत जाणारे-येणारे मित्र तयार होतात.

मी १९८५ मध्ये मुंबई मध्ये नौकरीला लागलो तेव्हा पासून कल्याणमध्ये राहत असल्याने व्ही.टी. म्हणजे आताचे शिवाजी टर्मिनस येथून रोज सायंकाळी ६.०३ ची कसारा लोकल पकडायचो. कायम एकाच जागी बसत असल्याने ग्रुप तयार झाला होता. जवळ जवळ १० वर्ष तो ग्रुप होता. नंतर बदली झाल्याने मी बाहेर पडलो. १९९६ मध्ये पत्नीच्या आजारपणाने आम्ही नाशिकला स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. आणि माझा मुंबई नाशिक प्रवास सुरु झाला.

साभार-गुगल इमेज

नाशिक-मुंबई पास मिळत होता आणि एक बोगी पासधारकांसाठी होती हे समजल्यावर मी त्या बोगीने प्रवास करायचे ठरविले. पहिल्याच दिवशी ज्या जागेवर बसलो होतो तेथे ग्रुप असल्याने व देवळाली केम्पला नेहमीची मंडळी चढल्याने त्यांनी मला उठवून दिले. मला ग्रुपचा अनुभव असल्याने व माझ्या सहनशील स्वभावधर्मामुळे मी सहज उठून उभा राहिलो. सोमवारी पंचवाटी एक्सप्रेसला खूप गर्दी असायची. काही काळाने ज्या गृहस्थाने मला उठविले होते, त्यांनीच मला बसायला चौथी शीट दिली. मी ही बसलो.

पुढच्या सोमवारी पुनः त्याच जागेवर गेलो. पुनः तेच झाले. मी धीट असल्याने ठेठेच उभा राहिलो आणि त्यांनी मला जागा दिली. मग बोलचाल सुरु झाली. आणि पाहता पाहता मी ग्रुपचा सदस्य झालो. ज्या सद्गृहस्थानी मला उठवून दिले होते तेच माझे परम मित्र झाले.

नंतर माझी नाशिकला बदली झाली आणि तोही ग्रुप तुटला. नंतर नंतर त्या आमच्या ग्रुपमध्ये २०-२५ सदस्यांपैकी ३-४ सदस्य उरले. जेव्हा-जेव्हा मी ट्रेन ने मुंबईला कामानिमित्त प्रवास करायचो तेव्हा त्याच जागेवर जाऊन बसल्याशिवाय चैन पडत नसायची.

आज मी पुण्यात आहे. त्या परम मित्राचा फोन आला नाही तर मला मनात असे वाटायला लागते कि ते मला विसरले असावेत. किंवा माझे काही तरी चुकले असावे म्हणून त्यांना राग आला असावा. मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्यांचा फोन नव्हता म्हणून २-३ दिवसांपासून मनात शंका कुशंका घर करीत होत्या. आणि काल दुपारी अचानक त्यांचा फोन आला. मी फोन घेतला आणि त्यांना एकच बोललो कि तुम्हाला निरोप पोहोचला वाटते? ते आश्चर्य चकित झाले आणि नाही म्हणाले. थोड्यावेळाने त्यांच्या लक्षात आले कि मी काय म्हणायचं प्रयत्न करीत आहे. ते म्हणजे ‘टेलीपेथी’.

झाले असे कि मी इकडे त्यांची आठवण कधीत होतो आणि त्याच वेळी ते ही माझी आठवण कधीत होते. त्यांना ही २-३ दिवसांपासून मला फोन करायची इच्छा होत होती. हीच टेलीपेथी आहे.

आपल्या परम मित्र किंवा परम स्नेहींची आपण आठवण केली मनापासून केली तर आपल्या मनातील तरंग किंवा संदेश त्या व्यक्ती पर्यंत जरूर जरूर पोहोचतो. हा अनुभव मी कित्तेक वेळा घेतला आहे. मात्र तुम्ही निस्वार्थीपणे त्या व्यक्तीची आठवण काढायला हवी.

आपले वाडवडील आपल्याला सांगत असतात कि जेवण करतांना ठसका लागला किंवा इतर वेळा हिचकी लागली कि कोणीतरी आठवण काढतंय. त्यांचे असे म्हणणे हे ‘टेलीपेथी’. चेच उदाहरण नाही का म्हणता येणार?

तुंम्हाला असा अनुभव आला असेल तर प्रतिक्रियेत जरूर नमूद करा. वाचून मला आनंदच होईल.

आणि नसेल तर प्रयत्न करून पहा.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s