आम्ही धन्य झालो!

हल्ली संपूर्ण जागा मध्ये ज्याचा बोलबाला आहे, ज्याने जगाला हादरवून सोडले आहे आणि ज्याला सर्व उच्च पदस्त घाबरतात तो म्हणजे ‘विकीलीक्स’. हा विकीलीक्स आज माझ्या इंग्रजी ब्लॉग ‘My Blog’ वर कसा झळकला देवच जाणे.

झाले असे कि मी रोजच्या कुतूहला प्रमाणे वर्डप्रेस मध्ये शिरलो आणि आपले विविध ब्लॉग चे स्टेट्स कसे आहेत हे तपासायला घेतले. तेव्हा इंग्रजी ब्लॉग च्या स्टेट्स मध्ये एक लिंक दिसली कि ज्यावरून कोणीतरी आपल्या ब्लॉगला विजीट केले असते. ती लिंक विकीलीक्स ची होती. मी त्या लिंकवर गेलो तर तेथे माझ्या ब्लॉग ची कोणतीच लिंक दिसली नाही. किंवा नाव सुध्दा दिसले नाही. मला  असा रीफरेंस कसा आला हे कळले नाही.

असे बऱ्याचदा होते. कोणी तरी ह्या गोष्टीवर प्रकाश टाकेल का?

मला समजावेल का?

मी सोबत त्या लिंक ची इमेज देत आहे. वाचता आली नाही तर कृपया इमेज सेव करून मोठी करून पहावी.

गाजर हलवा

प्रत्येकाचा हात पेंटच्या खिश्याकडे जातांना दिसत आहे. तोंडाला सुटलेले पाणी म्हणजेच लाळ तोंडातून बाहेर पडायला करतेय कि नाही. असेच होते खायच्या पदार्थाचे नाव जरी काढले कि तोंडाला पाणी सुटते, पोटात भूक लागते आणि मन विचलित होऊन जाते.

याचाच फायदा काही लोकं घेतात आणि आपल्याला फसवतात. मग ते फक्त खायच्याच पदार्थ असेल असे नाही. इतर बाबतीत हि असेच होत असते. आपल्या मानसिकतेचा

साभार- गुगल

फायदा काही मंडळी घेत असतात.

माझ्या ह्या पोस्टचे हेडिंग गाजर हलवा जरी असले तरी मी तुम्हाला काही गाजर हलवा करून खायला निमंत्रित करीत नाही. एक गम्मत सांगायची आहे.

बऱ्याच वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. आम्ही नाशकात राहत होतो. कन्या बरीच लहान होती. गणेश उत्सव सुरु होता. गल्लोगल्ली गणपतीचे  देखावे सजवलेले  होते. सुटी असल्याने रात्री मी घरच्यांना गणपती बघायला घेऊ

न गेलो.

एका देखाव्या जवळ खूप गर्दी होती. लहान मुल ओरडत होती. ५ रुपयात गाजर हलवा-५ रुपयात गाजर हलवा.

साभार-गुगल

 

अहो ओळीने लोकं उभी होती आणि आतुरतेने आपला नंबर येण्याची वाट बघत होती. प्रत्येकाला स्वस्तात गजर हलवा मिळत असल्याचा आनंद होत होता.

एक गोष्ट माझ्या निदर्शनास येत होती. आत जाऊन आलेली मानस बाहेर येत नव्हती.  बारकाईने निरीक्षण केल्यावर दिसले कि त्यांना बाहेर येण्याचा मार्ग लांब कोठे तरी होता.

आम्ही सुध्दा ५-५ रुपयाप्रमाणे तिकीट घेतले आणि आत प्रवेश केला. आणि पाहतो तर काय. आत एका सुतळीला  एक गाजर टांगलेले होते. तेथे एक मुलगा उभा होता. तो म्हणाला गजर हलवा. म्हणजे तहाने टांगलेल्या गाजराला हलवा. आमचा चांगलाच पोपट झाला होता. आमचाच नव्हे प्रत्येकाचाच पोपट केला होता त्या लहानग्यांनी. आमची हसून हसून धूम झाली होती.

विकतचे दुखणे……

माणसाला वातावरणातील बदलाणे किंवा आणखी काही कारणाने आजारपण येतच असते. पण कधी कधी बाहेरचे काही खाल्ल्याने आजार येतो. असा अनुभव मी उपभोगत आहे.

झाले असे कि काल कन्येची सेट ची परीक्षा होती. तिला सेंटरवर सोडून घरी आलो. परीक्षा दिवसभर होती.  मधला लंच टाईम २ तासाचा होता. तिची जेवणाची व्यवस्था काय? म्हणून आम्ही दोघे हि सेंटरवर गेलो. आणि म्हटले कधी मुलगी आणि सौ. ह्या हॉटेलात जेवणाला येत नाहीत मग आता तशी वेळ आली आहे तर घेऊन जाऊ यांना जेवणाला. शोधून शोधून थकलो. जवळ पास कोठेच चांगले होटेल सापडले नाही.

खूप शोधल्यावर एक डायनिंग हॉल सापडला. खूप छान होता. दर सुध्दा खूप जास्त होते. म्हटलं येथील जेवण खुपच चांगले असेल. आपल्याकडील मानवाची हि समाज झाली आहे कि जी वस्तू महाग असते ती चांगली असते. महागडा डॉ. चांगला इलाज करतो. महागड्या हॉटेलचे जेवण अतिशय चांगले असते. त्यामुळे मी तेथे जेवण करण्यासाठी यांना घेऊन गेलो.

अनलिमिटेड जेवणं होत. पण आपल जेवण काय तर दोन पोळ्या थोडी भाजी बस. सोबत स्वीट म्हणून जिलेबी होती. त्यतील दोन पीस खाल्ले. आणि रबडी हि होती. ती आवडली म्हणून २-३ वाट्या खाल्ल्या. आणि पोट भरलं? अहो भरलं नाही जास्त झाल.

घरी येईस्तोवर हात पाय गळून गेल्यासारखे झाले. अस्वस्थता वाढली. आणि सायंकाळी ७ च्या दरम्यान वांती होऊन सर्व बाहेर पडल. तेव्हा थोडं बर वाटायला लागलं. रात्री जेवण केल नाही. रात्री सौ. म्हणाल्या कि ती रबडी सीताफळाची होती. अग, बाई तेव्हा काय झाले होते सांगायला. मी उत्तरलो.

अहो त्या रबडी मुलेच तुम्हाला त्रास होत आहे.

बरोबर आहे ग बाई तुझ.

आणि रात्री काय तर जुलाब सुरु झाले. रात्र भर हैराण झालो. कमजोरी एव्हडी वाढली आहे कि चालणे कठीण वाटत आहे. ऑफिस जाणे आवश्यक आहे. पण सुटी घेता येत नाही. सुट्या शिल्लक आहेत. पण नाही घेता येत. त्या आता वाया जातील.

शेवटी हे विकतचे दुखणे घेऊन आल्या सारखे झाले आहे बघा.

आता कान पकडले. बाहेरचे जेवण करायचे नाही.

तसे मला सुरुवाती पासूनच बाहेरचे जेवण अगर काहीही आवडत नाही.

अलर्टनेस

मध्यंतरी सकाळी सकाळी आमच्या सोसायटीत आमच्या दारावर एक गृहस्थ येऊन आमच्या शेजाऱ्यांचे नाव विचारू लागले. त्यांच्या हातात एक वाही आणि पेन दिसला. मला वाटले कुरिअर सर्विसचा कोणी तरी असेल. तसे मी त्यांना विचारले ही. ते नाही म्हणाले.

दुपारून मी पुनः इमारतीमध्ये त्या व्यक्तीला व त्यांच्यासोबत आणखी काही लोकांना पहिले. ही कोण लोकं आहेत के काही कळले नाही. घरात गेल्यावर त्याचा उलगडा झाला. सौ.ने सांगितले कि ती लोकं कार्पोरेशनची आहेत.

झाले असे कि आमच्या शेजार्यांचे आई वडील गावाकडून आले होते. त्यांना २ दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यांना गावाकडे चिकनगुनिया झाला होता. पुण्यातील डॉक्टरांनी रक्त तपासल्यावर तो रिपोर्ट कार्पोरेशन कडे गेला होता. त्या आधारावर ती लोकं इमारतीमध्ये काही लागण होऊ नये म्हणून तपासणी आणि फवारणी साठी आली होती. दोन दिवस त्यांनी आमच्या इमारतीसाठी घालविली.

याला अलर्टनेस नाही म्हणायचे तर काय म्हणायचे.

काश अशीच जागृतावस्था सर्वांनी दाखविली तर किती बरे होईल.

या गोष्टीचा मला अभिमान वाटला आणि म्हणूनच पुण्याचा ही मला अभिमान वाटतो.

मनाची भटकंती

मन माझे भटकत आहे

जीवनरुपी विश्वात

संथगतीने हळू हळू

रस्त्याच्या दोन्ही कडे

उगवलेल्या सुखाच्या

झाडांवरून एक एक

सुखाचा दाना टिपत

गोळा करीत आहे

आपल्या झोळीत

एक एक सुख.

असे सुख टिपतांना

कधी कधी

दु:खरूपी कांट्यानी

घेरलेल्या सुखाचा

सामना होतो तेव्हा

असह्य वेदना होतात

पण

त्या वेदना,

सुख टिपण्यासाठी

पडलेले  कष्ट समजून सहज

पेलून घेत आहे हे मन माझे.