लहानपणा पासून मी ऐकत आलोय
सकाळचे स्वप्न खरे असते
पण असे कधी झालेले नाही
कारण मला सकाळी स्वप्नच पडत नाहीत
पण काल सकाळी मला एक स्वप्न पडलं
आणि
माझ कवी मन त्या स्वप्नाने फुलून खूप मोठ झाल
झाले असे कि
स्वप्नात कधी नव्हे ती एक स्वप्न सुंदरी मला दिसली
त्या सुंदरीला पाहून मी होतो त्याच जागी थबकलो
एका क्षणाला मला वाटले कि पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीने
मला लोखंडाचे बनवून खेचून धरले आहे
पण दुसऱ्याच क्षणी मी भानावर आलो
आणि
माझ्या लक्षात आले कि
मी ज्या चुंबकीय शक्तीने खेचलो गेलोय ती
त्या समोरच्या सौंदर्यवतीत आहे.
तिने माझ्या डोळ्याचे पारणे फेडले
असा विचार करतोय तितक्यात मी पाहिले
कि ती लावण्यवती दुसऱ्या-तिसऱ्याकडे नव्हे
तर माझ्या कडेच चालत येत आहे
आणि तेव्हा मला उलगडा झाला
कि चुंबकीय शक्ती पृथ्वीत नाही
त्या ललनेत नाही तर माझ्यातच आहे
आणि म्हणून तर ती अप्सरा माझ्याकडे चालून येतेय
क्षणाक्षणाने ती माझ्या जवळ येत चालली आहे
आणि मी अचंबित होऊन तिचे ते सौंदर्य बघतोय
ती जवळ आली आणि तिने तिचा नाजूक हात
पुढे केला आणि मी माझा हात पुढे केला
हात मिळविण्याला काही क्षण असतांना
अचानक बायकोची डरकाळी कानी पडली
आणि मी माझा हात मागे खेचला
हातच काय मी स्वतःच मागे वळून पळू लागलो
पळता पळता मी झट लागून खाली पडलो
आणि माझे डोळे खाडकन उघडले
मी पाहिले मी खाटेवरून खाली पडलो आहे
आणि बायको तीक्ष नजरेने माझ्याकडे पाहून
जणू प्रश्न विचारते आहे
अहो, अस काय पाहिलं स्वप्नात कि
खाटेवरून खाली कोसळला?
मी काही न बोलता उठलो
आणि दिनचर्येला लागलो.