कांद्याने केला वांधा!


मित्रांनो खरच ह्या कांद्याने येथून तेथून ( म्हणजे गल्ली पासून दिल्ली पर्यंत) सर्वांचा वांधा करून टाकला आहे. आता पर्यंत आपण कांदा फक्त स्त्रियांनाच आणि तेही स्वयंपाक घरातच रडवीत असतो हेच ऐकत आलो आहोत. एके दिवशी हा कांदा संपूर्ण देशाला रडवेल हे कधी काळी कोणाला स्वप्नात ही वाटले नसेल.

कधी पुरुषांनी विचार ही केला नसेल कि विकत घेतांना कांदा आपल्याला रडवेल. पण असे घडत आहे. कालचीच गोष्ट सांगतो. मी बाहेर पाय मोकळे करायला जात असतांना सौ. ने टोकले.

अहो कोठे निघालात?

(आता मी काय उत्तर देणार. कसे सांगू जरा टपरी वर फुंकायला जाऊन येतो.) काहीही न बोलता त्यांच्या मुखकमलाकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले. त्या विनवणी करून म्हणाल्या ( का कुणास ठाऊक पण काही आणायचे असले कि बहुतेक सर्वच गृहिणी विनवणी करीत असाव्या अशी  मला शंका वाटते) बाजारातून एक ………. किलो …….अर्धा ……..नको असे करा पाव किलोच आणा.

अहो काय आणा?

अहो कांदा आणा.

पाव किलो?

मग किती आणता?

तसे नाही पण पाव किलोत किती येईल? ३-४ कांदे येतील कदाचित.

असू द्या हो. तुम्ही फक्त घेऊन या.

मी बाजारात गेलो.  भाव न विचारता (लाजीरवाणे) इकडे तिकडे पाहून दुकानदाराला पाव किलो कांदा दे म्हणून सांगितले.( काय करणार भाव विचाराची हिम्मतच झाली नाही माझी)

त्याने गुपचूप पाव किलो कांदा मोजला आणि मला म्हणाला’अहो साहेब ती पिशवी द्या कि इकडे.’

मी चाट पडलो. अरे मी लाजत लाजत पाव किलो कांदा मागितला पण दुकानदाराने सहज दिला. काहीच कसे बोलला नाही हा. गुपचूप शंभरची नोट काढून दिली आणि त्याने काही तरी पैसे परत दिले ते खिशात कोंबले. त्याला भाव विचारायची आणि परत दिलेल्या पैश्यातून हिशेब करायची माझी हिम्मतच झाली नाही.

पण ह्या दुकानदाराने मला काहीच न बोलता पाव किलो कांदे दिलेच कसे ह्याचा उलगडा होत नसल्याने मी तपारीवरून एक सिगारेट घेऊन जवळच ओढत उभा राहिलो. पावून तास तरी मी उभा राहिलो तेथे. इतक्या वेळात त्याच्या कडे ग्राहक आलाच नाही. मी निघणार तेव्हा एक ग्राहक आला आणि त्याने ही पाव किलो कांदा विकत घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आले कि ग्राहकांनी कांदा खाने कदाचित सोडून दिले असेल किंवा कांदा लागत नसेल असे पदार्थ सिजावत असावेत किंवा कांदा दाखवून भाजी सिजावीत असावेत(कांद्याला उग्र वास असतो न ).

घरी गेल्यावर सौ. च्या हाती पिशवी दिली. आणि विचारले अहो पाव किलो कांद्याचे काय काय करणार? तर त्यांनी काय उत्तर द्यावे. ‘रोज जेवण करतांना त्याचा उग्र वास येईल अशा तऱ्हेने शेजारी ठेवणार. आठवड्यातून दोन वेळा कांदा पोहे करणार आणि त्याच दिवशी मसाले भाजी होईल तेव्हा उरलेला त्या भीत वापरणार. अशा प्रकारे आठवड्याला जास्तीत जास्त दोन कांदे वापरणार.

अरे बाप रे! म्हणून मी टी.व्ही. सुरु केला तर त्यावर ही कांदापुराणच सुरु होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s