महागाईवर एक संशोधन


हल्ली जिकडे तिकडे विविध बातमीपत्रात अगर बातमी वाहिनी वर फक्त एकाच विषयावर चर्चा असते ती म्हणजे महागाई. पण महागाई कोणत्या वस्तूंवर  होत आहे. तर भाजी पाला कांदा लसून ह्या पदार्थांवर.  आपण लहानपणापासून वाचत आणि ऐकत आलो आहोत कि आपला भारत देश अनंत काळापासून कृषिप्रधान देश आहे. तरीही आपल्या देशात कृषी उत्पन्नाचे भाव आकाशाला भिडत आहेत? हे फार मोठे आश्चर्य नव्हे का? ह्यावर मी खूप विचार केला. आणि हा लेख लिहायला घेतला.

आपला देश आता फक्त कागदावरच कृषिप्रधान राहिलेला आहे असे मला वाटते. त्याचे कारण म्हणजे जमीन. जमिनीचे भाव शहर असो अगर गाव मागच्या ४-५ वर्षापासून प्रचंड प्रमाणात वाढले आहेत आणि वाढतच आहेत. ह्या जमिनीच्या भाववाढीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष ह्या साधनाकडे वेधले गेले आहे. त्यामुळे शहरांच्या जवळपासच्या खेड्यांच्या जमिनींना चांगले भाव आल्याने गरीब शेतकऱ्याने शेती करणे सोडून जमीन गुंतवणूकदाराला विकली. त्यापासून त्याला चांगली रक्कम मिळाली. त्याचे अठरा विश्व दारिद्र् नाहीसे झाले.

ज्या गुंतवणूकदाराने ती शेतीची जमीन विकत घेतली त्याला किंमत वाढीत रस असल्याने त्या शेतीत शेतीचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून ती पडीक जमीन झाली. जस् जसे शहर वाढत गेले तस तसे त्या जमिनीला भाव येत गेले. पडीक जमीन आता रहिवासी जमिनीत बदलून त्यावर इमारती झाल्या.  ह्या जागेपर्यंत इमारती येऊ घातल्याने तेथून पुढे १०-१५ किलोमीटर पर्यंतच्या गावातील शेत जमिनीला भाव आले. येथील शेतकऱ्याचे दारिद्र्य जमीन विकल्याने नाहीसे झाले. असे करीर करीत शेती नाहीसी होत गेली.

ज्या शेतकऱ्यांकडे थोडी फार शेती शिल्लक राहिली त्यांना गरिबीमुळे शेती करणे शक्य होत नाही. काहींकडे थोडाफार पैसा असला व त्यांनी पेरणी केली तर गोबळ वार्मिंग त्यांना जगू देत नाही. अवकाळी पाऊस येतो आणि हात तोंडाशी आलेले पिक नासवून जातो.

काही शेतकरी बिचारे कर्ज घेऊन शेती करतात आणि अति पाऊसाने नुकसान झाले कि वेडे पिसे होतात किंवा आत्महत्त्या तरी करतात.

याने दिवसेंदिवस कृषी उत्पन्न कमी कमी होत असावे म्हणून भाव वाढत असावे. असे माझे मत झाले आहे. कदाचित हे बरोबर नसेल ही.

पण मला आता एक   संशोधन करावेसे वाटत

कांद्याचे फ्लेवर. चिमूटभर घेऊन भाजीत टाकावे.

ज्याप्रकारे बहुतेक फळांचे artificial फ्लेवर बाजारात येत आहेत तसेच आता कांद्याचे फ्लेवर, लसणाचे फ्लेवर बाजारात आणावेत. म्हणजे उगाच महागाईवर चर्चा  करायची वेळ येणार नाही. आणि देशाचा अमूल्य वेळ वाया घालविला जाणार नाही. आणि जी थोडीफार जमीन शेतीसाठी शिल्लक राहिली आहे त्यात पाले भाज्या गहू ज्वारी, मका इ. धान्य पिकविले जाऊ शकेल.

किंवा कांद्याचे पावडर उपलब्ध करून द्यावेत म्हणजे जेवणाच्या वेळी मीठ/ मसाले टाकतो तसे टाकता येईल.

डाव्या बाजूच्या बाटलीत कांद्याची पावडर आहे. ज्याला पाहिजे त्याने जेवणात टाकावी. पण जरा जपून! जास्त ओतल्यास वेगळा आकार मोजावा लागेल.

9 thoughts on “महागाईवर एक संशोधन

 1. पिंगबॅक “महागाईवर एक संशोधन” भाग-२ | माझ्या मना …

 2. रविंद्रजी मुद्दे निश्चितच योग्य आहेत. कांदा फ्लेवर्ड पूडबद्दल. नैसर्गिक अन्नधान्य जर फ्लेवर्ड (जे रासायनिक प्रक्रियेतून जन्माला आलेले असते.) च्या रुपाने पर्याय होऊ लागले तर शारिरिक क्षमतेवरचा परिणाम हा अगदी दृश्य आहे. नैसर्गिक अन्नाच्या ऐवजी सरकारी धोरणांनी जंक फूड चा जो बाजार मांडला आहे आणि पर्यायाने शारीरिक व्याधींच्या वाढीचा आणि त्यामुळे निर्माण केलेल्या औषधांच्या भल्यामोठ्या बाजारपेठेचा हा खरा मोठा प्रश्न आहे. जमिनी शहरांच्या लगतच्या विकल्या जात असल्या तरीही भारतात अजूनही शेती प्रचंड प्रमाणात होते आहे. विपरित पावसाची परिस्थिती असूनही गहू तांदूळ यांचे रेकॉर्ड उत्पादन दरवर्षी होते आहे. साखर अजूनही आपण निर्यात करतो आहे. तुमचे विचार खरोखर अगदी बरोबर दिशेने आहेत. अजून यावर चिंतन करुन तुम्ही अजुन लेखन करावे ही विनंती. …

  Like

 3. रविंद्रजी तुमचे दोन्ही लेख वाचले. मुद्दे निश्चितच योग्य आहेत. पण ती एक बाजू झाली. अनेक गोष्टी आहे ज्यांत प्रत्यक्षात सरकार स्वतः जबाबदार आहे. आयटी वाले पगार जास्त मिळवतात असे चित्र असले तरी ते तितके वास्तव नाहिये. प्रिमियम प्रोजेक्ट्स मधे आयटी तून कमाई करणारा वर्ग गुंतवणूक करतो असे गृहीत धरले तरी सरकारी धोरणांनी बिल्डर लॉबी वर कोणतेच नियंत्रण ठेवले नाही ही दुसरी काळी बाजू आहे. कारण बिल्डर लॉबीत राजकारण्यांचे स्वतःचे हितसंबंध गुंतलेले (किंबहुना गुंतवलेले ) आहेत. त्यामुळे जो ७० % कष्टकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुखासमाधानाचे छत कसे मिळेल यापेक्षा या राजकारण्यांनी स्वतःच्या खिशाचे वजन वाढवण्याकडे लक्ष दिले. ही खरी शोकांतिका आहे. आता सरकारने कायदा केला आहे की प्रत्येक प्रोजेक्ट मधे २०% फ्लॅट्स हे गरिबांसाठी राखीव ठेवले पाहिजे. पण ही गोष्ट कालत्रयीही शक्य होणार नाही. कारण या प्रोजेक्ट्स मधे फ्लॅट्स घेण्यासाठी आर्थिक क्षमता पुरवण्याची काडीचीही काळजी सरकारने घेतली आहे. फक्त कागदोपत्री गरीबांना अशा फ्लॅट्स साठी आरक्षण दिले आहे. प्रश्न हा आहे की हे गरीब लोक फ्लॅट्स साठी पैसा कुठून आणणार? त्यासाठी सरकारने ना २-३ % व्याजाने गृहकर्जाच्या योजना दिल्या ना बिल्डर लॉबीवर त्याच्या किंमती त्यांना परवडतील अशा आवाक्यात आणण्यासाठी कोणताही दबाव. कांदा फ्लेवर्ड पूडबद्दल. नैसर्गिक अन्नधान्य जर फ्लेवर्ड (जे रासायनिक प्रक्रियेतून जन्माला आलेले असते.) च्या रुपाने पर्याय होऊ लागले तर शारिरिक क्षमतेवरचा परिणाम हा अगदी दृश्य आहे. नैसर्गिक अन्नाच्या ऐवजी सरकारी धोरणांनी जंक फूड चा जो बाजार मांडला आहे आणि पर्यायाने शारीरिक व्याधींच्या वाढीचा आणि त्यामुळे निर्माण केलेल्या औषधांच्या भल्यामोठ्या बाजारपेठेचा हा खरा मोठा प्रश्न आहे. जमिनी शहरांच्या लगतच्या विकल्या जात असल्या तरीही भारतात अजूनही शेती प्रचंड प्रमाणात होते आहे. विपरित पावसाची परिस्थिती असूनही गहू तांदूळ यांचे रेकॉर्ड उत्पादन दरवर्षी होते आहे. साखर अजूनही आपण निर्यात करतो आहे. तुमचे विचार खरोखर अगदी बरोबर दिशेने आहेत. अजून यावर चिंतन करुन तुम्ही अजुन लेखन करावे ही विनंती.

  Like

 4. रविंद्र राव सांगून पोट भरत नसते. तुम्ही केवळ नावाला देश कृषिप्रधान म्हणतात. नाही देश ९०% शेतीप्रधान आहे. जे उद्योग,व्यवसाय, दुकाने आहेत तीही शेतीशी निगडीत आहेत. ते मोजा. हा देश शेतीवरच चालतोय.पण शेतीकडे टोटल दुर्लक्षमुळे हे दिवस आलेत. त्यासाठी बराच काही पढत बसावे लागेल.

  Like

  • पाटीलजी, मी तुमची कोमेंट मराठीत केली. असो, मीही तेच म्हणतोय कि आता आपला देश कृषिप्रधान राहिलेला नाही. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

   Like

 5. I really like the idea of onion powder.If you bring it to the market it will be a runaway successes.But I disagree with claim the agricultural land is significantly reduced and that is cause of this inflation.you can check the data on the following link

  http://www.indiastat.com/agriculture/2/agriculturalarealanduse/152/areaundercropsinindia19951996to20052006/448934/stats.aspx

  Like

  • तुमचे म्हणजे बरोबर आहे. माझा लिहिण्याचा उद्देश असा होता कि शहराच्या लांब शेती गेल्याने ट्रांसपोर्टचा खर्च वाढतो आणि शहरात भाजी पाला महाग मिळतो. हे तर तर्क मान्य असेल न!

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s