तिळा तिळा दार उघड!


कालच आपण संक्रांति साजरी केली. मोठ्या धूम धडाक्याने! ( माझे मत). प्रत्येकाने एक दुसर्याला तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला.’ असा आग्रह धरला. स्त्रियांनी पारंपरिक वेशभूषेत हा सण साजरा केला.

का कुणास ठाऊक माझा डोळा फडफडत असल्याचे मला जाणवले. आणि का कुणास ठाऊक माझ्या मनात ‘ तिळा तिळा दर उघड!’ असे बोल घोळू लागले. अस का होत असाव याचा विचार करीत बसलो होतो. काही सुचेना. म्हणून जागेवर बसून टी.व्ही. सुरु केला. पाहतो तर काय तिळाने आपल भाल मोठ दार आधीच उघडून ठेवलं होत.

असो, असे आश्चर्याने काय बघताय. बातम्या नाही बघितल्या वाटत! कालची सर्वात महत्वाची एकच बातमी होती. पेट्रोलचे दर आणखी २.५० रुपयाने वाढले. तिळाने दार उघडले आणि गोड संक्रांत कडू झाल्याची विनाकारण जाणीव होऊन गेली. विनाकारण म्हणणेच योग्य आपण काय करू शकतो. जास्तीत जास्त पायी प्रवास करू शकतो. किंवा सायकलचा वापर करू शकतो.

रात्री माझ्या मनात एकाच विचार घोळत होता. आता आपण गाडी चालविणे सोडून द्यावे. ऑफिस जवळ आहे. १५-२० मिनिटे चालतच जात जावे. याने दोन कार्य साध्य होतात. एक तर इंधनाची बचत होईल, दुसरे व्यायाम होईल. आणखीही इंडायरेक्ट फायदे आहेतच. जसे प्रदूषण कमी होईल, गाडीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी होईल, आणि इतर कोणी लिफ्ट मागणार नाही. फायदेच फायदे.

सध्या घराचे अति कठीण शोध कार्य सुरु आहे. मला हे कार्य आकाशातून तारे तोडून आणण्यासारखे कठीण वाटायला लागले आहे आता. तर सांगायचा मुद्दा असा होता कि मध्यंतरी घर शोधात असतांना मला एक सद्गृहस्थ भेटले. सहज त्यांना विचारले तर त्यांचे वय म्हणे ७२ वर्ष होते. मी त्यांना विचारले अहो काका तुम्ही घरोघरी फिरून लोकांना घर दाखविता. मोठ मोठ्या इमारतींमध्ये चढून जाता. तुम्हाला थकवा नाही का येत. तर ते काय म्हणाले, अहो मागच्या ५० वर्षापासून मी घर खरेदी विक्री च्या व्यवहारात असून भला मोठा परिसर तेही सायकलने फिरत असतो. मला कधीच थकवा जाणवत नाही. तेव्हा मला जाणवून गेले कि सायकलवरील व्यायाम हा खूप महत्वाचा आहे. शरीर तंदरुस्त राहते.

मी विषयाला बगल देऊन टाकली नाही. ही माझी घाणेरडी सवय आहे बघा. प्रत्येक लेखात असेच होते. असो तर आपण तिळा तिळा……….. बद्दल बोलत होतो.

अहो मी कालच महागाईवर लेख लिहिला होता आणि त्यात पेट्रोल दर ही भाववाढीचे एक कारण आहे असे लिहिले होते. आणि काय आश्चर्य लगेच भाव वाढ लागू झाली की. मला माहीत आहे मी विचार करतो ण की ते घडतेच. आता मला माझी थिंकिंग बदलून टाकावी लागेल असे दिसते. जरी बाजारात भाव वाढलेले असले तरी ते भाव योग्य आहेत असेच म्हणावे लागेल आणि मनाची तशीच समजूत ही करून द्यावी लागेल. म्हणजे उगाच भाव वाढ झाली आहे ह्याची जाणीव होणार नाही आणि सतावणार ही नाही. एक उपाय योग्य आहे. पूर्वी १० रुपयाला पाव किलो भाजी घेत होतो तर आता १० रुपयाला अर्धा पाव भाजी मिळेल. खर्च १० रुपयेच करायचा. भाजी चे वजन कमी होईल इतकेच. काय म्हणता पोट कस भरेल. अहो बायकोचे चार शब्द मिळतीलच की खायला. ह्याचे अर्धा पाव भाजीला चव छान येईल की.

(तर आजच तिळाने दार उघडायला सुरुवात केली आहे. किलकिले आहे अजून काही दिवसांनी पूर्ण उघडले तर पेट्रोल खारेधी करणेच बंद करावे लागेल.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s