माझ्या मना

मित्रांनो, हल्ली माझ्या मना जोरात धावत पळत आहे. तसे मी कमीच लिहीत असतो. वेळ मिळत नाही. पण तरीही मागील काही कालावधी पासून माझ्या मनाला भेटी वाढत आहेत. याबद्दल मी आपणा  सर्वांचा आभारी आहे. आजच्या वर्डप्रेस डॉट कॉम वरील श्रेष्ठतम अनुदिनी मध्ये चौथा क्रमांक माझ्या मना चा आहे.

Fastest Growing WordPress.com blogs मधील पहिला क्रमांकावर माझ्या मना झळकत आहे.

पोल वर आजपर्यंत २२२ ब्लोग मित्रांनी वोट दिल्याचे दिसून येते. त्यातील ८२ वोट अति उत्कृष्ट बद्दल आहेत. याचा मला आनंद झाला आहे.

आपणास विनंती आहे असेच माझ्या मनावर प्रेम करीत राहावे.

माझ्या मना

मन उपाशी

मित्रांनो, सध्याच्या वातावरणात मन अगदी व्यथित झाले आहे. मनुष्य पैसा पैसा आणि फक्त पैसा याचाच विचार करीत असतो. जो तसे करत नाही, जागा सोबत धावत नाही तो मागे पडतो जरी समाधानी असला तरी व्यथित होऊन जातो.

पैसा किती ही कमविला तरी मानवाला पोट भर जेवणासाठी जास्तीत जास्त ४ पोळ्या लागतात. अंगावर बऱ्यापैकी वस्त्र आणि झोपायला ३x६ चे अंथरून. बस हीच आपली गरज. किती ही पैका कमविला तरी पोटाच्या क्षमतेपेक्षा जास्त खाता येत नसते, अंगावर दहा ड्रेस घालता येत नसतात किंवा १५x २० च्या पलंगावर झोपता येत नसते. फक्त आलिशान जीवन जगता येते इतकेच.

या गोष्टींचा विचार करून मन व्यथित होते. यावर माझ्या मानाने खालील दोन श्लोक तयार केलेत.

तुझे आहे तुज पाशी

तुला का वाटते तू आहे उपाशी,

जा तुझ्या त्या मनापाशी

आणि विचार जरा त्याशी.

आहे का तो समाधानी?

का हव्या त्याला जमिनी?

वीत भर अंथरुणी

का निजत नाही पांघरुनी?

भावार्थ: यात मी स्वतः ला संबोधून म्हणत आहे कि तू जे कमविले आहे ते तुझ्यापाशीच आहे. त्यात तुला समाधान नाही का? तुला असे का वाटते कि तू अजूनही अतृप्त आहेस, उपाशी आहेत. तुझ्या मनाला तू हे विचार कि तो आहे त्यात समाधानी आहे का? त्याला आणखी काय हवे आहे. (यात जमिनी म्हणजे मालमत्ता या संबोधनाने घेतला आहे.). आपल्या मनाला विचार कि तो त्याला जे वीत भर म्हणजे शरीर भर (गरजे प्रमाणे) अंथरून मिळाले आहे तेथे तो समाधानाने का निजत नाही???

निराशा

का कुणास ठाऊक हल्ली फार निराश झाल्यासरखे वाटते. असे वाटते जोरजोरात ओरडावे. पण तसे करता येत नाही. असे वाटते कुठेतरी हिमालयात किंवा इतर पर्वतावर जाऊन तपशचर्या करावी. पण मन धजावत नाही.मग हव तरी काय ह्या मनाला? काही कळत नाही.
असाच घरातील एकांतात (?:)) बसुन चिंतन करित होतो. तेव्हा अनाहुत्पणे तोंडातुन “घोर निराशा” असे शब्द बाहेर पडले आणि त्याच क्षणी आमच्या सौ. कशा कोण जाणे तेथे आल्या(नशिब आमच!) पण आमच नशिब येथवर येऊन थांबल नाही.
सौ. आमच्या जवळ रागारागाने पाय आपटत आल्या आणि जवळ जवळ ओरडुनच विचारले कि “कोण ही आशा?”
आम्ही जागेवरच उडालो!(वर छप्पर नसते तर!!!). सौ.च्या तोंडुन “आशा” हे नाव ऐकुन मला मी काहीही गुन्हा केलेला नसतांना असे वाटायला लागले की खरेच मी “आशा” नावाच्या कोणत्या तरी बाईला ओळखत असावा. असे एखादा साध्या सुध्या (माझ्या सारख्या) मानसाच्या बाबतीत होते कि न केलेला गुन्हा जर कोणी त्याच्यावर थोपवला तर त्याला स्वतःला खरेच आपण तो गुन्हा केला कि काय अशी शंका वाटायला लागते.असो!
इतके बोलुनच त्या् थांबल्या नाहीत हो.
त्यांच पुन्हा तेच “मी विचारले कोण ही आशा?”
मी आपला शांत बसुन राहिलो.काहिच उत्तर देऊ शकत नव्हतो म्हणुन बर का! नाही तर असा शांत बसलो असतो का?

मला प्रश्न पडला होता कि मी निराशा असे म्हटले असतांना हिच्या कानावर ’आशा’ असे शब्द कसे गेले. मला वाटते त्या कानांनी माझ्या सोबात धोका केला असावा. थोड्या वेळाने मला ओझरते  आठवले कि सौ. काल काही तरी सांगत होत्या. पण नेमके काय ते ……………… ते नेमक आठवत नाही पण कान….. हा शब्द त्यांच्य तोंडुन उदगारला गेला होता हे मात्र नक्की.  बघु ठोद्या वेळाने आठवले तर..

अरे हो आठवले कि त्या म्हणाल्या होत्या कि बाहेरिल गारठ्यामुळे त्यांचे कान जाम झाले आहेत. त्यांना ऐकायल त्रास होतोय.  मग माझी ट्युब पेटली. आणि डोकं भराभरा विचार करायला लागलं.

निराशा हे शब्द मी बरोबर उच्चरले होते. माझ्या तोंडुन निघालेले शब्द तिच्या कानापर्यंत पोहोचले असावेत. पण कानामधे पोहोचण्यापुर्वी आंतील वातावरण गारठलेले असल्याने निराशा शब्दाचा संधी विच्छेद होऊन  निर शब्द वेगळा आणि आशा शब्द वेगळा झाला असावा. कानामध्ये आधी निर शब्द घुसला असावा पण गारठ्यामुळे त्याचे तापमान कमी होऊन पाणि झाले असावे आणि ते पाणि कानातुन बाहेर पडले असावे. म्हणुनच त्यांना फक्त ’आशा’ हाच शब्द ऐकु आला असावा. आणि हा प्रसंग उद्भवला असावा.

ध्वनी प्रदूषण

मित्रांनो हल्ली शहरांमध्ये जनसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. ज्या प्रमाणात जनसंख्या वाढत आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. आणि त्याचे परिणाम म्हणजे शहरातील प्रचंड प्रमाणात वाढलेले प्रदूषण. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण. मी पुण्यात आल्यावर अनुभवले कि येथे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर पायी चाललो तर स्वस घेता येत नाही. असे वाटते घर बाहेर पडतांना तोंडाला कपडा बांधूनच बाहेर पडावे. मी तर येथे आल्यापासून अत्यावश्यक असेल तेव्हाच शहरात जातो. नाही तर घर आणि आपले कार्यालय. याच कारणामुळे मी कार्यालयापासून जास्त लांब घर घ्यायचे टाळले. आताचे घर फक्त १.५ किमी. लांब आहे. स्कुटीवर ५-६ मिनिटे लागतात. हे तर रस्त्यावरील प्रदूषणाचे बोलून झाले.

आता पुढील गोष्ट. आम्ही राहतो ते घर में रोडला लागून आहे. रोड वर इतकि वाहतूक असते कि दारे खिडक्या उघडता येत नाहीत. उघडल्या तर स्वास गुदमरतो आणि कान बहिरे होतात. काहीच ऐकायला येत नाही. मी आमच्या घरातील एक खिडकी थोडी उघडी ठेऊन बाहेरील आवाज व्हिडीओ रेकॉर्डिंग  करायचा प्रयत्न केला आहे. ते ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल कि रस्त्यावरील वाहनांचा आवाज Fraction of second साठी सुद्धा बंद होत नाही. हेच नव्हे तर ह्या रेकॉर्डिंग मध्ये एक सतत येणारा आवाज आहे. तो एखाद्या कारखान्यात चालणाऱ्या भट्टी च्या आवाजासारखा वाटतो.

मी तर पुण्यात आल्या पासून नाक गळतीने पारेषण हैराण आहे. प्रदूषणाचा परिणाम दुसरे काय!

माझा वाढ दिवस

मित्रांनो आज माझा खरा खुरा वाढ दिवस! गम्मत वाटली न! अशीच परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळी आई वडील सुशिक्षित नसल्याने मुलांचे वाढ दिवस लक्षात ठेवत नसत. किंवा माहित नसत. इंग्रजी तारखांचे तर शक्यच नाही. त्यांची पंचाईत होत असे शाळेत नाव घालायच्या वेळी.( नशीब आपले शाळेत नाव घातले म्हणून आज येथवर येऊन पोहोचलो 🙂 ) शिक्षकांनी जन्म तारीख विचारली कि त त प प व्हायची. मग काही तरी सांगून टाकायचे किंवा तुम्हाला वाटेल ती तारीख लिहा पण शाळेत नाव घाला. शिक्षक बिचारे काय करतील. जवळची तारीख म्हणजे १ जून. जेव्हा  शाळेत नाव घालायचे तेव्हाची १ जून पकडून मागचे सहा वर्ष मोजायचे आणि ती जन्म तारीख लिहायची झाले.

काही वर्षांपूर्वी गावी माझा जन्म कधी झाला हे शोधून काढले तर तारीख मिळाली १५ फेबृवारी. तेव्हापासून आम्ही हा वाढदिवस साजरा करायला लागलो. साजरा करणे म्हणजे जास्त काही नाही फक्त सकाळी उठल्यावर घरच्यांनी शुभेच्छा देणे. मनात आले तर काही तरी गोड करून खाणे.

तुम्ही विचारलं माझे वय किती? कोणाला वय विचारायचे नसते हो! 🙂

 

कौतुक

मित्रांनो, प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने काही मनाचा तुरा मिळविला कि अत्यानंद होतो.पालकांचे मन अभिमानाने भरून जाते. विशेष करून आपल्या समोर जर आपल्या  पाल्ल्याला शाळा – कॉलेजात आपल्या व इतर पालकांसमोर बक्षीस मिळाले तर अत्यानंद होतो.

असेच काही माझ्यासोबत झाले. माझी कन्या पुण्यातील ज्या कॉलेजात शिकते तेथे आंतरराष्ट्रीय रसायन वर्षानिमित्त कार्यक्रम होता. विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. आम्हाला समजले म्हणजे कन्येने सांगितले तेव्हा आम्ही तिला भाग घ्यायला प्रोत्साहित केले. तिने मैत्रिणीबरोबर पोस्टर स्पर्धा स्केचिंग स्पर्धा इ. मध्ये भाग घेतला. स्वतः वालनटीअर् म्हणून काम पाहिले.

परवा पालक सभा असल्याने मी कॉलेज मध्ये गेलो.  मी पोहोचण्यापूर्वीच कार्यक्रम सुरु झाला होता. पोस्टर स्पर्धेचे परीक्षक तेथे हजार होतेच. नुकतेच त्यांनी परीक्षण करून निकाल आयोजकांना दिला होता. अचानक  निकाल  सांगण्यात आला. तिसरा, दुसरा आणि शेवटी पहिला. पहिला क्रमांक कन्येच्या पोस्टरला मिळाला. माझे मन  आनंदाने ओसंडून वाहू लागले.

आपण तिला ओळखतात हे मला माहित आहेच. नसल्यास सांगतो ‘जीवनिका’ माझी कन्या. हे तिचे जन्म नाव आहे. तिला आपली ओळख पटवायची नाही म्हणून तिने आपल्या ब्लॉगवर हे नाव टाकले आहे. तिचा ब्लॉग म्हणजे ‘थोडेसे मनातले’.

आमची ती एकमेव पाल्य. पण लाडकी कन्या. गुणी हुशार सर्व कामात तरबेज. ती सहा महिन्यापूर्वी पुण्यात आली आणि पुण्याशी एकजीव झाली. तिला पुण्याचे कल्चर अतिशय आवडले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत पुण्यातून जायचे नाही असेच म्हणत असते. मला पश्चाताप होतोय तिला काही वर्षांपूर्वी पुण्याला शिक्षणासाठी पाठविले असते किंवा मी बदली करून घेतली असती तर चित्र काही तरी औरच असते. तिने जास्त चांगली प्रगती केली असती. आता तिचे ध्येय चांगल्या फार्मा कंपनीत प्रथम काम करायचे आणि प्रेक्टीकल अनुभव घ्यायचा असा आहे. मग पुढे रिसर्च करायचे. माझी इच्छा आहे तिने रिसर्च करावे. खूप नाव कमवावे. बघू काय होते ते.

 

माझे ब्लॉगिंग

मित्रांनो आज मला खूप आनंद होतोय.

कारण काय ते नाही विचारणार?

बर विचारा!

अहो आज मी सहज  ईंडीब्लॉगर (indiblogger) वर गेलो आणि आपल्या ब्लॉग्स ची सद्यःस्थिती काय आहे हे तपासले तर मला आश्चर्य झाले. कारण माज्या प्रत्येक ब्लॉग ची स्थिती अतिशय उत्तम आहे.

माझ्या मना या माझ्या अतिशय आवडत्या ब्लॉग ची ईंडी रेन्किंग आहे ८१, गुगल पेज रेन्किंग आहे ४. Alexa रेन्किंग आहे ४.०२ . येथे आणखी एक महत्वाचे सांगायचे आहे कि माझ्या मनाची गुगल रेन्किंग नोवेंबर २००९  पासून आता पर्यंत ३ ते ५ च्या दरम्यानच आहे.  येथे बघा.

माझा हिंदी ब्लॉग आहे ‘ कुछ पल’ त्याचे स्टेटस

माझा इंग्रजी ब्लॉग आहे  My Blog. ह्या ब्लॉग वर मी फारच कमी लिहितो.  जवळ जवळ एक महिन्यापासून मी त्यावर काहीच लिहिले नाही. तरी हि त्याची पेज रेंक जानेवारी मध्ये वाढून ३ झाली आहे.  एकूण विजीटर्स आहेत ७५२७ फक्त.

माझा गणिताचा ब्लॉग मेजिक मेथ्स वर मी २७/०३/२०१० नंतर एक हि पोस्ट टाकलेली नाही तरीही त्याची गुगल पेज रेंक सतत २ च आहे.

युरेका!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


स्वयं शिस्त

स्वयंशिस्तीशिवाय शिस्त लागत नाही हे आपल्या सर्वांना माहित असेलच. कायदे कडक केले म्हणजे शिस्त लागते असे नाही. आपण स्वतः ठरवायला हवे शिस्तीत राहायचे. घरामध्ये आपण घान करतो का? नाही न! मग आपण बाहेर का घान करतो.  अशी स्वयं शिस्त मी १९९८ मध्ये जपानला गेलो होतो तेव्हा तेथे बघितली होती.

मी तेथे निरीक्षण केले होते कि पोलीस कोठेच दिसत नाहीत. मात्र प्रत्येक नागरिक शिस्तीत चालतो, वागतो आणि राहतो. अहो मी चार आठवडे तेथे राहिलो होतो. खूप फिरलो. दर शनिवार रविवार सुटी असायची तेव्हा म्हणजे विक एंड ला वेगवेगळया शहरात फिरत असू. ओसाका मध्ये राहायला होतो नंतर टोकियो मध्ये राहिलो. पण  मला फक्त एक पोलीस चौकी दिसली होती. ती हि टोकियो मध्ये. आणि पोलीस फक्त दोन-तीनच दिसले संपूर्ण वास्तव्य काळात. विमान तालावर तर जातांना किंवा येतांना पोलिसाच दिसले नाही. हा सेक्युरीटी चेक साठी मात्र पोलीस होते.

अहो एकदा आम्ही लोकलने प्रवास करीत होतो तेव्हा आमच्या डब्यात दोन पोलीस चढले. आम्ही घाबरलो. आम्हाला वाटले हे आमच्यासाठीच चढले कि काय? डब्यातले प्रवासी त्यांच्या

हीच ती रस्त्याच्या कडेला खेचलेली पंढरी लाईन.

कडे आश्चर्याने बघत होती. पुढच्या स्टेशनवर ती उतरली आणि आमचा जीव भांड्यात पडला.

मी हि पो

स्ट

लिहायला घेतली आहे ती जुन्या आठवणींची उजळणी करायला नव्हे तर पुण्यात आल्यापासून मी पुणेकरांमध्ये पाहिलेली शिस्त म्हणून. खरच पुणेकरांमध्ये स्वयं

 

शिस्त आहे. उदाहरण सांगायचे झाले तर ह्या शहराच्या कोणत्याही कोपर्यात किंवा गल्ली बोळात गेलात तरी तुम्हाला एका खास गोष्टीची जाणीव

येथे रस्ता आणि ती लाईन सोबत दिसते आहे.

होईल. ती म्हणजे प्रत्येक वाहन धारक आपले वाहन शिस्तीने रस्त्याच्या कडेला आणि तेही जी पंढरी रेषा आखलेली असते त्याच्या आतच उभी करतो. गल्ली बोळात कोठे पोलीस येतील का गाडी उचलायला पण हि स्वयं शिस्त आहे. आणि अशा शिस्तीने शहराची शोभा वाढते.

अशी अनेक उदाहरण देता येतील पण ते महत्वाचे नाही महत्वाचे आहे स्वयं शिस्त राखणे. प्रत्येकाने जर शिस्तीत वागायचे ठरवले तर शहराची सुंदरता खूप वाढेल असे नाही का वाटत?

हि बघा एका लहानश्या गल्लीत उभी असलेली कार सुध्दा पांढऱ्या लींच्या आतच उभी केली आहे.

(क्रमशः)

( सर्व फोटो माझ्या मोबाईलवर काढलेले आहेत)

प्रवाहाच्या विरुध्द

एकदा एक प्राणी नदीमार्गातून जात होता. अचानक नदीला पूर आला. तो पुराच्या दिशेने वाहू लागला. पण त्याला पुरच्या विरुध्द दिशेला जायचे होते. त्याने कसे तरी करून आपले तोंड त्या दिशेला करून घेतले. पण पूराचा प्रवाह त्याला विरुध्द दिशेला जाण्यापासून रोखत होता. तो खूप प्रयत्न करीत होता. कधी कधी त्याला वाटायचे कि आता आपण जास्त जोर लौ शकत नाही. इतकी टाकत आपल्यात राहिली नाही. पण क्षणात तो विचार तो बाजूला काढून ठेवायचा आणि पुनः आपले प्रयत्न करीत राहायचा. कारण त्याला खात्री होती कि तो चुकीचे काहीच करीत नाही. त्याचा मार्ग व ध्येय जो आहे त्याच दिशेने त्याला जावे लागेल. म्हणून तो परवाच्या दिशेने जात राहिला. पुराचा विरोध पत्करून.