ध्वनी प्रदूषण


मित्रांनो हल्ली शहरांमध्ये जनसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. ज्या प्रमाणात जनसंख्या वाढत आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. आणि त्याचे परिणाम म्हणजे शहरातील प्रचंड प्रमाणात वाढलेले प्रदूषण. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण. मी पुण्यात आल्यावर अनुभवले कि येथे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर पायी चाललो तर स्वस घेता येत नाही. असे वाटते घर बाहेर पडतांना तोंडाला कपडा बांधूनच बाहेर पडावे. मी तर येथे आल्यापासून अत्यावश्यक असेल तेव्हाच शहरात जातो. नाही तर घर आणि आपले कार्यालय. याच कारणामुळे मी कार्यालयापासून जास्त लांब घर घ्यायचे टाळले. आताचे घर फक्त १.५ किमी. लांब आहे. स्कुटीवर ५-६ मिनिटे लागतात. हे तर रस्त्यावरील प्रदूषणाचे बोलून झाले.

आता पुढील गोष्ट. आम्ही राहतो ते घर में रोडला लागून आहे. रोड वर इतकि वाहतूक असते कि दारे खिडक्या उघडता येत नाहीत. उघडल्या तर स्वास गुदमरतो आणि कान बहिरे होतात. काहीच ऐकायला येत नाही. मी आमच्या घरातील एक खिडकी थोडी उघडी ठेऊन बाहेरील आवाज व्हिडीओ रेकॉर्डिंग  करायचा प्रयत्न केला आहे. ते ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल कि रस्त्यावरील वाहनांचा आवाज Fraction of second साठी सुद्धा बंद होत नाही. हेच नव्हे तर ह्या रेकॉर्डिंग मध्ये एक सतत येणारा आवाज आहे. तो एखाद्या कारखान्यात चालणाऱ्या भट्टी च्या आवाजासारखा वाटतो.

मी तर पुण्यात आल्या पासून नाक गळतीने पारेषण हैराण आहे. प्रदूषणाचा परिणाम दुसरे काय!

8 thoughts on “ध्वनी प्रदूषण

  1. नाक गळण्याचा मला असलेला त्रास झोप आल्याशिवाय अंथरुणावर पडू नये व जाग आल्यावर अंथरुणावर पडून राहू नये हे बिकट नियम पाळल्यावर बरा झाला.

    Like

    • अहो मनोहर साहेब, येथे मी आजारपण घेउन न येता फक्त काल्पनिक व गमतीशीर लेख लिहायचा प्रयत्न केला आहे. असो आपणाला तो खरोखर वाटला याचाच अर्थ माझा लेख यथार्थ्च्या जवळ पोहोचला आहे असा होतो. धन्यवाद!!!!

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s