मी शतकवीर!

उद्या भारत पाकिस्तान ची सेमि फ़ायनल मेच आहे. पण ती फ़ायनल सारखीच होत आहे. सर्वांचे डोळे सचिनच्या शतकाच्या शतककडे लागलेले आहेत. देव करो आणि त्याचा हा रेकोर्ड पुर्ण होओ.
त्याचे जे होइल ते उद्या आपण पाहुच पण त्या आधि मी शतकविर झाल्याचा मला आनंद होत आहे. आज माझ्या मनावरच्या पोलवर अति उत्क्रुष्ट खाली एकुण १०० मत पुर्ण झाल्याने मी शतकविर झालो आहे. सर्व मतदार बन्धु भगिनिंना मना्पासुन धन्यवाद!

 

माझा आणखी एक ब्लॉग- निसर्ग

मित्रांनो हल्लीच्या धकाधकीच्या आणि शहरी जीवनामुळे आपलयाला  निसर्गाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले आहे. पण आपण निसर्गाला काय दिले? जंगल तोड, पशु पक्षी यांचे राहते घर आपण हिसकावत आहोत त्यापेक्षा असे म्हणणे जास्त योग्य होईल’ त्यांना बेघर करून आपण घर बांधून निसर्गाची घरघर करीत आहोत.’  दररोज आपण टी. व्ही. वर बातम्या बघतो कि हत्ती जंगल सोडून शहरात किंवा गावात घुसले. आणि त्यांनी फ्हुमाकुल घातला. हत्तीच काय चीत्ता सुध्दा शहरात आढळत आहे. याचे मुख्य कारण काय? आपण त्यांचे घर म्हणजे जंगल उद्ध्वस्त करीत आहोत. म्हणून ते घराचा शोध घेत येत असावेत.

मला एक कल्पना सुचली कि जंगल नाहीसे होत आहे. त्यामुळे आपण एक वर्चुअल जंगल तयार केले तर. दररोज त्यावर निसर्गाचे एक सुंदर चित्र टाकायचे आणि डोळ्याचे पारणे फेडायचे. डोळ्यांना शांती लाभेल. मन सुध्दा सुंदरता बघून शांत होईल.

म्हणून मी एक नवीन ब्लॉग तयार केला आहे. त्याचे नाव ठेवले आहे.’ निसर्ग’

जरूर भेट द्यावी व माझी कल्पना कशी वाटली ते कळवावे.

निसर्ग

जीवन एक फुल

जीवन एक गुलाबाचे फूल आहे

पाकळ्या  ज्याच्या

जीवनाचा एक एक क्षण आहे

ज्याच्या अवती भवती कांटेच कांटे आहेत.

अशा ह्या जीवनाला  सुन्दर मानने

काय आपली  एक भूल ठरणार नाही?

बेचारा आदमी!

मनुष्य बायको पुढे हतबल असतो. तेथे त्याचे  काही चालत नाही. म्हणून बायकोला ‘होम मिनिस्टर’ असे उपहासाने म्हणतात. त्याने काहीही केले तरी बायको आपला खोचक बोलायचा गुणधर्म सोडत नाही. याबद्दल मला एक मेल आला होता. छान आहे.