अप्रतिम लग्न पत्रिका

मित्रांनो, जस जसा काळ बदलत जातो, नाविन्य पुर्ण वस्तु बाजारात उपल्ब्ध होत असतात. नाविन्य म्हणजेच जिवन असे म्हटले जाते. नुकतिच एका होऊ घातलेल्या लग्नाची पत्रिका प्राप्त झाली  आहे.  ही पत्रिका आमचे नविन साहेब ह्यांच्या मुलीच्या लग्नाची आहे. अप्रतिम आहे मला आवडली म्हणुन येथे शेअर करित आहे.

पत्रिका उघडण्यापुर्वी अशी दिसते.

पुर्णतः उघडलेली लग्न पत्रिका

आधीच्या चित्रात दिसणारे दोन आकर्षक दोरे दोन्ही बाजुला ओढले तर पत्रिका उघडली जाते. थोडी उघडली तर ती अशी दिसते. फुलासारखी.

१३ मे

मित्रांनॊ,

काल १३ मे ही तारिख होती. हा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण ह्याच दिवशी मी शासकिय सेवेस सुरुवात केली होती. २६ वर्ष झाली शासनाची सेवा करुन. मी कायम प्रथम प्राधान्य नौकरीला दिलय. स्वतःचा कधीच विचार केलेला नाही. झोकुन दिलय स्वतःला.

काल एक अशी दुखद घटना  घडली की हा दिवस मला आयुष्यभर लक्षात राहिल.

माझे परम मित्र, माझे स्नेही, माझ्या कॊलेजचे माझे सिनिअर, माझ्या गावाजवळ ज्यांचे गाव होते व जे आज माझे बॊस होते त्यांचे दिर्घ आजाराने, केंसर ने दुखद निधन झाले. त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण असे की पुण्याचे वास्तव्यास तेच कारणीभुत आहे. आजारपणाने त्रस्त असल्याने व कामात मदद होण्याच्या द्रुष्टीने त्यांनी माझी बदली पुण्याला होण्यासाठी खुप आग्रह धरला होता. त्यांच्यामुळेच मी ह्या पुण्यनगरीत अवतरलो नव्हे वास्तव्याला आलो. मी एकटा  नव्हे सर्व कुटुंब घेऊन अवतरलो आणि बघता बघता आम्ही ह्या नगरीच्या प्रेमात पडलो.

श्रद्धांजली म्हणुन मी पोस्ट त्यांना अर्पण करतॊ व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो .

देवा!  हा भयावह आजार कोणाला दुश्मनाला ही होऊ देऊ नको रे बाबा!

कविवर्य रविन्द्रनाथ टागोर

कविवर्य महान चित्रकार नोबेल पुरस्कार प्राप्त रविन्द्रनाथ टागोर (मी मनोमनी ज्यांना  गुरु मानले आहे.)

१५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

हा हा हा!!!!!!!!! कधी पाहिलेत असे दृश्य?

जागतिक किर्तीमान तर स्थापित करायचे नसेल ह्या प्रवाश्यांना?

ही आहे भारतीय रेल्वे! मला वाटते रेल्वेतील बाकडे रिकामे ठेवले असावेत आणखी प्रवासी येण्यासाठी?

 फोटो: फ़न ओन दि नेट डॊट कॊम