महागाई- माझ्या नजरेतून!!!

एखादी गोष्ट जर भरमसाठ वेगाने वाढत असेल तर त्यासाठी हिंदी मध्ये एक म्हण आहे ‘दिन दुनी रात चौगुनी’. म्हणजे दिवसा डबल आणि रात्री चौबल म्हणजेच चारपट. सध्या महागाई ह्याच वेगाने वाढत आहे. वाहक हायवे वर गाडी चालवीत असतो आणि त्याचे काही क्षणासाठी लक्ष विचलित झाले तर काय होते? आणि जर जास्त वेळ लक्ष विचलित झाले तर मग विचारायलाच नको. तसे महागाईचे झाले आहे असेच म्हणावे लागेल. त्यावरील नियंत्रण आता हाताबाहेर गेले आहे आणि आता त्यावर नियंत्रण आणणे कठीण होऊन बसले आहे.

या विषयावर माझ्या सारख्या तुच्छ माणसाने बोलणे अगर विश्लेषण करणे म्हणजे ‘ उंट के मुह में जीरा’.( आणखी एक हिंदी म्हण.) पण तरी मी आपल्या मनातील विचार येथे मांडू इच्छितो. या महागाईची कारणं काय असावीत? ती मी येथे मांडत आहे. जरा विचार केला तर पटतील अन्यथा ………..

१) प्रमुख कारण म्हणजे आय. टी. क्षेत्रातील लोकांचे भरमसाठ पगार.

माफ करा मी कोणाच्या ही विरोधात नाही. पण भरमसाठ पगार मिळत असल्याने काय झाले आहे कि दरमहा पैश्याची प्रचंड प्रमाणात आवक. मुळातच कुटुंब लहान असते. गरजा कमी असल्याने त्या पैश्याचे काय करायचे हा मोठा प्रश्न. मग तो पैसा मालमत्ता घेण्याकडे वळला. एकेका कुटुंबाकडे ३-३, ४-४ घरे म्हणजे फ्लेट. तो पैसा मालमत्ता घेण्याकडे वळल्याने इतरांनी जागेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. याने फ्लेट व प्लॉट च्या किमती भरभर वाढल्या.

मालमत्ते मध्ये गुंतवणूक म्हणजे डेड इंवेस्टमेंट कारण तो पैसा रोलिंग मध्ये नसतो. तो पैसा ब्लॉक होतो. पैसा बाजारात खेळत नसल्याने इकोनॉमी मार खाते. अशी माझी समज आहे. मी अभियंता असल्याने माझे कदाचित चुकीचे विचार असतील ही. तसे असल्यास कृपया माझा गैरसमज दूर करण्यात मदत करावी. मी आभारी राहीन.

घरांच्या किमती भरमसाठ वाढल्याने सामान्य जनता म्हणजे आय. टी. वाले सोडून त्यांना घर घेणे कठीण होऊन बसले. किमती जास्त, पगार कमी, जास्त लोन घेणे शक्य नाही, म्हणून त्यांना राहण्यासाठी सुध्दा घर घेता येत नाही तर गुंतुवणूक करणे कसे शक्य होईल. त्यामुळे त्यांचा पैसा मालमत्ते कडे वळू शकत नाही. म्हणजे तो मुदत ठेव योजनेत ठेवावा लागतो किंवा सोने घ्यावे लागते. म्हणून सामान्य लोकं सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आणि सोन्याचे भाव भरमसाठ वाढले.

आता झाले असे आहे कि जसे सोन्याचे भाव गगनाला टेकले आहेत तसे घरांचे भाव ही टेकले आहेत. ते आता सामन्यांच्या पोहोचण्यापलीकडे गेले आहेत. त्यामुळे आता सामन्यांची गुंतवणूक थंडावली आहे. आता ह्या दोन्ही क्षेत्रातील गुंतवणूक फक्त अति श्रीमंतांवरच अवलंबून आहे.

ज्यांनी फायद्यासाठी गुंतवणूक केली आहे ( अर्थात गुंतवणूक फायद्यासाठीच केली जाते) ते भाव वाढीची वाट बघत असतात. आणि ज्यांना आता गुंतवणूक करायची आहे ते भाव कमी होण्याची वाट बघत असतात. म्हणजेच तो पैसा ब्लॉक झालेला असतो.

आणि समजा ज्यांनी मालमत्ते मध्ये फायद्यासाठी गुंतवणूक केली आहे त्यांना फायदा झाला तरी ते तो पैसा लगेचच मालमत्ते मध्येच गुंतवतात. नाही तर त्यांना प्रचंड प्रमाणात आयकर भरावा लागतो.

आता मी महत्वाच्या मुद्द्यावर पोहोचलो आहे बघा. पूर्वी शासनाने लोकांनी घर घ्याव म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आयकरात सवलती दिल्या होत्या. कारण तेव्हा लोकं घर घेण्यास घाबरायची. एव्हढी गुंतवणूक कशी करावी ह्याचा विचार करायचे. त्यासाठीच प्रोत्साहन दिले जायचे. पण आता घर घेणे हे व्यापारासारखे झाले आहे.

मालमत्तेच्या किमतीतील भरमसाठ वाढीचा आणखी एक वाईट परिणाम म्हणजे शेत जमीन कमी कमी होत जाणे. हायवे वर जा कोठे ही शेत जमीन दिसणार नाही. रस्त्याच्या दोन्हीकडे जागा व्यापलेली दिसेल. शहर असो अगर गाव जागेच्या किमती आकाशाला भिडलेल्या. अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे ज्या वस्तूला मागणी जास्त तिचे भाव आकाशाला लगेच भिडतात. तसे मागच्या ७-८ वर्ष्यात जमिनीचे झाले आहे. मग शेती उत्त्पन्न कमी होत गेले. त्यामुळे भाजीपाला व अन्नधान्याचे भाव आवाक्याबाहेर गेले. नाहीतर पावसाला संपला की विपुल प्रमाणात भाजीपाला बाजारात येत असे आणि काही वेळा ५० पैसे व १ रुपयात मेथी- कोथीम्बिरची जुडी मिळत असे.ते दिवस गेले राव. आता ५० पैसे व १ रूपयाच काय ५ रुपयाच्या नोटा सुध्दा दिसत नाहीत.

बातम्यांमध्ये गमतीशीर विधान ऐकण्यात येतात. जसे शेतकरी मजुरांची मजुरी वाढवून दिल्याने भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत. हाहाहा……………………….. माझ हसू थांबायचं नावच घेत नाही हो…….. केविलवाणी विचारसरणी आणखी काय…..

( मी येथे जी सत्य परिस्थिती आहे त्याचे गणित मांडले आहे. ही कोणावर ही टीका टिप्पणी नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसे वाटल्यास लिहावे म्हणजे मला क्षमा मागता येईल.)

टाटा, बाय-बाय

नाही नाही मी हे आपल्या बिन भिंतीच्या घरातील मित्रांना उद्देशून म्हणत नाही आहे. आज प्रवासात असतांना अचानक ट्रक च्या TATA असे लिहिलेले होते तेव्हा विचार आला कि हा शब्द टाटांच्या कंपनीचे नाव म्हणून लिहिला आहे. त्यावरून मला हि पोस्त सुचली.

आपण बहुतेक लहान मुलांना शाळेत जात  किंवा बाहेर कोठे हि असतांना टाटा म्हटलेले आपण ऐकत असतो. नुसता टाटा नव्हे सोबत बाय बाय सुध्दा. मला प्रश्न पडत आहे कि हा शब्द कोणत्या भाषेचा आहे? आणि याचा अर्थ काय आहे?

आणि हो टाटा ह्यांनी हा शब्द आपले आडनाव म्हणून निवडला तेव्हा हा शब्द आपल्याकडे पूर्व परिचित होता का? हे विचारण्याचे कारण कि पारशी समुदाय आपल्या देशात स्थलांतरित झाल्यावर त्यांनी आपणाकडील आडनाव आपल्या नावापुढे लावून घेतली म्हणजे तेव्हा हा शब्द आपल्याकडे परिचित असावा.

तरी कोणी तरी मला समाधानकारक उत्तर देऊ शकेल?