महागाई- माझ्या नजरेतून!!!


एखादी गोष्ट जर भरमसाठ वेगाने वाढत असेल तर त्यासाठी हिंदी मध्ये एक म्हण आहे ‘दिन दुनी रात चौगुनी’. म्हणजे दिवसा डबल आणि रात्री चौबल म्हणजेच चारपट. सध्या महागाई ह्याच वेगाने वाढत आहे. वाहक हायवे वर गाडी चालवीत असतो आणि त्याचे काही क्षणासाठी लक्ष विचलित झाले तर काय होते? आणि जर जास्त वेळ लक्ष विचलित झाले तर मग विचारायलाच नको. तसे महागाईचे झाले आहे असेच म्हणावे लागेल. त्यावरील नियंत्रण आता हाताबाहेर गेले आहे आणि आता त्यावर नियंत्रण आणणे कठीण होऊन बसले आहे.

या विषयावर माझ्या सारख्या तुच्छ माणसाने बोलणे अगर विश्लेषण करणे म्हणजे ‘ उंट के मुह में जीरा’.( आणखी एक हिंदी म्हण.) पण तरी मी आपल्या मनातील विचार येथे मांडू इच्छितो. या महागाईची कारणं काय असावीत? ती मी येथे मांडत आहे. जरा विचार केला तर पटतील अन्यथा ………..

१) प्रमुख कारण म्हणजे आय. टी. क्षेत्रातील लोकांचे भरमसाठ पगार.

माफ करा मी कोणाच्या ही विरोधात नाही. पण भरमसाठ पगार मिळत असल्याने काय झाले आहे कि दरमहा पैश्याची प्रचंड प्रमाणात आवक. मुळातच कुटुंब लहान असते. गरजा कमी असल्याने त्या पैश्याचे काय करायचे हा मोठा प्रश्न. मग तो पैसा मालमत्ता घेण्याकडे वळला. एकेका कुटुंबाकडे ३-३, ४-४ घरे म्हणजे फ्लेट. तो पैसा मालमत्ता घेण्याकडे वळल्याने इतरांनी जागेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. याने फ्लेट व प्लॉट च्या किमती भरभर वाढल्या.

मालमत्ते मध्ये गुंतवणूक म्हणजे डेड इंवेस्टमेंट कारण तो पैसा रोलिंग मध्ये नसतो. तो पैसा ब्लॉक होतो. पैसा बाजारात खेळत नसल्याने इकोनॉमी मार खाते. अशी माझी समज आहे. मी अभियंता असल्याने माझे कदाचित चुकीचे विचार असतील ही. तसे असल्यास कृपया माझा गैरसमज दूर करण्यात मदत करावी. मी आभारी राहीन.

घरांच्या किमती भरमसाठ वाढल्याने सामान्य जनता म्हणजे आय. टी. वाले सोडून त्यांना घर घेणे कठीण होऊन बसले. किमती जास्त, पगार कमी, जास्त लोन घेणे शक्य नाही, म्हणून त्यांना राहण्यासाठी सुध्दा घर घेता येत नाही तर गुंतुवणूक करणे कसे शक्य होईल. त्यामुळे त्यांचा पैसा मालमत्ते कडे वळू शकत नाही. म्हणजे तो मुदत ठेव योजनेत ठेवावा लागतो किंवा सोने घ्यावे लागते. म्हणून सामान्य लोकं सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आणि सोन्याचे भाव भरमसाठ वाढले.

आता झाले असे आहे कि जसे सोन्याचे भाव गगनाला टेकले आहेत तसे घरांचे भाव ही टेकले आहेत. ते आता सामन्यांच्या पोहोचण्यापलीकडे गेले आहेत. त्यामुळे आता सामन्यांची गुंतवणूक थंडावली आहे. आता ह्या दोन्ही क्षेत्रातील गुंतवणूक फक्त अति श्रीमंतांवरच अवलंबून आहे.

ज्यांनी फायद्यासाठी गुंतवणूक केली आहे ( अर्थात गुंतवणूक फायद्यासाठीच केली जाते) ते भाव वाढीची वाट बघत असतात. आणि ज्यांना आता गुंतवणूक करायची आहे ते भाव कमी होण्याची वाट बघत असतात. म्हणजेच तो पैसा ब्लॉक झालेला असतो.

आणि समजा ज्यांनी मालमत्ते मध्ये फायद्यासाठी गुंतवणूक केली आहे त्यांना फायदा झाला तरी ते तो पैसा लगेचच मालमत्ते मध्येच गुंतवतात. नाही तर त्यांना प्रचंड प्रमाणात आयकर भरावा लागतो.

आता मी महत्वाच्या मुद्द्यावर पोहोचलो आहे बघा. पूर्वी शासनाने लोकांनी घर घ्याव म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आयकरात सवलती दिल्या होत्या. कारण तेव्हा लोकं घर घेण्यास घाबरायची. एव्हढी गुंतवणूक कशी करावी ह्याचा विचार करायचे. त्यासाठीच प्रोत्साहन दिले जायचे. पण आता घर घेणे हे व्यापारासारखे झाले आहे.

मालमत्तेच्या किमतीतील भरमसाठ वाढीचा आणखी एक वाईट परिणाम म्हणजे शेत जमीन कमी कमी होत जाणे. हायवे वर जा कोठे ही शेत जमीन दिसणार नाही. रस्त्याच्या दोन्हीकडे जागा व्यापलेली दिसेल. शहर असो अगर गाव जागेच्या किमती आकाशाला भिडलेल्या. अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे ज्या वस्तूला मागणी जास्त तिचे भाव आकाशाला लगेच भिडतात. तसे मागच्या ७-८ वर्ष्यात जमिनीचे झाले आहे. मग शेती उत्त्पन्न कमी होत गेले. त्यामुळे भाजीपाला व अन्नधान्याचे भाव आवाक्याबाहेर गेले. नाहीतर पावसाला संपला की विपुल प्रमाणात भाजीपाला बाजारात येत असे आणि काही वेळा ५० पैसे व १ रुपयात मेथी- कोथीम्बिरची जुडी मिळत असे.ते दिवस गेले राव. आता ५० पैसे व १ रूपयाच काय ५ रुपयाच्या नोटा सुध्दा दिसत नाहीत.

बातम्यांमध्ये गमतीशीर विधान ऐकण्यात येतात. जसे शेतकरी मजुरांची मजुरी वाढवून दिल्याने भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत. हाहाहा……………………….. माझ हसू थांबायचं नावच घेत नाही हो…….. केविलवाणी विचारसरणी आणखी काय…..

( मी येथे जी सत्य परिस्थिती आहे त्याचे गणित मांडले आहे. ही कोणावर ही टीका टिप्पणी नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसे वाटल्यास लिहावे म्हणजे मला क्षमा मागता येईल.)

2 thoughts on “महागाई- माझ्या नजरेतून!!!

  1. रविंद्रजी तुमचे दोन्ही लेख वाचले. मुद्दे निश्चितच योग्य आहेत. पण ती एक बाजू झाली. अनेक गोष्टी आहे ज्यांत प्रत्यक्षात सरकार स्वतः जबाबदार आहे. आयटी वाले पगार जास्त मिळवतात असे चित्र असले तरी ते तितके वास्तव नाहिये. प्रिमियम प्रोजेक्ट्स मधे आयटी तून कमाई करणारा वर्ग गुंतवणूक करतो असे गृहीत धरले तरी सरकारी धोरणांनी बिल्डर लॉबी वर कोणतेच नियंत्रण ठेवले नाही ही दुसरी काळी बाजू आहे. कारण बिल्डर लॉबीत राजकारण्यांचे स्वतःचे हितसंबंध गुंतलेले (किंबहुना गुंतवलेले ) आहेत. त्यामुळे जो ७० % कष्टकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुखासमाधानाचे छत कसे मिळेल यापेक्षा या राजकारण्यांनी स्वतःच्या खिशाचे वजन वाढवण्याकडे लक्ष दिले. ही खरी शोकांतिका आहे. आता सरकारने कायदा केला आहे की प्रत्येक प्रोजेक्ट मधे २०% फ्लॅट्स हे गरिबांसाठी राखीव ठेवले पाहिजे. पण ही गोष्ट कालत्रयीही शक्य होणार नाही. कारण या प्रोजेक्ट्स मधे फ्लॅट्स घेण्यासाठी आर्थिक क्षमता पुरवण्याची काडीचीही काळजी सरकारने घेतली आहे. फक्त कागदोपत्री गरीबांना अशा फ्लॅट्स साठी आरक्षण दिले आहे. प्रश्न हा आहे की हे गरीब लोक फ्लॅट्स साठी पैसा कुठून आणणार? त्यासाठी सरकारने ना २-३ % व्याजाने गृहकर्जाच्या योजना दिल्या ना बिल्डर लॉबीवर त्याच्या किंमती त्यांना परवडतील अशा आवाक्यात आणण्यासाठी कोणताही दबाव. कांदा फ्लेवर्ड पूडबद्दल. नैसर्गिक अन्नधान्य जर फ्लेवर्ड (जे रासायनिक प्रक्रियेतून जन्माला आलेले असते.) च्या रुपाने पर्याय होऊ लागले तर शारिरिक क्षमतेवरचा परिणाम हा अगदी दृश्य आहे. नैसर्गिक अन्नाच्या ऐवजी सरकारी धोरणांनी जंक फूड चा जो बाजार मांडला आहे आणि पर्यायाने शारीरिक व्याधींच्या वाढीचा आणि त्यामुळे निर्माण केलेल्या औषधांच्या भल्यामोठ्या बाजारपेठेचा हा खरा मोठा प्रश्न आहे. जमिनी शहरांच्या लगतच्या विकल्या जात असल्या तरीही भारतात अजूनही शेती प्रचंड प्रमाणात होते आहे. विपरित पावसाची परिस्थिती असूनही गहू तांदूळ यांचे रेकॉर्ड उत्पादन दरवर्षी होते आहे. साखर अजूनही आपण निर्यात करतो आहे. तुमचे विचार खरोखर अगदी बरोबर दिशेने आहेत. अजून यावर चिंतन करुन तुम्ही अजुन लेखन करावे ही विनंती.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s