मोबाईलचे विश्व

मोबाईलने सर्व जगच बदलून टाकल आहे अस नाही का वाटत आपल्याला? मला तरी वाटत बुआ. असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पूर्वीचे मोबाईल तरी बरे होते. फोन आला म्हणजे प्रत्येक मोबाईलवर एकच रिंग वाजायची. ट्रिंगग ग ग ग ग ग………अशी. मग मोबाईल क्रांती झाली. हि पण एक गम्मतच आहे बघा. हळू हळू जास् जसे जग प्रगती करत आहे तास तसे शब्दांचे अर्थ हि बदलत चालले आहे. पूर्वी क्रांती शब्द कानावर पडला की अंगातील रक्त सळसळायच. क्रांती म्हणजे एखादे युध्द डोळ्यासमोर उभ राहायचं. जसे १८५७ ची क्रांती. मध्यंतरीच्या काळात क्रांतीचा अर्थ थोडा सौम्य झाला. जसे एखाद्या सरकारी धोरणाला विरोध करायचा मोर्चा काढायचा म्हणजे क्रांती झाली असे वाटायला लागायचे. आणि आता त्याचा अर्थ पुर्णच बदलून गेलाय. प्रथम टी.व्ही. च्या क्षेत्रात क्रांती झाली. मग संगणक क्रांती झाली. मग मोबाईल आले. हळू हळू मोबाईल क्षेत्रात क्रांती झाली. असो. विषय जरा भरकटलाय. क्षमा असावी.

तर आपण मोबाईलच्या क्रांती बद्दल बोलत होतो. तो पूर्वीचा ट्रिंगग ग ग ग ग ग…….चा आवाज झपाट्याने मागे पडला आणि ट्यून सुरु झाल्या आणि मग नवी क्रांती झाली आणि फिल्मी गाणे वाजायला लागले. जो पर्यंत ट्रिंगग ग ग ग ग ग……. होत तो पर्यंत काही वाटत नव्हत. पण जेव्हा ट्यून व गाणे वाजायला लागले तेव्हा मात्र गम्मत व्हायला सुरुवात झाली.

ती कशी असे विचारताय? ऐका तर मग.

एकदा एक मनुष्य एका मयतीत गेला होता. स्मशानात अंतिम क्रिया कर्म सुरु होते. तितक्यात ‘ व्हाय दिस कोलावरी दी’ ह्या गाण्याचे सूर ऐकू आले. एका मोबाईलची रिंग टोन होती ती. सर्वी मंडळी त्या आवाजाकडे बघू लागली. दु:खाचे वातावरण अचानक बदलले. पण ती जागा आनंदाची नव्हती म्हणून सर्व गप्प राहिले. कोणी तरी म्हणाल ‘अरे आपण कोठे आलो आहोत याचे तरी भान ठेवत चला जरा.’

झाल आता दुसऱ्याने विषय पुढे रेटून न्यायचे ठरवले आणि म्हणाला,’अहो बिचारा इतक्या दुखात होता की मोबाईल स्वीच ऑफ करायचा विसरला.’

तिसरा कोठे थांबणार होता. तो म्हणाला, ‘ते ठीक आहे हो, पण कमीत कमीत साईलेंट मोड वर तरी ठेवावा मोबाईल.’

चौथा इसम मोबाईल वरील रिंग वाजली होती तो होता. तो मनात म्हणाला , अरे बाप रे. ही चर्चा आपण कोठे आहोत याचे भान न ठेवता पुढे सुरुच आहे. शेवटी त्याने पुढाकार घेतला आणि म्हणाला, ‘ मी सर्वांची माफी मागतो आणि या पुढे माझ्या मोबाईलवर फक्त ट्रिंगग ग ग ग ग ग……. हीच रिंग टोन राहील याची काळजी घेईल. कृपा करून चर्चा थांबवा.’ तेव्हा सर्व गप्पा बसले. तर मंडळी असे आहे हे आधुनिक मोबाईलचे जग.