धन्यवाद मित्रांनो!

आताच मी एक छोटी-सी पोस्ट टाकली आणि समजल की माझ्या मनावर ती ३६५ वी पोस्ट होती. म्हणजे एक वर्षा एव्हढी मोठी!!! बघता बघता फार मोठा काळ निघुन गेल्या सारखे वाटले.  मी पोळ्याच्या दिवशी २० ऒगष्ट २००९ रोजी कन्येच्या मदतीने हा ब्लॊग सुरु केला. आणि आज ३६५ पोस्ट पुर्ण झाल्या. अत्यानंद होत आहे मला हे बघुन. सर्व ब्लॊग मित्त्रांचे मनापासुन आभार. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हा ब्लॊग मी सुरु ठेवला आणि ३६५ पोस्ट लिहु शकलो.

आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या मनावरिल पोल वर एकुण ५७१ लोकांनी मतदान केले आहे. त्यापैकी अति उत्कृष्ठ २१८  म्हणजे ३८.१८%, उत्कृष्ठ १७६ म्हणजे ३०.८२% आणि छान वर ३१% म्हणजे १७७ इतके मत पडली आहेत. याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद!