संयोग …………….


सध्या आमच्या घरातील वातावरण खूप वेगळ आहे. परवा खूप आनंद होता. अगदी गदगदायला होत होत आणि दोनच दिवसांनी वातावरण तंग झालं. माफ करा पण मी काही खाजगी गोष्टी शेअर करत असतो. जे कदाचित सर्वांना आवडत नसेल. पण मला नेहमी प्रसंग जोडायची आवड आहे. असाच एक प्रसंग.

झाल अस की कन्येने पी.एच.डी. साठी पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली होती. दोन स्तरावरील परीक्षा तीने पार केल्या. आणि आम्ही अगदी अत्यानंदाने  भारावून गेलो. पण पी.एच.डी. करता करता ३-४ वर्ष निघून जातील. फार मोठा काळ आहे हा. हे मनात आले आणि मनावरील ताण वाढला. असो आजच सायंकाळी ती विद्यापीठातून घरी आली आणि त्याच गोष्ठी सुरु होत्या. तेव्हा माझ्या मनातील पी.एच.डी. करायची सुप्त इच्छा जागृत झाली. मनात येऊन गेले की आपण एक वेगळ्या विषयावर पी.एच.डी. का करू नये? तो विषय असा की पौराणिक काळात म्हणजे रामायण महाभारताच्या काळात जी विविध प्रकारची आयुध वापरली जायची; ज्यात विमान एक होते, यांचा अभ्यास करावा. थोड्या वेळाने सौ.ने वाचनालयातून पुस्तक बदलून आणा असा आदेश फर्मावला. सौ. च्या आदेशापुढे श्रींचे कधी चालले आहे का? ( आणि मी नाही कसा म्हणणार कारण मला बाहेर पडायला कारण हवेच असते. सिगारेट ओढायला.) मी ग्रंथालयात गेलो आणि पुस्तक चाळता-चाळता माझ्या हाती एक छानस पुअस्तक लागल. शीर्षक वेगळाच होता. “देवांच्या राज्यात” लेखक “राजेंद्र खरे” मुख पृष्ठावरच लिहील आहे,” देवांच्या राज्यातून प्रवास करत आनंद मार्गी जीवनाचा वेध घेणारं अनोख पुस्तक” खरोखर अनोख पुस्तक हाती पडल होत. घरी आल्यावर थोड चाळल तर पुस्तक आणण्यापूर्वी जे विचार मनात घोळत होते अगदी त्याच विषयाच पुस्तक होत हे जाणवलं. याला संयोग म्हणायचं की आणखी काही. अस माझ्या बाबतीत नेहमीच घडत. कदाचित इतरांच्या बाबतीत ही घडत असेल.

हा माझा खूप आवडता विषय. मग मी सौ. ला बसवलं आणि आपल प्रवचन सुरु केल. काही परिच्छेद वाचून दाखविले. त्यातील एक येथे देत आहे.

“अनेक उपासक भ्रामरी,ओंकाराच अथवा मंत्रांच विशिष्ट लयीन,आघातान उच्चार करून त्या प्रांतात जाण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे मेंदू अक्षरश: charged होतो,प्रभारित होतो. संपूर्ण शरीर प्रभारित होत.वैत विचार, नकारात्मक विचार त्यामुळे दूर होतात. सातत्यान भ्रमारीचा अभ्यास केला तर एक वेळ अशी येते की उपासकाला दिव्यानुभूती मिळून जाते.” “मंत्रांच प्रतिदिन धीरगंभीर खर्ज स्वरात उच्चारण  केल तर अतिशय प्रभावी, आल्हाददायक, उत्साहवर्धक सकारात्मक कंपनं सभोबाती निर्माण होतात. घरातील वातावरण प्रसन्न बनून जात. वाईट विचार, दुष्ट लहरी नाहीशा होतात.”

याबद्दल मला माझ्या मित्राने सांगितलेला एक प्रसंग आठवला. मित्राने सांगितले की तो कोकणात नौकरीला होता. कुटुंब सोबत नव्हते. सर्व एकटेच होते. एकदा ते सर्व मित्र कोठे जंगलात गेले. फिटर असतांना त्यांच्या पैकी एक मित्र अचानक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तो केव्हा गायब झाला हे समजले नाही. सर्व घाबरले आणि त्याला शोधायला लागले. लांबून त्यांना एक नाद ऐकायला येऊ लागला. हळूहळू ते त्या नादाकडे जाऊ लागले. जवळ गेल्यावर त्यांना ओंकार सुरु असल्याचे ऐकू आले. तेथे एक देऊळ होते. देऊलासामोरचे दृश्य बघून ते चकित झाले. देऊलासमोर त्यांचा मित्र बसलेला होता पण जमिनीवर नव्हे तो जमिनीपासून साधारण पाने २ फुट वर होता. म्हणजे अधांतरी. हे जवळ गेले आणि त्याची तंद्री मोडली. तसा तो जमिनीवर येऊ लागला. ह्या मंत्रात इतकी शक्ती आहे. माझे म्हणणे असे आहे की मंत्रात नव्हे तर तल्लीनतेत इतकी शक्ती आहे. तुम्ही कोणतेही काम पूर्ण आत्मीयतेने व तल्लीनतेने केले तर फळ निश्चितच चांगले मिळते.

असो विषय खूप भरकटला आहे. आणखी ही काही सांगायचे होते पण पुनः कधी तरी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s