युरेका!

मित्रांनो मी माझ्या मनावर पोल चे बटन टाकले होते. आतापर्यंत त्यावर एकूण ६०० मत पडली आहेत. त्यापैकी छान वर १८८  म्हणजे ३१.३३% वाचकांनी मतदान केले आहे. उत्त्कृष्ट वर १८७ म्हणजेच ३१.१७% मतदान झाले असून अति उत्कृष्ट वर सर्वात जास्त २२५ म्हणजेच ३७.५% मतदान नोंदले गेले आहे. माझ्या मनाला अभिमान वाटत आहे व आपणा सर्व वाचक मित्रांचे माझ्या मनातर्फे आभार!

पुनः पुनः “माझ्या मना”वर भेट देऊन प्रोत्साहन द्याल ही अपेक्षा बाळगतो आहोत. आभारी आहे!

लाक्षागृह!

कधी कधी आपणाला जे दिसत तस प्रत्यक्ष नसत, पण जे नसत तेच दिसत. ही जुनी म्हण आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. कधी कधी तर काही ही नसत पण आपल्याला सर्व काही दिसत असत. अस कधी होत जेव्हा आपल मन आपल्याला तस बघण्यासाठी भाग पाडत तेव्हा. अहो थोड कोठे पोटात दुखायला लागल की आपल्याला कधी तरी कोणी तरी एखाद्याबद्दल सांगितलेली गोष्ट लगेच ध्यानात येते. जसे त्या अमक्याला पोटात दुखत होत आणि दवाखान्यात नेल्यावर फोटो वगैरे काढून झाल्यावर डॉ. ने सांगितले होते की त्याला केंसर झाला आहे. आणि ते आठवल की मन सुरु होतात मनाचे खेळ. अहो आपल मन फारच भाबड असत. लगेच त्याच्या मागे धावत आणि मग  गुदमरायला होत. अस वाटत तो यमराज त्याच्या त्या अगडबंब रेड्यावर बसून भला मोठा दोरखंड घेऊन आपल्या दरीच येऊन उभा आहे आणि कोणत्या ही क्षणी आपल्याला उचलून नेईल. झोपेत नव्हे तर जागे पाणीसुद्धा आपल्याला तो यमराज दिसतो खरोखर. असा अनुभव कदाचित प्रत्येकाला येत असेल. मी घेतलेला आहे. म्हणून सांगतो. पण मग मी मन घट्ट केले. काय होईल ते बघू . यम जरी येऊन ठाकला तरी त्याला परतवून लाऊ असा विचार मनात आला आणि मग काय विचारूच नका.

असो मुख्य मुद्दा हा नव्हे. खूप दिवसांनी माझ्या मनावर लिहीत आहे. लेखाचे नाव लाक्षागृह असे ठेवले आहे. त्याचा अर्थ सर्वांना ठाऊक असणारच. कौरवांनी पाण्डवांसाठी तयार केलेली लाक्षागृह ही एक अशी   वास्तू होती की ज्यात जाण्यासाठी पांडव आतुर झाले पण ती जशी होती तशी ती नव्हती. ती सुंदर होती पण भ्रम होती. ते त्यांना थोड्याच वेळात कळल.

महाभारत काळातील ही गोष्ठ वाचून असे वाटते की आपले पूर्वज किती प्रगत होते. असो असेच लाक्षागृह एका कलाकाराने रेखाटले आहे. तेही रस्त्यावर. 3 D Painting द्वारे. काळ परवा अचानक फेस बुक वर मला ते दिसले. त्या कलाकाराच्या साईट वर जाऊन भेट दिली आणि काही चित्र येथे टाकत आहे. कल्पना करवत नाही की त्या रस्त्यावर चालत असतांना कसे वाटत असावे. समोर खड्डा दिसत असेल. तोल चुकला आपण त्या खड्ड्यात पडू अशी सारखी भीती ह्या हळव्या मनाला वाटत असेल. जास्त हलवा मनुष्य असेल त्याला अशा खड्ड्यात आपण पडलो असे जाणवून त्याला हृदय विकाराचा झटका आल्याशिवाय राहणार नाही. बघा तर मग. पण जरा जपून. आप आपले हृदय सांभाळा. चुकून खड्ड्यात पडू नका कारण खड्डा इतका खोल आहे की कोणी बाहे कडू शकणार नाही.

त्या ब्लॉग ची लिंक : http://www.hongkiat.com/blog/

अग बाई जरा जपून!