लेक टेपिंग- एक सुखद अनुभव

काल दि.२५/०४/२०१२ रोजी आपल्या महाराष्ट्रासाठी मनाचा तुरा असलेल्या कोयना प्रकल्पावर एक अतिविशिष्ट घटना घडली ज्याचा मी स्वतः साक्षीदार राहिलो. मी आपल्या डोळ्यांनी टी घटना घडतांना बघितली. टी म्हणजे कोयना येथे दुसऱ्यांदा झालेली लेक टेपिंग. पहिली १९९९ मध्ये झाली होती. मला अभिमान वाटतो की मी ह्या घटनेचा साक्षीदार राहिलो.

मी ह्या कामाशी निगडीत असल्याने मला लेक टेपिंग म्हणजे काय हे माहित आहे. पण बऱ्याच मंडळींना ह्याचा अर्थ काय हा प्रश्न पडला असेल. म्हणून मी ही पोस्ट लिहीत आहे.

लेक टेपिंगचा शाब्दिक अर्थ असा होईल. लेक म्हणजे जलाशय/सरोवर. आणि टेपिंग म्हणजे छिद्र पाडणे. होय हाच त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. पाण्याच्या अगडबंब अशा अतिभव्य जलाशयाला जमिनीतून भगदाड पाडणे म्हणजेच लेक टेपिंग.

सध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर असे सांगता येईल की एखाद्या पाणी साठवायच्या टाकीला भोक पाडून नळ बसविणे. फरक इतकाच असतो की आपण टाकीला भोक पाडून नंतर नळ बसवितो आणि येथे आधी नळ बसवितो व नंतर भोक पडतो.

हे ह्या खालील चित्रावरून अगदी सहज समजून येईल.ह्या चित्रामध्ये एक पाण्याचा तलाव दिसत आहे. त्या तलावाच्या खालून एक बोगदा तयार करून तलावाच्या तळाशी आणला जातो. पण तलावामध्ये पाणी असल्याने त्या पाण्याच्या दाबाने छिद्र पडू नये म्हणून एका ठराविक जाडीचा खडक तसाच ठेवला जातो.तो खडक येथे काळ्या रंगाने दर्शविण्यात आला आहे. ह्याच काळ्या खडकात स्फोटक लावून त्याला उडविले जाते. ते खाली पाण्यात पडते आणि पाण्याचा प्रवाह सुरु होतो.

हे अतिकौशल्याचे काम आहे म्हणून ह्या कामात सहभागी सर्व अभियंते व इतर सर्वांचे मनापासून अभिनंदन करायला हवे.

This slideshow requires JavaScript.

 

भू-कंप!मला झालेली पूर्व-जाणीव!

काल रात्री सुमारे ११ वाजता आम्ही घरात गप्पा मारत बसलो होतो. मी,सौ. आणि तिच्या भावाचा मुलगा सध्या आमच्या येथे पाहुणा म्हणून आला आहे, आणि आमची कन्या जीवनिका नेट वर काही काम करत बसली होती. मी सोफ्यावर रेंगाळलो होतो. शेजारी पाहुणा मुलगा बसला होता. सौ. जमिनीवर बसली होती. अचानक मला सोफा हलल्याची जाणीव झाली. मी पाहुण्याला विचारले की तू पाय हलवत आहेस का? तो नाही म्हणाला, मी ही बगितले की तो काही पाय हलवीत नाहीये. मग सोफा का हलतोय. मी लगेच त्यांना म्हणालो अरे भूकंप होतोय! क्षणात उठलो खिडकीतून बघितले. बाहेर बघून काहीच जाणीव झाली नाही. मी सर्वांना म्हटले हा नक्की भूकंपाच होता. टी.व्ही.वर बातम्या पहिल्या कुठे काही बातमी आहे का? सर्व हिंदी मराठी चेनाल्स पाहून झाले. पण काही माग्मोस लागला नाही. मनात आले एखाद्या वर्तमान पात्राच्या कार्यालयात फोन करून विचारावे. पण लोकं आपल्याला वेड्यात काढतील असे समजून तो विचार ही मनातून काढला. मग मी पाहुण्यासोबत सोफा का हलला असेल याचे विश्लेषण करू लागलो. लाकडी व वजनदार सोफा असल्याने पाय हलविल्याने तो हलणार नाही याची खात्री केली. आणि विसरून झोपलो. आज सकाळी टी.व्ही.वर बातमी आली की ११ वाजता सातारा येथे भूकंप झाला. तो पुण्यात ही जाणवला. ४.७ स्केलचा भूकंप. पण ह्या वेळेला मी घरात नव्हतो. मी मॉल मध्ये खरेदी करायला गेलो होतो. घरी आल्यावर कन्येने मला सांगितले.  म्हणजे मला भूकंप येण्यापूर्वी त्याची जाणीव झाली होती तर.

हे माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वी खूप वेळा असे झाले आहे. ज्या ज्या वेळी मी जमिनीवर झोपलो असेल. किंवा पलंगावर झोपलो असेल म्हणजे असे की येण केन प्रकारे माझ्या डोक्याचा स्पर्श अशा वस्तूशी असेल जी जमिनीला अटेच असेल तर मला भूकंप येत असल्याची पूर्व जाणीव होते. प्रत्येक वेळा घरच्यांना सांगतो ही. प्रत्येक वेळा असे झाले आहे. मला जाणीव झाली त्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचली.

ही गोष्ट कोणी स्वीकृत करो अगर न करो, कोणाला पटो अगर न पटो पण माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. या पुढे जर अशी जाणीव झाली तर मी पहिल्यांदा वृत्तपत्र कार्यालयाकडे विचारणा करेल.

अर्थ-जगात नैराश्य

आजच्या लोकसत्तेत एक महत्वपूर्ण बातमी वाचली. शेअर करावीशी वाटली व यावर माज्या मनातील विचार लिहावेसे वाटले म्हणून हा प्रपंच.

बातमी अर्थ जगताची आहे. शीर्षक ” धूर केवळ निराशेचा!”

देशाचा औद्योगिक उत्पादकता दर खूप खाली आला आहे. किती तर  एप्रिल ते फेबृअरी २०१२ यां कालावधीतील दर ३.५% आहे. पूर्वीच्या आर्थिक वर्षात तो ८.१% इतका होता. त्यातील ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ गेल्या वर्षीच्या १३.४% वरून थेट खाली घरंगळत येऊन ०.२% वर  पोहोचली आहे.

यावर मी विचार केला तर असे वाटले की याला महागाई जवाबदार आहे. महागाईमुळे जनता ग्राहकोपयोगी वस्तू घेईनासी झाली आहे. पण असे का झाले. महागाई इतकी का वाढली. मला वाटते महागाई ही माणसाच्या खिश्याच्या फुगवट्यावर अवलंबून असते. ज्या ज्या वेळी वर्तमान पत्रात पगार वाढीच्या बातम्या येतात तेव्हा बाजारात महागाई वाढते. मग महागाई वाढली म्हणून पुनः पगार वाढ होते. पुनः महागाई वाढते. असे हे चक्र चालूच राहते. पण मागच्या दशकापासून वर्तमान पत्रात फक्त कर्मचाऱ्यांचे पगार वाढले अशाच बातम्या येत आहेत असे नाही. आय टी च्या लोकांचे पगार किती आहेत, व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना किती कोटीचे पेकेज मिळाले असा बातम्या झळकतात. त्या कोण महिला आहेत त्यांना वर्ष्याचे वेतन म्हणे काही  कोटी मिळते.  मागच्या काही वर्ष्यातील बातम्या पहिल्या तर औद्योगिक क्षेत्रात जास्त वेतन देण्याची चढाओढ लागली आहे असे स्पष्ट दिसून येईल.

हायचे परिणाम काय होतील? जितके जास्त वेतन ती   कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला देईल त्या प्रमाणात त्यांच्या उत्पादनाच्या किमतीत वाढ होईल. आणि महागाई वाढेल. सांगायचा तात्पर्य की देशातील १% लोकं खुपच जास्त वेतन घेतात आणि त्या प्रमाणात बाजारात भाव वाढ होते. त्याचे परिणाम ९९% लोकांना भोगावे लागतात.

आता हे एक टक्का लोकं बाजारात जाऊन समजा टी.व्ही., फ्रीज, संगणक अशा वस्तू घेतील तर वाढलेल्या किमतीचे त्यांना काही वाटणार नाही. पण ९९% लोकांपैकी ५०% लोकं ह्या वस्तू भाववाढीमुळे  घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वस्तूचा खप कमी होईल. म्हणूनच ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ घटली असेल.

याचे परिणाम माझ्या मते असे होतील की आता भाव कमी केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. कारण प्रगती साठी खप महत्वाचा असतो किंमत नव्हे.

लोकसत्ता-१३-०४-२०१२

लोकसत्ता-१३-०४-२०१२