होय मित्रांनो हे माझे मत आहे. ज्या प्रकारे विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती, पैश्याची बचत म्हणजेच धनाची निर्मिती त्याच प्रकारे पाण्याची बचत म्हणजेच दुष्काळापासून सुटका. कशी ते आपण यापुढे बघू.
माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे की जी वस्तू त्याला मुबलक प्रमाणात मिळते ती तो मुबलक प्रमाणातच खर्च करतो. ज्यांना बचतीची सवय असते त्यांना बघा म्हातारपणी सुध्दा आनंदात जगतात. पैश्याची चणचण भासत नाही.
त्याचप्रमाणे आपण जेव्हा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते तेव्हा खूप वाया घालावीत असतो. तेच पाणी जर आपण सांभाळून खर्च केले तर धरणात पाणी साठा शिल्लक राहील. धरणात पाणी शिल्लक राहिले तर जवळपासच्या जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होणार नाही. दुसर्यावर्षी पाऊस आला तर धरण लवकर भरेल. धरण लवकर भरले तर धरणाचे दरवाजे उघडावे लागतील. दरवाजे उघडले तर धरणाखालील जमिनीला मुबलक पाणी मिळेल. त्याने तेथील जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. असे दर वर्षी होत राहील आणि ४-५ वर्षांनी सर्व दूर पाणीच पाणी राहील. दुष्काळाचा प्रश्नच उरणार नाही.
मित्रांनो देवाने पंच महाभूतें तयार केली आहेत ण त्यांचा उपयोग ओळखा. ती माणसाची आवश्यकता पाहूनच तयार केली आहे. माती सुध्दा माणसासाठीच तयार केली आहे. म्हणूनच ती पाण्याचे शोषण करते व त्याला रोखून धरते. पण आपण त्याचे महत्व ओळखत नाही. पाण्याचे महत्व ओळखा. पाणी जिरविणे फार आवश्यक आहे.
पिंगबॅक आजची पाण्याची बचत उद्याच्या दुष्काळापासून सुटका. | माझ चुकलच