निसर्गसुंदर कोंकण-भाग-१

खरोखर कोकण आपलंच वाटत. परवा पहिल्यांदा कोकणाचा प्रवास केला आणि मी कोकणाच्या प्रेमात पडलो. राज्यात इतर भागात उष्णतेने लाही लाही होत आहे, कोरड पडली आहे, लांब लांब पर्यंत हिरवळीचा ठाव ठिकाण दिसून येत नाही आणि कोकण उन्हाळ्यात सुध्दा हिराव गार बघून मन प्रसन्न झाल.

ह्यावेळी कामानिमित्त कोकणाचा दौरा केला. पुणे-सातारा-कोल्हापूर आणि तेथून आत शिरलो. राधानगरी-फोंडाघाट-आणि कणकवली असा प्रवास केला. प्रवासात खूप आनंद मिळाला. कोल्हापूरला प्रथमच गेलो होतो. देवीचे दर्शन करावेसे खूप वाटत होते पण वेळ नव्हता. देवीची क्षमा मागितली. आणि कोल्हापुरात प्रवेश केला. राधानागारीला जाण्यासाठी रंकाळा तालावाजावळून जावे लागते असे विचारल्यावर कळाले. रंकाळा तलावाला कोल्हापुरातील चौपाटी म्हणून ही ओळखले जाते. शहरातून पव्रास करणे महाकठीण काम असते. कसे तरी कोल्हापूर पार केले. ऐतिहासिक तलावाजवळून पुढे निघालो.

पुढे राधानगरी गाव लागले आणि मग फोंडाघाट. २५-३० किलोमीटरचा तो घाट. घाट सुरु होताच एक छोटेसे होटेल लागले. तेथे जेवण घेतले. आणि पुढे निघालो. फोंडाघाट संपेस्तोवर एक ही गाव नाही की मध्ये होटेल नाही. बरे झाले आधीच जेवण करून घेतले होते. मनात नको ते विचार घोळत होते. अशा वेळी जंगलात अचानक गाडी बंद पडली किंवा पंचर  झाली तर सहाय्यता कोणाची घ्यायची. असो पण घाट अप्रतिम चहुकडे हिरवळच हिरवळ. ऐन उन्हाळ्यात असे दृश्य पहावयास मिळत नाही.