बस एक दोन दिवस आणखी………………

आज येईल उद्या येईल करत करत जूलै संपला पण तो अजून ही वाटच पाहायला लावत आहे. ते म्हणतात बस आणखी दोन तीन दिवस वाट पहा. असा नेहमी अनुभव येतो एखादी गोष्ट घडण्यापूर्वीच आपण काही बोललो म्हणजे निगेटिव्ह तर ती घडत नाही आणि मग सर्व म्हणतात की नाट लागली. बस असेच पावसाचे होत असते. प्रत्येक वर्षी ते म्हणतात उद्या  जोरदार पाऊस पडेल आणि तो रुसून पुढे निघून जातो.

यावरून एक गोष्ट आठवली. माझ्या मित्राच्या मित्राचा एक मित्र आहे. त्याचे नाव आठवत नाही पण आपण त्याला अमक्या म्हणू या. त्याने एकदा त्याच्या एका मित्राची गम्मत सांगितली. त्याचा मित्र ढमक्या हा मौसम विभागात आहे.

दर वर्षाला पावसाचा आणि बातम्यांचा लपंडाव पाहून एकदा अमक्या त्या ढमक्याला म्हणाला, ” काय मित्र ह्या वर्षी पावसाचे काय भाकीत आहे?”

तो,” अरे ह्या वर्षी पाऊस अगदी वेळेवर म्हणजे ७ जूनला येईलच. बघ तू !”

हा,” काय म्हणतो?”

तो, “बिलकुल! मी स्वतः अभ्यास केला आहे.”

हा,” देव तुझ भल करो!”

अहो आश्चर्यम! ६ जून पासूनच आकाशात काळे ढग जमायला लागले. त्या रात्री ते दोघे सोबत जेवण घेत असतांना अमक्याने त्याची मनापासून स्तुती केली. तुझे भाकीत अगदी खरे होणार आहे. तंतोतंत.

रात्री १२ नंतर खरोखर मुसळधार पाऊस पडला.अमक्याने  अभिमानाने कॉलर वर हात फिरवला. त्याच्या बायकोने त्याला पाहिले आणि  “सकाळी बघू  आता झोपा गुपचूप”.

सकाळी उठल्यावर तो पाय मोकळे करायला बाहेर अंगणात आला आणि वर पाहिले तर निळेशार आकाश. त्याच्या पाठोपाठ त्याची बायको पण आली आणि ” पाहिलात वरती” तो बिचारा काय बोलणार. पण मित्राची पाठराखण करण्यासाठी तो म्हणाला, ” तु नाट लावली.”

यावर्षी अशीच कोणाची तरी नाट लागलेली दिसते. म्हणूनच तर पाऊस रुसून बसला आहे. रोज सकाळी उठल्यावर मी खिडकीतून वर पाहतो. काळेशार ढग दिसतात आणि जास् जसा सूर्य वर यायला लागतो ती ढग कमी होऊ लागतात आणि उन पडते. असे आणखी किती दिवस चालणार?

पावसाची बोंब- माझी एक कल्पना!!!

आपल्या देशाची संरचना विशिष्ट प्रकारची आहे. त्यामुळे आपल्या देशात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आढळतात. मित्रांनो मागील काही वर्षापासून मी असे निरीक्षण केले आहे की आपल्याकडील हे ऋतू आपल्या ठराविक वेळेपेक्षा पुढे सरकू लागले आहेत. सन २००९ मध्ये सुध्दा दुष्काळ पडला होता. आता लगेच २०१२ मध्ये विदारक दृश्य सध्या तरी दिसत आहे.( अजून ही आशा आहे की नोव्हेंबर पर्यंत पाऊस येऊ शकतो) २००९ मध्ये व त्यापूर्वी ही कृत्रिम पावसाचे प्रयोग आपल्याकडे झाले आहे. पण आपली एक वाईट सवय आहे ती अशी की आग लागली की विहीर खोदायला सरसावणे. खरे तर आग लागेलच अशी कल्पना करून विझविण्यासाठी आधीच तरतूद करून ठेवणे

मेघा बरसो रे भाई!

आवश्यक असते. पण ते कधीच होत नाही. सांगायचा तात्पर्य की कृत्रिम पावसाचे प्रयोग प्रत्येक वर्षी करणे किंवा त्यासाठी तयारी ठेवणे का आपण आवश्यक  समजत नाही. आपण दुष्काळ पडण्याची वाट का बघतो.

कृत्रिम पाऊसाचा प्रयोग

या वर्षीच बघा जून जुलै मध्ये खूप काळे ढग तयार होता आहेत. पाऊस येईल असे वाटते आणि ते ढग पाऊस न पडता पुढे निघून जातात. जर आधी पासून तयारी ठेवली असती तर जून अखेर पासून कृत्रिम पाऊसाचे प्रयोग करून पाऊस पडता आला असता. म्हणजे ढगांसोबत येऊन पुढे जाणारे पाणी वाया गेले नसते.( पण ते ढगांमधील पाणी नेमके कोठे जाते त्याचे काय होते याचा शोध लावायला हवा.)आता जुलै अखेर आली आहे व आता कृत्रिम पाऊस पडायची तयारी करायला सुरुवात केली तर फार उशीर होईल. पण तरीही निराश न होता आता ही प्रयोग करायला हरकत नाही असे माझे मत आहे. अन्यथा हे वर्ष खूप वाईट असेल असे वाटायला लागले आहे.( १२ डिसेंबर २०१२ आठवत आहे  का?)

असो, पण माझा मुळ मुद्दा वेगळाच आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढगांवर जे sodium iodide  किंवा जे  रसायन त्यांच्यावर सिम्पडावे लागते ते वर ढगांवर जाऊनच सिम्पडणे आवश्यक आहे का? ते आपण जमिनीवरून एखाद्या बॉम्ब च्या सहाय्याने का करू शकत नाही. असा एखादा बॉम्ब जो वर जाऊन  फुटेल आणि त्याचे जे आवरण असेल ते वरच विरघळून नाहीसे होईल. पावसाळी ढगाच्या काही भागावर जरी ते आढळले तर संपूर्ण ढगातील पाणी कोसळेल.

आणखी एक कल्पना आता हा लेख लिहत असतांनाच मला सुचली की आपल्या राज्यातील काही भाग असा आहे जेथे खुपच कमी प्रमाणात पाऊस पडतो. जसे मराठवाडा व इतर पठारी भाग. ह्या भागात पावसाळी ढग दर वर्षी येतात पण पाऊस कमी येतो. अशा भागात दर वर्षी ह्या बॉम्बचा उपयोग करून पाऊस पडला तर तेथील पाणी टंचाई नाहीसी होऊन कायमची डोकेदुखी निघून जाईल.

कृत्रिम पावसा बद्दलची  काही लिंक्स येथे देत आहे.

सन २००९ ची बातमी

Cloud_seeding

NASA makes their own rain clouds