तिच्या वेदना………

आसवांना सुध्दा अश्रू अनावर झाले,

जेव्हा त्यांनी तिचे दुख ऐकले,

तिच्या जन्माच्या वेळच्या वेदना

तिच्या आईला,

ज्या सोसवेना

पण त्याहुनी जास्त दुख आईला झाले,

जेव्हा आपल्यांनीच तिच्या पिल्लाला जिवंतपणी गाडले!

माझ्या मना ...

काल रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी पाहिले कि मी “सहजच” आकाशात “बेधुंद” होऊन उडत होतो. वरतुन मला “एक बिन भिंतीचे घर” दिसले. त्या घराच्या समोर एक मोठी फळी लावलेली दिसली ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेले होते “मराठी ब्लॉग विश्व” त्या घराच्या अंगणात जिकडे तिकडे “पाला पाचोडा” पसरलेला दिसला. अचानक  एक वाऱ्याचा  झोका आला आणि “मन उधाण” होऊन वाऱ्यासोबत उडू लागले. उडता उडता “थोडेसे मनातले” लिहावे ह्या हेतूने विचार करू लागलो आणि “काय वाटेल” ते लिहायला काय हरकत आहे असे उगाचच वाटून गेले. उडतांना खाली पडलेल्या पाला पाचोड्यावर सिंपडलेल्या “दवबिंदू” मधून सूर्य किरणांमुळे इंद्रधनू तयार झालेला दिसला आणि “माझिया मना”“स्पंदन” जाणवू लागली. इतक्यात त्या काल्पनिक इंद्रधनु भोवती एक भुंगा घिरट्या घालत आहे असे डोक्यात भुणभूणु लागले. त्यामुळे मी “ये रे मना ये रे मना” अशी हाक मारुन “माझ्या मना”ला बोलावु लागलो तेव्हा माझे मन मनातल्या मनात “हरे कृष्णा हरे कृष्णा” म्हणण्यात गुंतले होते. म्हणुन माझ्या तोंडुन अनायासे…

View original post 78 more words

अमुल्यतेचे मूल्य

जेव्हा पासून जगात आय टी क्षेत्राचा जन्म झाला आहे. रुपयांचे मूल्य अधोगतीला चालले आहे. सध्या कोटी रुपये म्हणजे काहीच नाही. आजच एक बातमी वाचण्यात आली गुगल आणि याहू यांच्या चढाओढीत याहू ने बाजी मारली आणि गुगल कडील एका अधिकाऱ्याला वर्षाला चक्क ५ कोटी ८० लक्ष डॉलर पगार देऊ केला. यांचे रुपये किती हे करायच्या विचारानेच मला धडकी  भरली. आजचे एक डॉलरचे मूल्य ५२.६०  रु. असे होते. ह्या दराने ह्या माणसाचा वर्षाचा पगार काढणे अवघड वाटते. पण एक लक्ष डॉलर म्हणजे ५२.६३ लक्ष रु. ५८० लक्ष रु. म्हणजे ३०५०८ लक्ष रु. म्हणजे वर्षाचा एका माणसाचा पगार ३०५.०८ कोटी रु.  एका महिन्याचा पगार २५.४२ कोटी आणि रोजचा पगार ८४ लक्ष रु. बाप रे. मला वाटते मी हजारो वर्ष जगलो किंवा हजारो जन्म घेतले तरी इतका पगार मिळविणे मला शक्य नाही.

आजच दुसरी एक बातमी वाचली की सिटी ग्रुप ला मागील तिमाहीच्या जवळ जवळ ८८% कमी नफा  झाल्याने विक्रम पंडित यांनी राजीनामा दिला.

किती विरोधाभास वाटतो नाही ह्या दोन बातम्यांमध्ये. हे जगात काय चालले आहे? कोणी सांगेल का? कोटी पेक्षा कमीचे शब्द कोणाच्या ही तोंडून निघत नसल्याने कोटी ह्या शब्दाचे मूल्यच कमी झाले आहे.

 

१०० रुपयाचे महत्व

नुकतीच दिल्लीत एक घटना घडली ती अशी की एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला फक्त उसने घेतलेले १०० रुपये परत केले नाही म्हणून. ही एक शोकांतिकाच वाटली. मन अक्षरश: रडायला लागले. प्रथमत: असे वाटले असा कसा तो मित्र फक्त १००/- रु. साठी आपल्याच मित्राला मारले? पण नंतर मन शांत झाल्यावर विचार केला तर चित्र वेगळेच निर्माण झाले.

मित्रांनो, साधारण  एक दशक भरापूर्वी १००/- रुपयाला आपल्याकडे खूप महत्व होते. त्याचे कारण असे की तेव्हा लोकांचे पगार मुख्यत: चार किंवा पाच आकडी होते. तेही कसे तर पाच आकडी पगार ३०-४० अगर जास्तीत जास्त ५० हजारापर्यंत. नंतर वर्तमान पत्रातून बातम्या झळकायला लागल्या. याचा पगार ७०,०००/- माग १,००,०००/- माग ५,००,०००/- आणि आता मागील २-३ वर्षात तर कोटी मध्ये पगार मिळत असल्याच्या बातम्या वाचायला मिळायला लागल्या. माणसाची एक प्रवृत्ती असते की त्याच्या डोळ्यासमोर जी वस्तू दिसत असेल त्यापेक्षा मोठी जर समोर आली तर लहानचे महत्व संपून जाते. त्यामुळे आता ज्यांचे पगार लाखात आहेत त्यांना १००/- रुपयाचे महत्व ते काय. त्याच्या साठी १००/- रु. एक रुपयाच्या बरोबर आहे. उच्च वेतन वाल्याला बाजारात गेल्यावर भाजीवाल्याने १००/- पाव ह्या भावाने भाजी दिली तरी त्याला काही वाटणार नाही. पण एखाद्या गरिबाला ह्या भावात भाजी घेता येईल का? सांगायचा तात्पर्य असा  की आज ही १००/- रुपये गरिबांसाठी मोठी रक्कम आहे.

ह्या मोठ्या मंडळींचे वेतन वाढते. त्याप्रमाणात बाजारातील भाव वाढ असते. आज बाजारात साखर ४०/- किलो आहे. जेव्हा १०,०००,००० रुपये वेतन घेणारा हीच साखर विकत घेतो त्याला दुकानदार ४०/- भावनेच साखर विकतो. म्हणजे १ कोटी, ४० लाख, १० लाख १ लाख वार्षिक वेतन घेणारे चार ग्राहक एका दुकानात साखर घ्यायला जातं तेव्हा चौघांना ४०/- रुपये भावानेच दुकानदार साखर विकतो. दुकानदार विचारात नाही की बाबा तुला पगार किती आहे? कमी पगार असेल तर तुला स्वस्त देतो जास्त असेल त्याला महाग देतो. जसे आता नवीन धोरण सुरु केले आहे – गेस सिलिंडर बाबत.

मला वाटते आता पगार बघून सर्व वस्तूंचे भाव ठरवायला हवेत. महिन्याला १ लाख पगार त्याला साखर १००/-.

५०००/- पगार त्याला साखर २०/- किलो. कसे वाटले?