2012 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2012 annual report for this blog.

Here’s an excerpt:

4,329 films were submitted to the 2012 Cannes Film Festival. This blog had 23,000 views in 2012. If each view were a film, this blog would power 5 Film Festivals

Click here to see the complete report.

पुनवडी ते पुण्यनगरी……………..

आज मी रजा घेतली होती. कधी नव्हे ती आमची  कन्या आज बाहेर जायला तयार झाली. आम्ही तिघे. पुणे गावात म्हणजे सदाशिव पेठेत गेलो. विश्रामबागेत त्यांना काही खरेदी करायची होती. ती केली. खूप दिवसांची कन्येची इच्छा होती स्वेत शर्ट खरेदी करायची ती पूर्ण केली. सोबतच्या फोटोमध्ये तिच्या  अंगावर तो दिसतो आहे न  तो. 2012-12-28 18.30.18लगेचच घातला. थंडी होती म्हणून.

असो. तर सर्व खरेदी झाली आणि मनात आले की चला आज विश्रामबाग वाद आतून पाहू या. आत गेल्यावर ३ रु. तिकीट होते. आत प्रदर्शन होते  “पुनवडी ते पुण्यनगरी”.  प्रदर्श पाहायला सुरुवात केली आणि आपण सोळाव्या शतकात वावरत असल्यासारखे वाटले. अशा ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर का कुणास ठाऊक पण

सर्वांगात काही तरी संचारल्यासारखे जाणवते.

पुण्याचा इतिहास वाचून आनंद झाला आणि अभिमान ही वाटला. आपले पूर्वज खरे अभियंते होते. सोळाव्या

विश्रामबाग वाडा. बाजीराव रस्त्यावरून काढलेला फोटो.

विश्रामबाग वाडा. बाजीराव रस्त्यावरून काढलेला फोटो.

शतकात त्यांनी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी धारण बांधून कात्रज तलावाची निर्मिती केली होती. आणि हो जमिनीखालून गटारी बांधून पाणी पुरवठा करण्यात येत होता.

अहो, पाणी पुरवठा योजना करण्यासाठी पार्वतीला २५ एकरचा तलाव खोदकाम करून तयार करण्यात आला होता. असे दूरदर्शी होते आपले पूर्वज.

प्रवेशिका

प्रवेशिका

2012-12-28 18.36.40परत घरी येतांना घराजवळच रोड क्रोस करतांना एका  मोठ्या अपघातातून वाचलो.

झाले असे की रोड खूप मोठा  आहे.शहरात  वाहन खूप आहेत. आणि ६ ते ९ ह्या वेळेत अत्याधिक गर्दी असते. रस्ता कसं ओलांडावा हा प्रश्नच पडतो. आम्ही तिघे सोबत हो2012-12-28 18.30.37तो. शेजारी आणखी एक बाई थोडी वयस्कर रस्ता ओलांडायचा प्रयत्न करत होती. मी पहिले आणि त्यांच्या सोबतच माझ्या परिवाराला ओढतच नेले. आम्हाला पाहून वाहनांनी गती कमी केली. झाले अर्धा रस्ता ओलांडला. म्हणजे अर्धा गड जिंकलो. पण पुढचा अर्धा रस्ता ओलांडण्यासाठी पुन: त्या मातेकडे नजर टाकली. त्या बिनधास्त रस्ता ओलांडत होत्या. मी घरच्यांना सोबत त्या मातेच्या आसऱ्याने चालू लागलो. त्यावेळी समोरच्या बस थांब्यावर एक बस येऊन उभी होती. आणि आम्ही चौघे बस च्या समोरून रस्ता ओलांडत होतो. अचानक बस सुरु झाली आम्ही पाहिले बस चालकाचे आमच्याकडे लक्ष्य नव्हते. तो प्रवसी उतरले का ते पाहत होतं. आमच्या आत धडधड वाढली. मी त्याच्याकडे थांबण्यासाठी हात केला. इतके बरे झाले की तो चालक चांगला   होता. त्याने बस सुरु केली पण हाकली नव्हती. ब्रेक वरून पाय काढून बस पुढे नेतांना त्याने समोर पाहिले. आणि पुन: ब्रेक दाबला. नाही तर आम्ही सह परिवार ………………… देवाची कृपा झाली.

धन्यवाद देवा! तुझे लाख लाख उपकार आहेत आमच्यावर!