युवा दिनाच्या शुभेच्छा!

आजपासून  स्वामी विवेकानंदांचे  १५० वे  जयंतीवर्ष  सुरु झाले आहे. आजच्या दिवसाला युवा दिन म्हणून साजरा केला जातो. मला माहित नव्हते किंवा लक्षात नव्हते. पण मंगळवारी अचानक मी स्वामींची माझ्या संग्रहातली पुस्तक वाचायला काढली. आणि त्यातील एक जे मी कॉलेज मध्ये शिकत असतांना म्हणजे १९८१-८२ च्या दरम्यान विकत घेतले होते ते म्हणजे “कर्म योगा”. इंग्रजी मधील आहे. ह्या पुस्तकात स्वामींनी एका सद्गृहस्थाचे आपल्या घराप्रती, घरातील सदस्यांप्रती, आई, वडील, मूळ, मुली, पत्नी, भाऊ बहिण व इतर सर्व सदस्य, समाज, देश यांचे प्रति त्याचे काय कर्तव्य असते ते सविस्तर वर्णन केले आहे. त्यातील एक दोन पानाचे फोटोच मी माझ्या फेस बुक वर बुधवार व गुरुवारी टाकली होती. हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे असेच आहे.

स्वामींना शतश: प्रणाम! युवा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

ImageImageImage

//