“महागाईवर  एक संशोधन” –_भाग-२

मित्रांनो, नमस्कार!

बऱ्याच कालावधी नंतर मी पुन: माझ्या मनावर येत आहे. हल्ली वेळ मिळत नाही. क्षमस्व!

आपल्याला आठवत असेल की बरोबर दोन वर्षापूर्वी मी  “महागाईवर एक संशोधन” अशा नावाने एक पोस्ट टाकली. तारीख होती १४ जानेवारी २०११.

वाढत्या महागाई मुळेImage त्रस्त होऊन मी लिहिले होते(अजून ही महागाईचा चढता आलेख आहे) की काही काळानंतर शेतीसाठी जमीन उरली नाही किंवा जी थोडी पहार शिल्लक राहिली तर त्यावर उगवलेल्या पिकातून जसे कांदा, लसून, पावडर तयार करून किंवा त्यांचे फ्लेवर विकावे लागतील. मग आता जेवण करतांना जसे एक मिठाची डबी/ बाटली घेतो तशी कांद्याची बाटली, लसुणाची बाटली, इ. सोबत घेऊन बसावे लागेल. माझ्या ह्या पोस्ट ची दाखल “प्रहार” दैनिकाने घेतली होती.

मला वाटते. माझी ती पोस्ट वाचूनच त्या सदगृहस्थाने संशोधन केले असावे. आज सकाळी आमच्या घरी सकाळ आला व तो उघडता बरोबर एक कागद खाली पडला. तो वाचलं आणि मी अवाक झालो. कारण ते मी दोन वर्षापूर्वी माझ्या कल्पनाशक्तीने लिहिलेल्या एका कल्पनेचे साक्षात रूप होते. सोबत चे फोटो पाहा.  त्यांनी आलं, लसून, हिरवी मिरची, गावाती चहा यांच्या पावडर आता विकायला सुरुवात केली आहे. आहे की नाही गम्मत.

माळा आता वाटायला लागले आहे, की मी माझ्या कल्पनेतून उपजलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी  पेटंट घ्यावं. यापूर्वी ही असे झाले आहे. ते मी एका पोस्टमध्ये लिहिले आहेच.

 

//