साधारण एक दोन वर्षापूर्वी माझ्या मनात सहज येऊन गेले होते कि भविष्यातील टी.व्ही. एका पडद्या सारखा असेल . पाहिजे तेव्हा गुंडाळून ठेवायचा आणि उघडला कि बघायचा. याबद्दल माझ्यामनात असे हि आले होते कि आपल्या देश्यातल्या टी.व्ही. बनविणाऱ्या मोठ्या कंपनीला हि कल्पना सुचवायची. तशी मी सुरुवात हि केली होती. पण जीवन इतके व्यस्त आहे कि कुठलेच काम पूर्ण होत नाही. हि कल्पना मी मित्रांना आणि घरी मुलीला हि सांगितली होती. मला वाटते ब्लोग वर हि टाकली होती. आज लोकसत्तेमध्ये एक बातमी वाचली आणि कल्पना पुन: जागृत झाली. जपान मध्ये एका कंपनीने असा टी.व्ही. तयार केला आहे.