सारेच पत्रकार!!

मित्रांनो, आपल्या देशात १९९८ पर्यंत मोबाईल हा प्रकारच नव्हता. तेव्हा एस.टी.डी. वरून लाईन लावून गावी फोन करावे लागत असे. गावी सुध्दा घरी फोन नसायचा. मग ज्याच्या कडे असेल त्या शेजार्याला घरच्यांना बोलावयास सांगावे लागत असे. म्हणजे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधने फार कठीण होते. फोन लावल्यावर सुध्दा बिल जास्त होऊ नये म्हणून काळजी असायची आणि त्या काळजीतच संभाषण आटोपत घ्याव लागत असे. त्यामुळे काही -न-काही बोलणे राहून जात असे.

तत्पूर्वी तर फार वाईट परिस्थिती होती. मी १९८५ मध्ये शासकीय सेवेत लागलो तेव्हा कामानिमित्त परगावी फोन करावे लागत. ट्रंक कॉल बुक करावे लागत असे. जास्त घाई असल्यास लाईटनिंग कॉल करावे लागत असे. सकाळी बुक केलेला ट्रंक कॉल कधी कधी सायंकाळी लागत असे.

मी १९९८ मध्ये जपान च्या दौर्यावर गेलो होतो तो पर्यंत मोबाईल बद्दल फक्त वाचण्यात येत असे. पण जापान मध्ये गेल्यावर पहिल्यांदा लोकांच्या हातात मोबाईल बघितले तर कौतुक वाटले. जरी आमच्यासाठी मोबाईल नवीन होते तरी तेथे ते फारच जुने झाले होते. कारण आम्ही इलेक्ट्रोनिक मार्केट मध्ये फिरत असतांना आपल्याकडे जसे फुटपाथ वर खेळणी विकायला ठेवली असतात तशी तेथे जुनी पण चालू असलेली मोबाईल विकायला ठेवेलेली होती. १० येनला १ मोबाईल मिळत होता. येन हे जपान चे चलन. त्या वेळी एका येनला ०.३० रुपये होते. याप्रमाणे १० येन म्हणजे ३ रु. ३ रु. ला तो मोबाईल विकत घेता येत होता. मी त्याना २० येन दिले आणि २ मोबाईल द्या म्हणून विनंती केली. त्यांनी नकार दिला कारण त्या मोबाईलचा  भारतात उपयोग नव्हता आणि ते म्हणाले कि आम्ही फक्त जापानी लोकांनाच मोबाईल विकतो. 

Continue reading

सेवानिवृत्ती………………..

मित्रांनो,

मित्रांनो, जस जसी सेवा निवृत्तीची वेळ जवळ येत होती मला त्याची ओढ जाणवत होती. अस वाटायचं कस वाटेल सेवा निवृत्त नन्तर. कल्पना रंगवत तो दिवस आलाच. ३१/०५/२०१७. आणि मी सेवा निवृत्त झालो.आनंदी झालो……

पण आता पुढे काय? हा मोठा प्रश्न समोर येऊन उभा राहिला.

मागच्या  काही दिवसांपासून माझ्या अंतर्मनात  एक   प्रश्न घोळत  आहे. आपण जन्माला येतो. बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्य,प्रोढावस्था, म्हातारपण असे जगत जगत आपला अंत होतो. संपूर्ण आयुष्य झटत राहतो. आणि शेवटी खाली हाती या जगातून निघून जातो. काहीच घेऊन येत नाही व काहीच घेऊन हि जात नाही. मग आपण का आयुष्य भर झटत राहतो. आणि आपल्या पासून या जगाला काय मिळते. फक्त आपण मुल जन्माला घालतो व येतेच सोडून जातो इतकेच. इतकाच हातभार आपण या जगाला लावतो. मग मुळातच देवाने आपणाला म्हणजे मानवाला का जन्माला घटल असेल? काहीच कळत नाही.

ईश्वराने मुळातच हे जग का निर्माण केल असेल? काय हेतू असेल त्याचा हे जग निर्माण करण्यामागे? कोणा कडे असेल का याच उत्तर???????????? Continue reading