सारेच पत्रकार!!


मित्रांनो, आपल्या देशात १९९८ पर्यंत मोबाईल हा प्रकारच नव्हता. तेव्हा एस.टी.डी. वरून लाईन लावून गावी फोन करावे लागत असे. गावी सुध्दा घरी फोन नसायचा. मग ज्याच्या कडे असेल त्या शेजार्याला घरच्यांना बोलावयास सांगावे लागत असे. म्हणजे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधने फार कठीण होते. फोन लावल्यावर सुध्दा बिल जास्त होऊ नये म्हणून काळजी असायची आणि त्या काळजीतच संभाषण आटोपत घ्याव लागत असे. त्यामुळे काही -न-काही बोलणे राहून जात असे.

तत्पूर्वी तर फार वाईट परिस्थिती होती. मी १९८५ मध्ये शासकीय सेवेत लागलो तेव्हा कामानिमित्त परगावी फोन करावे लागत. ट्रंक कॉल बुक करावे लागत असे. जास्त घाई असल्यास लाईटनिंग कॉल करावे लागत असे. सकाळी बुक केलेला ट्रंक कॉल कधी कधी सायंकाळी लागत असे.

मी १९९८ मध्ये जपान च्या दौर्यावर गेलो होतो तो पर्यंत मोबाईल बद्दल फक्त वाचण्यात येत असे. पण जापान मध्ये गेल्यावर पहिल्यांदा लोकांच्या हातात मोबाईल बघितले तर कौतुक वाटले. जरी आमच्यासाठी मोबाईल नवीन होते तरी तेथे ते फारच जुने झाले होते. कारण आम्ही इलेक्ट्रोनिक मार्केट मध्ये फिरत असतांना आपल्याकडे जसे फुटपाथ वर खेळणी विकायला ठेवली असतात तशी तेथे जुनी पण चालू असलेली मोबाईल विकायला ठेवेलेली होती. १० येनला १ मोबाईल मिळत होता. येन हे जपान चे चलन. त्या वेळी एका येनला ०.३० रुपये होते. याप्रमाणे १० येन म्हणजे ३ रु. ३ रु. ला तो मोबाईल विकत घेता येत होता. मी त्याना २० येन दिले आणि २ मोबाईल द्या म्हणून विनंती केली. त्यांनी नकार दिला कारण त्या मोबाईलचा  भारतात उपयोग नव्हता आणि ते म्हणाले कि आम्ही फक्त जापानी लोकांनाच मोबाईल विकतो. 

Screenshot_1

तदनंतर आपल्याकडे लगेचच मोबाईल मिळायला सुरुवात झाली. मोठे एंटीना असलेले मोठ मोठे मोबाईल. दर सुध्दा रु.१८/- एका मिनिटाला. म्हणजे ती सामन्यांसाठी एक कल्पनाच होती.  जेव्हा आपल्याकडे Fibre Optic Cable टाकले गेले तेव्हा सर्रास मोबैल्चा वापर अर्थात दर कमी झाल्याने सुरु झाला.

पण मोबाईल संपर्क साधण्यासाठी ठीक होते. त्यानंतर मात्र त्यात इतर फिचर म्हणजे गाणे, केमेरा आणि बराच काही अंतर्भूत झाले आणि सर्वी त्याची रयाच गेली. खेळण होऊन बसला आहे आता मोबाईल. प्रत्येकाच्या हातात मोबाईल. Smart Phone आल्यावर तर लोकांना वेड लागल आहे. आणि हो सेल्फी ने तर तरुणीला वेड करून सोडलं आहे.

mobile

आपण बर्याच घटना Whatsapp, Face Book, TV किंवा इतर ठिकाणी बघत असतो. लोकं एखाद्याला मदत करण्यापेक्षा तो क्षण टिपण्यामध्ये व्यस्त असतात. आणि मग तो व्हिडीओ वायरल होतो कुठल्यातरी सोसियल मिडीयावर. मोबाईल चा अत्यधिक प्रसार झाल्यापासून सोसियल मिडीया चे पेव फुटले आहे. “वायरल” होणे ह्या नवीन शब्दाची उत्तपत्ती झाली आहे. “सेल्फी” हा शब्द हि नव्याने  जन्माला आहे.  असे बेच शब्द नव्याने जन्माला घातले गेले आहेत.

पण एक मात्र नक्की माणूस वर्चुअली जवळ आला आहे पण समोर एक मेकांशी बोलत सुध्दा नाही. माणसा-माणसातलं संभाषण कमी झालय.

मध्यंतरी बातमी आली होती कि हापूस  आंब्याची एक लॉरी पलटी झाली. लोकांनी सर्व आंबे लुटून नेले. लॉरी वाले कर्मचारी बिचारे मदतीसाठी विनवणी करीत राहिले पण कोणी हि त्यांना मदत केली नाही. अखेर ते म्हणाले बाबांनो आम्हाला मदत करू नका पण आंबे घेऊन जाऊ नका. पण कोणी हि त्यांचे ऐकले नाही.  त्या घटनेचा व्हीडीओ प्रसारित नाही नाही वायरल झाला. ह्या व्हीडीओ काढणारांनी तरी त्या अपघाती लोकांची प्रथम मदत केली असती तर त्यांना किती बरे वाटले असते.

दुर्घटना घडत असतांनाचा व्हीडीओ काढता आला तर किती छान अशी एक अमानवीय संकल्पना तयार झाली आहे असे दिसून येते. प्रत्येकालाच वाटते कि तो फोटोग्राफर झालेला आहे.

माझे मत मोबाईल फक्त संभाषणापुरात योग्य होता हो. त्यात इतर फिचर टाकून कंपन्यांनी लोकांना वेड करून टाकलंय.

असो,” ठेविले अनंते तैसेची राहावे मनी असू द्यावे समाधान. ”

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s