बँक व्यवहार

आता बँकेत गेल्यावर 20 वर्षापुर्वीचे दिवस आठवतातच. इंटरनेट सेवेमुळे बँकेत जायची गरज भासत नाही. बहुतेक व्यवहार घरून किंवा मोबाईल वरून करता येतात. क्वचितच गरज भासते. तेथे गेल्यावर सुद्धा टोकन घेतले की सोपे जाते. 

प्रदुषण

मित्रांनो, काल मी प्रदुषण एक उपाय ही पोस्ट टाकली होती. आज सकाळ मध्ये एक बातमी आली आहे. प्रदुषण झपाट्याने वाढत आहे असा जागतिक अहवाल आहे. तरी सर्वांनी ठरवले तर निश्चित काही प्रमाण कमी होऊ शकते. बातमी वाचा

प्रदुषण एक उपाय….

हल्ली मानसाला पायी चालायची सवयच राहिलेली नाही. अगदी जवळ जाण्यासाठी ही वाहन लागते. प्रत्येकाने विचार केला व 1-2 किमी पायी चालत भाजी इ. साठी गेले तर किती फायदे होतील बघा…

1. प्रकृति सुधारेल

2. प्रदुषण कमी होईल

3. इंधन वाचेल

4. वाहन जास्त दिवस टिकेल

5. पैशाची बचत होईल

आणखी बरेच काही

सुप्रभातम्

काळजातले भाव हे नजरेने बघुन कळत नसतात,
भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात,

मिळतात येथे माणसे लाखोनी, हजारोंनी,

 पण तुमच्यासारखी माणसे रोजरोज मिळत नसतात.

त्यासाठी फक्त “योग”असावे लागतात*

             ☀शुभ सकाळ ☀

थोडी विश्रांती

मित्रांनो, बर्याच कालावधी उलटून गेला आहे ह्या मध्यंतरीच्या काळात. शासकीय सेवेत असतांना काम काम आणि काम. कामात इतका व्यस्त होतो कि ३२ वर्ष कशी निघून गेली हे कळलेच नाही. या सेवेच्या काळात घराकडे हि पुरेशे लक्ष्य देता आले नाही. आता निवांत आहे. पण चिंता करायची इतकी सवय जडली आहे कि प्रत्येक लहान सहन गोष्टीची हि चिंता राहते.

असो आता मी पुन: आपल्या सेवेत हजर होत आहे.

मध्यंतरीच्या काळात ब्लॉग बद्दल सर्व विसरलो होतो. मी आणि तुम्ही सुध्दा. प्रथम मी माझ्या विविध ब्लॉग चा परिचय पुन: करून देऊ इच्छितो. तर माझ्या ब्लोग्स ची यादीच खाली देत आहे.

१) “माझ्या मना”                                     माझा मराठी विषयांचा ब्लॉग.                                        https://mazyamana.wordpress.com

2)Magic Maths          माझा गणिताचा विशेष ब्लॉग

https://rnk1.wordpress.com

3) My Blog            माझा इंग्रजी कविता व इतर विषयांचा  ब्लॉग                                  https://ownpoems.wordpress.com

4)मनराई        मनाच्या श्लोकांवर आधारित श्लोकांचा ब्लॉग                                           https://manachyakavita.wordpress.com

5)माझ चुकलच       समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दलचा ब्लॉग                                   https://ravindra1659.wordpress.com

6) ब्लॉग कल्लोळ          मित्रांच्या ब्लॉग बद्दल  माहिती   असलेला ब्लॉग                           https://blogvells.wordpress.com

7) निसर्ग                                                   https://koshtirn.wordpress.com

8) कुछ पल                                             माझा हिंदी कविता व इतर विषयांचा ब्लॉग                                           http://koshtiravindra.blogspot.in/

9)मला त्यांची घृणा वाटते     नावडत्या गोष्टी साठी समाज प्रबोधनपर विषय

https://ravindra-koshti.blogspot.in/