चिवचिवाट 

चिमण्या शोधून सापडत नाहीत. चिवचिवाट तर दूरच. म्हणून चिमणीच्या चिवचिवाट चा व्हिडिओ येथे पोस्ट टाकली आहे… .

https://m.youtube.com/watch?v=yraoBCl_Bco

कोयना भूकंप

आज या घटनेला 50 वर्ष झाले. मी तेव्हा म्हणजे 1967 मध्ये 8 वर्षांचा होतो. फैजपूर जि. जळगांव हे आमचे गांव. कोयनेपासून जवळ जवळ 1000 कि. मी. अंतरावर. परंतु सकाळी तिसर्या प्रहरी साखर झोपेत असतांना अचानक दाराची कडी जोरात वाजली. बाहेरून हितचिंतकांनी ही आवाज दिला व आम्ही लगेच बाहेर पडलो. त्यामुळे अनर्थ टळला. 

माझा संगणकीय प्रवास -एक अनुभव – भाग-१

मित्रांनो,

मला आठवते मी इंदोरला इन्जिनिअरिंगला असतांना आम्हाला संगणक म्हणजे Computer बद्दल जुजबी माहिती शिकवली होती.  Fortran-IV या Computer language चे पुस्तक सुध्दा होते. आज हि मी ते जतन करून ठेवले आहे. तशी इन्जिनिअरिंगची सर्वच  पुस्तकं माझ्या कडे आहेत. असो.  साधारण १९८० चा काळ असावा तो. आमच्या संगणक शिक्षकांनी आमच्या कोलेज जवळच असलेल्या एका कंपनीच्या कार्यालयात तेव्हा इंदोर मध्ये  एकमेव असलेला संगणक पहायला घेऊन गेले होते.

आम्हाला तो संगणक बघून आश्चर्यच झाल होत. भला मोठा संगणक होता तो. एका १२ x १२ च्या खोली मध्ये सामावणारी भली मोठी मशीनच होती ती. आताच्या संगणकाच्या तुलनेत म्हणायचे  झाले तर महाकाय संगणक म्हणता येईल त्याला. आता आपण पेन ड्राईव मध्ये किती तरी डेटा साठवू शकतो. तेव्हा थोडासा साठवण्यासाठी पूर्वी सिनेमा ची रीळ असायची तशी मोठी रिंग असायची magnetic tapeची. त्यावर माहिती साठवली जायची. त्यापूर्वी तर कागदी टेप असायचे. त्यावर पंचिंग करून माहिती साठवली जायची.

तदनंतर, मी मुंबईला आलो. अर्थात जॉब साठी. तेव्हा १९८४ मध्ये मी एका खाजगी कंपनीत Trainee Engineer म्हणून नौकरी पत्करली. त्यांनी तेव्हा बाहेरून Desk Top PC आणले होते. मला वाटते २ होते. तेही मुंबईमधील हेड ऑफिसमध्ये. नौकरी होती ठाणे येथे. तेथून प्रशिक्षणाला मुंबईला घेऊन जात असता. काही दिवस त्या PC वर काम केले. पण मला सरकारी नौकरी लागली व मी तो जॉब सोडला. तो माझा संगणकावरील कामाचा दुसरा अनुभव होता. तेव्हा Windows अस्तित्वात नव्हते.

सरकारी नौकरी लागल्यावर १९९१-९२ मध्ये आमच्या कार्यालयात संगणक आला होता. तेव्हा माझी पूर्वीपासून संगणकाची आवड असल्याने मी त्यावर काम करत होतोच इतरांना हि शिकवीत होतो.

प्रशिक्षण मात्र मी स्वत:च घेतले. म्हणजे स्वत: चालवून बघायचे आणि शिकायचे. त्यामुळे चांगला अनुभव आला.