सुगरण….

एक लहान सा पक्षी. पण अत्यंत बुद्धिमान. आपण दुर्लक्ष करतो यांच्याकडे. पण महान कवयित्री बहिणाबाई यांनी त्यांच्यावर एक छान गाणे रचले आहे. गाणे ऐका आणि सुगरणी चे कर्तृत्व ही बघा.

अरे संसार…….

अहो, तयारी करा. बाहेर जायचं आहे.

तिचा आदेश.

अग, आज सुटीचा दिवस. आराम करावासा वाटतो आहे.

आराम वाराम काही नाही. तयारी करा.

कणखर आवाजातील आदेश.

पर्याय नाही म्हणून तयार झालो.

चला. मी म्हटले.

अहो. अजून मी तयार होतेय.

अग पण तूच सांगितले लवकर तयार व्हायला.

थांबा. मी येते.

एक तास झाला बाहेर यायला तिला.

“चला.” ती.

“कोठे जायचे आहे? “मी विचारले.

“सांगते. गाडी काढा आधी.”

“तुम्ही चला तर.”

मी बाईक काढली.

रस्त्यावर गप्पा सुरू होत्या. गावात पोहोचलो. गाडी थांबवली.

“अहो येथे कोठे आणली गाडी? मला तर कापड बाजारात जायचे होते.”

अग पण तू मला सांगितलेच नाही.

तुम्ही विचारले कधी?

अग असे काय करते? मी विचारले होते.

असेल. पण परत परत विचारायचे.

अग तू……..

ते काही नाही. तूम्ही मला जोर लावून विचारले असते तर मी सांगितले नसते का? तुमचे असेच आहे. एक दिवस सुटी असते. त्याचा ही उपयोग होत नाही.

शेवटी बायको च खरी असे मनाला समजावून सांगितले आणि गप्प झालो.

अहो आता येथेच थांबणार का. चला.

मी किक मारली आणि कपडा बाजारात गाडी घेऊन जायला निघालो.

पुन्हा बडबड सुरु.

कपडा बाजार आला आणि अहो इकडे कोठे आला. आपल्याला घरी जायचे होते.

हे ईश्वर काय करावे काही सुचेना.

अग पण तूच इकडे जायचे म्हणाली होती न.

मी कधी म्हणाले असे.

बाप रे. शेवटी कंटाळून घराकडे वळालो….

ग्रिल्ड चिज…….

आज मुलीने आग्रह केला म्हणून सेंडविच घ्यायला गेलो. काका ४ प्रकारचे सेंडविच आहेत. तुम्हाला कोणतं देऊ. असे काऊंटर वरील मुलीने विचारले आणि मला हसावे का रडावे हेच कळेना. त्यात चिज असले पाहिजे.

ठिक आहे काका मी तुम्हाला ग्रिल्ड चिज सेंडविच देते.

दे बाबा काही तरी. सांगून मी एका बाकावर बसलो.

पण आपण किती अडाणी आहोत हे समजले☺️☺️

अंधारात चाचपडतांना……

अंधारात चाचपडतांना

सापडतात जुन्या आठवणी

दिसतात अनेक वदनं निनावी…..(१)

अंधारात चाचपडतांना

सापडतात धागे मैत्रीचे

पण आठवत नाही नाव त्या धाग्याला…..(२)

अंधारात चाचपडतांना

जीवनाचा एक धागा सापडतो

उर्वरित आयुष्य जगण्याची

आशा पुलकित ठेवण्यासाठी……….(३)