चालेल मला….

चालेल मला

तुझे ते निशब्द बोल

गालावरची खळी

आणि ओठांवरचे स्मित

करून टाकते जे

क्षणात मला अबोल

चालेल मला

तुझे ते निशब्द बोल…

मानव निर्मित चंद्र

आजच (१९/१०/२०१८) थोड्या वेळा पुर्वी टी.व्हि. वर मराठी बातमी पाहिली. चीन अवकाशात तीन आरसे पाठविणार आहे. ते चंद्र म्हणून. रात्री ही प्रकाश असणार आहे. म्हणजे वीज वापर नाही.
मित्रांनो, मी लहान असतांना हेच स्वप्न पाहिले होते. माझे लहानपणी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. याचा मला अतिशय आनंद होतोय.

माझे स्वप्न किंवा माझ्या कल्पना चुकीच्या नाहीच मुळी. जर मला शक्य झाले असते तर…

यापुर्वी ही मी याच ब्लॉगवर माझ्या बर्याच कल्पना मांडल्या आहेत.

यु ट्युब वर याबद्दल बर्याच लिंक उपलब्ध आहेत.

लिंक येथे देत आहे.

पाणी – जीवन

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणी ही जगु शकत नाही. म्हणुन पाणी वाचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

एकदा टुटु एके ठिकाणी गेला। त्यांच्या कडे दोन नळ होते. एक नगरपालिकेकडून पाण्याचा आणि दुसरा सोसायटी चा.

टुटुने उत्सुकता म्हणून विचारले” काका, हा नगरपालिकेचा नळ केव्हा येतो?”

“बाळा, हा नळ दिवसातून 3-4 वेळा सुरू होतो. पण आम्ही सोसायटी चाच वापरतो.”

“का हो काका? नगरपालिकेचा नळ वापरणे जास्त योग्य नाही का?”

” ते कस काय?”

“अहो काका, सोसायटीच्या नळाला पाणी कसे येते? मोटारपंप ने पाणी उचलून इमारतीच्या वरच्या टाकीत टाकले जाते. नंतर ते आपल्या घरात येते. पाणी उचलण्यासाठी आपल्याला वीज वापरायला लागते न. जर आपण नगरपालिकेच पाणी वापरल तर वीजेची बचत होईल ”

“अरे हो, मी हा विचार कधी केलाच नाही. ”

काका ने लगेच घरातील सर्वांना सुचना दिल्या. “सर्वांनी हे लक्षात ठेवावे. प्रथम नगरपालिकेचा नळ सुरु आहे का? ते पहावे. तो नळ बंद असेल तरच सोसायटी चा नळ वापरावा ”

https://ravindra1659.wordpress.com/2018/10/18/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8/