या जगात काही ही होऊ शकते…

एक किटक सापाचे भक्षण असतो. परंतु येथे गंगा उलटी वाहत आहे. किटकानेच सापाला खाऊन टाकले.

Advertisements

आठवत असेल…..

आठवते मला

ती बालपणीची दिवाळी,

इटुकले पिटुकले आणि

ऐनवेळी फुस होणारे फटाके

आणि आठवतात

त्या लहानश्या फुलझड्या

किती आनंद होता तरी ही

त्या दिवाळीत

आत्या, काका, मामा,

भाऊ, बहिण, सर्व त्या

लहानग्या घरात दाटी वाटीने

साजरी करत दरवर्षी येणारी दिवाळी.

वर्षातून एकदाच

दसर्याला नविन कपडे

दिवाळीला तेच

पण तरी ही आनंद होता

आज परिस्थिती बदललेली आहे

पाहिजे तेव्हा नविन कपडे मिळतात

कपडे- चपलांचे कित्तेक जोड असतात

पण नसतो तो आनंद

नसते समाधान

मनसोक्त फटाके फोडून ही

मन समाधानी नसते.

आता कधीच ते दिवस

परत येणार नाहीत.