माया

आईची ममता. अस म्हणतात कि आपल्या पिल्लांवर काही संकट आल तर आई आपल्या प्राणांची आहुती देऊन त्यांचे रक्षण करते. मग ती आई कोणत्याही रुपातील असो. पशु- पक्षी का असे ना!!कालच सोशल मिडिया वरुन प्राप्त हा एक व्हिडिओ पहा. व्हिडीओ बनवणाराचेच कौतुक करावे लागेल.ही माता अजस्त्र वाहन येतांना पाहुन आपल्या अंड्याचे रक्षण करण्यासाठी पंख पसरवते पण जागेवरून टस की मस ही होत नाही. जीवाची ही भीती तिला वाटली नाही.आणखी एका इसमाचे कौतुक करणे भाग पडते. तो म्हणजे वाहन चालक. किती सावधपणे त्याने वाहन चालवले.

दुसरे चित्र एका आईचे आहे. चित्र बोलके असल्याने त्याबद्दल शब्द कमी पडतील.

फसवणूक….

एका मित्राने फेक फोन बद्दल सांगितलेला एक अनुभव.

एके दिवशी मोबाईल ची घंटी वाजली. नंबर अनोळखी होता. थोडा वेळ वाजत राहिला. मला दया आली व मोबाईल घेतला.

एका बाईचा आवाज, “मैं प्राव्हिडंट फंड एँड इंस्युरंश आँफिस से बात कर रही हुँ। आपकी फाईल मेरे टेबल पर आई है। ”

बस येथेच गडबड झाली.माझीच नव्हे. पैसा, त्याची खनखनाट कानावर पडली किंवा चाहूल जरी लागली तरी मनुष्य सर्व भान हरपून जातो. तेच ही लोक हेरतात आणि पुढे आपल्याला गुंतवत जातात.असो.

मी सावध झालो. “कौन सी फाईल ” मी जरा आवाज चढवून विचारले.

तिने पुन्हा तेच सांगितले.

मीः “ऐसा कोई आँफिस ही नही है।”

ती डगमगली नाही.

तीः” आप कब रिटायर हुए ये बताईये.” बहुधा ती कागद पेन घेऊन नोंदवायला तयारच असावी.

मीः पहले ये बताईये आप कहाँ से मतलब मुंबई से बात कर रही है?

तीः नही, मै दिल्ली से बात कर रही हुँ।

माझा माथा ठणकला. हा फोन फेक आहे हे लक्षात आले. आता मात्र मी सावध झालो.आणि तीच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

तीने माझी माहिती विचारण्यापेक्षा मीच तिची माहिती खोलात विचारल्याने तीने वैतागून फोन डिस्कनेक्ट केला.

अशा काँलना बळी पडू नये. हल्ली वर्तमान पत्रात आपण अशा प्रकारच्या फसवणूकीच्या बातम्या वाचत असतो.

त्याचा उपयोग झाला म्हणून तो मित्र वाचला.

अचानक दाटुन आलेले ते ढग

आज आकाशात अचानक दाटुन आलेले ते ढग

आणि पसरलेला काळोख पाहुन

मला भुतकाळातील तो दिवस आठवला

आपण दोघे बागेत फिरत होतो

आणि आकाशात असेच अचानक ढग दाटुन आले होते

काळोख पसरला होता

पण आपण भविष्याच्या भावविश्वात

इतके निमग्न झालो होतो

कि आपल्याला त्याने भानच राहिले नाही

लगेचच कोसलेल्या मुसळधार पावसाने

आपण भानावर आलो

आणि ओलेचिंब

घरी परतत असतांना

ठरविले कि येथुन पुढे

पुनः भावविश्वात इतके तल्लिन होणार नाही

देवाने आपले ऐकले आणि

तो दिवस आपल्या जीवनातील शेवटचा दिवस ठरला

नंतर तु कधी भेटलीच नाही मला

तु गेल्याने माझ्या जीवनात

दररोज असे काळे ढग दाटुन येतात

आणि सर्व दुर काळोख पसरतो

आज त्या आठवणींनी मन गहिवरुन आले

आणि डोळे भरुन आले……….

आजची पाण्याची बचत उद्याच्या दुष्काळापासून सुटका.

२ मे २०१२ रोजी पाणी बचतीवर लिहिलेली माझी ही पोस्ट पुन्हा सादर.

https://mazyamana.wordpress.com/2012/05/02/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a4%a4-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a/

माझा ब्लॉग…..

माझ्या मना हा माझा ब्लॉग या महिन्यात 578 जगभरातील प्रेक्षकांनी बघितला आणि 179 नी प्रत्यक्ष भेट (visit) दिली आहे.याबद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.

भेट देणारे मित्र अमेरिका, हाँगकाँग, आयरलँड व इतर ही देशातील आहेत.