मित्रांनो, लहानपणी काढलेले फोटो आज या म्हातारपणी पाहिले की आनंद गगनात मावेनासा होतो.
फोटो पाहून आपल्याला हसू ही येतं. आपण लहान असतांना असे दिसत होतो! हे बघून आश्चर्य वाटतो.
मुलीचा जन्म झाला तेव्हा मी स्वतः तातडीने कोडेक केमरा खरेदी केला होता. आज ही तो केमरा आमच्या कडे आहे. पण त्याचा तो फिल्म रोल हल्ली मिळत नाही.
मधल्या काळात तंत्रज्ञानात प्रचंड बदल झाला आणि डिजिटल केमरे आले. मागील दशकात तर मोठी क्रांती झाली. मोबाईल मधेच केमरे आले आणि जूने केमरे इतिहास जमा झाले.
ही तंत्रज्ञानातील मोठी क्रांती होती. घराघरात असंख्य फोटो जमा करून कचरा का साठवायचे असे सर्वांचे मत होत गेले. ही एव्हढी मोठी होती कि केमरे बनविणाऱ्या मोठ मोठ्या आंतर्राष्ट्रीय कंपन्या बंद पडल्या.
पण ह्या क्रांतीने किती मोठी किमया केली पहा.
आज ही जूने फोटो आपल्या सर्वांकडे असतीलच. ते एल्बम काढून आज ही घरातील सदस्यांसोबत पहा सर्वांना किती आनंद होतो.
पण मागील दशकातील फोटो आपल्या कडे निश्चितच नसतील.कारण आपण डिजिटल फोटो सुरू कले. मोबाईल आल्यानंतर तर काल काढलेले फोटो ही सापडत नाहीत.
क्रमशः…..