टि.व्ही. वर सैराटच गाण सुरु होत. समोर बसलेल लहान बाळ गाण्याच्या तालीवर डोलत होत. त्याचे वडिल त्याचा व्हिडीओ तयार करत होते.
गाण संपल आणि ते बाळ थिरकायच थांबल. त्यांनी तो व्हिडीओ लगेच अपलोड केला. क्षणार्धात तो वायरल झाला आणि सैकडों कमेंट्स आणि लाईक्स मिळाल्या. कित्येकांनी तो व्हिडीओ शेअर पण केला.
दोन दिवसांनी टि.व्हि.वर पण तो व्हिडीओ पाहिला गेला. खुप कौतुक झाले बाळाचे.
असाच एक प्रसंग.
टि.व्हि.वर एक सिनेमा सुरु होता. आई आपल्या लहान बाळाला मार देत होती कारण त्याने स्वयंपाक घरात पिठ सांडल होत. आईने परातीत पिठ काढल आणि दारावर कोणीतरी बेल वाजवली म्हणून ती दार उघडायला गेली. तितक्यात बाळाने ताटातील पिठ सांडून ठेवले होते.
म्हणून ती आपल्या बाळाला चोपत होती.
टि. व्हि.वरचा हा प्रसंग पाहून ते बाळ अंग चोरत होते आणि रडत पण होते.
आपण चलचित्र पाहताना त्यात इतके मग्न होऊन जातो कि आपण स्वतः चलचित्रातील पात्र जगायला लागतो आपल्याला बाहेरील जगाच भानच राहात नाही.
म्हणून तज्ञ असे सांगतात कि जेवण करतांना टि.व्हि. बघु नये. कारण जसे चलचित्र आपण टि.व्हि.वर बघतो तशा भावना आपल्यात जाग्रुत होतात आणि ग्रंथी मधून तसा रस प्रवाहित होतो. त्याचा परिणाम आपल्या प्रक्रुतिवर होतो.
Atishy sundar udaharan dile ahe tumhi..
LikeLike
धन्यवाद कादंबरीजी, आपण ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल.
LikeLike