लोच्या झाला रे….

मित्रांनो, ईश्वराने आपल्याला जे नश्वर शरीर दिलेले आहे ते नश्वर म्हणजे नाशवंत असल्याने क्षणोक्षणी त्यात केमिकल लोचा होत असतो. जुन्या कोशिका मरतात आणि नवीन तयार होतात. याशिवाय काही आजार उदभवतात व औषधोपचार केल्याने निघून पण जातात.

एकूण सांगायचा तात्पर्य असा कि क्षणोक्षणी शरीरात लहान मोठा केमिकल लोच्या होत असतोच.

लहान असेल आपण दुर्लक्ष करतो. आपण दुर्लक्ष केले तरी शरीर दुर्लक्ष करत नाही. ते स्वतः प्रतिकार शक्ती तयार करून घेते व त्या आजारापासून शरीराला मुक्त करते.

पण काही दुर्धर आजार असतात जे इतके निर्लज्ज असतात कि शरीर त्यांच्या पुढे थकते व शरीराची प्रतिकार शक्ती तयार करण्याची ताकद संपते. अशा वेळी नाईलाजाने आपल्याला डॉक्टर साहेबांना भेटून पुढील वाटचाल करावीच लागते.

तुम्ही म्हणणार पुढील वाटचाल म्हणजे काय हो??😊

म्हणजे नेमका काय इलाज करावा, कुठे करावा, शस्त्रक्रिया करावी का?? ई.ई.

म्हणजे जेव्हा ईलाज करू शकत नाही तेव्हा बाहेरील ईलाज करावा लागतोच.

पण हा मोठा केमिकल लोचा नाकीनऊ आणतो. काही वेळा तो इतका भयावह असतो की आपल्याला उद्याची ही शाश्वती नसते. हा केमिकल “लोचा” आपल्याला “आता चालो नी बाबा” असे म्हणायला आला आहे की काय अशी धास्ती मनात वाटत असते.

आणि तो विशिष्ट काळ काळच असतो. त्यातून मार्गक्रमण करत असताना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात.

आणि अशा प्रसंगातून प्रवास केल्यास प्रचंड प्रमाणात प्रतिकार शक्ती प्राप्त होते व आपण प्रत्येक कठीण प्रसंगाला तोंड देत जीवनात सुसह्य मार्गक्रमण करतो.

आदरांजली…

मित्रांनो, जो जन्माला त्याला कधीतरी जावेच लागते. हा निसर्गाचा नियम आहे. पण एखादी व्यक्ती गेल्याने अत्यंत दुःख होते.

अशीच एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी अचानक निघून गेली. आमचे वरिष्ठ स्व. श्रीयुत सावंत साहेब, माजी मुख्य अभियंता यांचे देहावसान झाल्याची बातमी समजली आणि अक्षरशः धक्का बसला. कामात अत्यंत हुशार असे आमचे साहेब जवळजवळ 74 व्या वर्षात जग सोडून सोडून गेले. ग्रुपमधील कोणालाही साहेबांना दवाखान्यात भरती केल्याचे माहित नव्हते. त्यामुळे साहेबांची शेवटची भेट झाली नाही ही खंत कायम राही

मी नाशकात राहात होतो. तेव्हा मला कल्पना ही नव्हती की आपले सेवानिवृत्त अधिकारी वर्ग पुन्हा कधी आपल्याला भेटतील. तेव्हा माहिती काढली तर समजले की बहुतेक मंडळी पुण्यातच राहतात.

अचानक माझी पुण्यातील कार्यालयात बदली झाली व माझी काही सेवानिवृत्त अधिकार्यांची भेट झाली. त्यांना भेटल्यावर मला अतिशय आनंद झाला.

नंतर समजले कि आपल्या सेवानिवृत्त वरिष्ठांनी एक ग्रुप तयार केला आहे. महिन्यातून दोन वेळा सर्व एके सुनिश्चित ठिकाणी भेटतात चहा नाश्ता होतो गप्पा होतात व आपापल्या घरी जातात.

मी ही सेवानिवृत्त झाल्यावर त्या ग्रुप मधे शामिल झालो. मी ग्रुप चा सदस्य झाल्यावर मला अत्यधिक आनंद झाला.

माझ्या पेक्षा 15-20 वर्षांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बसून गप्पा मारण्यात वेगळाच आनंद मिळतो.

पण आता आमच्या ग्रुप मधील आदरणीय और महत्वपूर्ण सदस्य गेल्यावर त्यांची अनुपस्थिती जाणवेल.

आमचे साहेब गेल्यावर आज नेहमीप्रमाणे आमचे सर्व सदस्य भेटले आणि साहेबांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

साहेब आम्ही आपल्याला कधीच विसरु शकत नाही.

खालील फोटो मध्ये बसलेले श्रीयुत सावंत साहेब आहेत.