मित्रांनो, आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव दैनंदिन क्रियांसाठी आवश्यक असतो. प्रत्येकाला वेगळे महत्त्व आहे. त्यात पाय ही आलेच. पायांविना आपली काय अवस्था होईल याचा कधी विचार करू शकतो का आपण? तरी ही आपण पायांना अस्वच्छ मानले आहे. कारण ते सतत जमीनीवर असतात अर्थात जमीनीवर जी घाण असते त्याच्याशी त्यांचा सतत संपर्क असतो. घरात शिरतांना पाय स्वच्छ करून यावे हा अलिखित नियम. देवघरात पाय स्वच्छ धुवून जावे हा ही अलिखित नियम.
पण हेच पाय जेवण बनविण्यासाठी तसेच खाण्यासाठी ही उपयोगात आणले जातात हे म्हटले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल नाही.
पण हल्ली व्हाट्सएपच्या जमान्यात असे बरेच व्हिडीओ वायरल झालेले पाहायला मिळतात. जन्मतः हातपाय नसलेले, फक्त पाय असलेले पण हात नसलेले पण विहंगम व्यक्तिमत्त्व.
हात नाहीत पण पायांनी उत्तमोत्तम चित्रकला करणारी महान व्यक्ती. पायच त्यांच्या साठी सर्व काही. त्याने स्वयंपाक करणे, कणिक मळणे, पोळ्या लाटणे- भाजणे, जेवण करणे,दैनंदिन जीवनातील सर्व कामे पायाने पार पाडता येतात याची कल्पना ही करवत नाही. पण गरज मानसाला जगण्यासाठी सर्व काही करायला भाग पाडते हे ही तितकेच खरे आहे. ज्या पायांना आपल्यासारखा सामान्य मनुष्य स्वच्छ धुतल्या शिवाय हात ही लावत नाही त्या पायांचा जगण्यासाठी इतका उपयोग होऊ शकतो. धन्य ते लोकं. त्यांना साष्टांग दंडवत.
हातपाय दोन्ही नसणारी पण तोंडाने उत्तमोत्तम चित्रकला करणारी व्यक्ती. हे ही धन्यच. अहो तोंडाने चित्र काढणे शक्य तरी आहे का? पर ही अशी लोकं असे अशक्य शक्य करून दाखवतात.
मध्यंतरी एक व्हिडिओ वायरल झाला होता. एक गरीब मनुष्य त्याला हात नव्हते. एकटाच रहात होता. तो तर शिवणकाम करून पोट भरत होता. तेही पायाने. कल्पना ही करवत नाही आपल्याला. आलेल्या मानसाचं माप घेणे, कापड मोजणे, फाडणे, शिवणे सर्व काही. धन्य रे बाबा. दुसरे कोणी असते तर भिक्षा मागून पोट भरले असते. पण हा अवलिया.
सामान्य माणसाला ही लाजवतील इतक्या पद्धतशीरपणे काम करण्याची ह्या लोकांची हातोटी असते.
असाच एक व्हिडिओ आज व्हाट्सएपवर आला होता. तो बघून काही तरी लिहावसं वाटलं म्हणून हा प्रपंच.
सोबत तो व्हिडीओ शेअर करित आहे. मुलगी विदेशी आहे पण पोस्ट मागील भावना महत्वाच्या आहेत.
मित्रांनो, मला भावना अनावर झाल्या आणि मी तो व्हिडीओ येथे शेअर करायचे रद्द केले. मला ते योग्य वाटले नाही.