बचत म्हणजेच उत्पादन


मित्रांनो, “वीजेची बचत म्हणजे वीजेचे उत्पादन” हे बोर्डाचे ब्रिदवाक्य आपण ऐकले असेलच.

वीजेसाठीच कशाला, प्रत्येक बाबीसाठी हा मंत्र लागू पडतो. जसे शरीरातील ताकद. आपण विनाकारण ताकद संपवली तर जेव्हा शरीराला खरोखर ताकदीची गरज असते तेव्हा शरीरात ताकद नसते. आणि अचानक ती उत्पन्न ही करता येत नाही. म्हणून एनर्जी ची बचत करणे म्हणजे च उत्पादन करणे असे होत नाही का??

तसेच पैसा उपलब्ध असतो तेव्हा आपण विनाकारण खर्च करतो. जेव्हा आपल्याला खरोखर त्याची गरज असते तेव्हा तो उपलब्ध नसतो. तेव्हा आपण पश्चाताप करतो कि पैसा होता तेव्हा काटकसरीने खर्च केला असता तर आता कामी आला असता.

मित्रांनो, पाण्याचे ही तसेच आहे. पावसाळ्यात जेव्हा मुबलक पाणी

उपलब्ध असते आपण बचत न करता मोठ्या प्रमाणात खर्ची घालतो. आणि उन्हाळ्यात जेव्हा खरोखर पाण्याची गरज असते आपण तेव्हा पाण्यासाठी वणवण भटकतो पण ते मिळत नाही.

म्हणून योग्य वेळी बचत करणे महत्त्वाचे असते.

Advertisements

2 thoughts on “बचत म्हणजेच उत्पादन

  1. खरोखरच छान लिहिले आहे.पण आज जग इतके जास्त स्वकेंन्द्रित झाले आहे कि,स्वत:च्या स्वार्था पायी,९०% लोक , वीज, पाणी ह्या अमूल्य गोष्टींची पर्वा करत नाही.

    • धन्यवाद ताई. प्रत्येक व्यक्ती ने साधा विचार केला आणि रोज एक लिटर जरी पाणी वाचविले तरी 130 कोटी लिटर वाचेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s