ती, ती, ती आणि मी….


मित्रांनो, अभियांत्रिकी चे दुसरे वर्ष सुरु असतांना एका मित्राचा प्रेम भंग झाला आणि तो वेड्यासारखा वागू लागला.काही काळाने त्यातून तो बाहेर पडला आणि शिक्षण सुरू ठेवले. पण त्याचा तो देवदासपणा काही केल्या जात नव्हता. मी मला वेळच कुठे होता हे प्रेम वेम चे वेड बाळगायला! सकाळी ७ वाजता स्वतः तयार केलेले पराठे चहा सोबत खाऊन जीवनाचा आनंद उपभोगुन कॉलेजला जायचे तेथून च पुढे शिकवणी ला जायचे. शिकवणी म्हणजे लहान मुलांना शिकवायला त्यांच्या घरी जायचे. संध्याकाळी घरी परत यायला ७-८ होणार. आल्यावर घरी स्वयंपाक करणे. अभ्यास मात्र रात्रीच.

अशा स्ट्रगल असलेल्या जीवनात प्रेमाचा दरवाजा असू शकतो का हो? विचार सुद्धा येत नाहीत.

अशा दुःखी माणसाला त्याने सोबत मागितल्यावर नकार देणे कसे शक्य आहे. माझे ही तसेच झाले. तो मला सोबत घेऊन गेला. कोठे बर नेले असेल त्याने? दुसरे कोठे?

तिच्या घरासमोर तिच्या दर्शनासाठी लांब बसून प्रतिक्षा करण्यासाठी. त्याला सोबत म्हणून मी बसून राहावे.

आणि बस तोच हा चुकीचा निर्णय ठरला माझ्या आयुष्यातला. तो वेळ घालविण्यासाठी सिगारेट ओढायचा. मला त्याने आग्रह केला. मी नकार देत देत थोडा वेळ घालवून नेला पण स्वतः ला थांबवू शकलो नाही. शेवटी एक दम लावून बघीतला आणि प्रचंड त्रास झाला.

मग दुसरा, तिसरा करत सुरू झाली आणि त्या अनामिकेने माझ्या सुस्थितीत सुरु असलेल्या जीवनात अनाहूतपणे प्रवेश मिळविला.

या प्रवेशाला आज जवळजवळ ४० वर्षे झालीत. तिच्या त्या अनाहूत प्रवेशाचे दुष्परिणाम आता या म्हातारपणी दिसून आले आहेत.

अस म्हणतात न कि पहिले प्रेम हे मनुष्य कधीच विसरत नाही. माझे ही तसेच झाले. सिगारेट च्या प्रेमात पडलो आणि तिचाच होऊन बसलो.

लग्न झाले आणि दुसरी “ती” आयुष्यात आली. तिने खुप प्रयत्न करून पाहिले पहिल्या तिला माझ्या आयुष्यातून घालविण्याचे. पण तिला ते शक्य झाले नाही.

जीवन असेच सुरू राहिले. पुढे आयुष्यात मुलगी (हिच ती तिसरी “ती”)आली. तेव्हा एक मात्र ठरविले. मुलगी सोबत असेल तेव्हा सिगारेट टाळावी. तसे झाले ही. मुलगी मोठी झाली. आता तिला कळायला लागले. पत्नी ने मुलीच्या मदतीने दबाव टाकायचा प्रयत्न केला सिगारेट सोडवायचा पण बिचारी ती ही थकली.

१५जून २०१९. लग्नाचा ३३वा वाढदिवस. संध्याकाळी डॉक्टरांच्या क्लिनिकमधून फोन आला. तुमचे टेस्ट रिपोर्ट आले आहेत. मी गेलो. मनात देवाचा धावा करत करत डॉ. साहेबांना भेटलो आणि ……….

आयुष्याला एक कलाटणी मिळाली. ४० वर्षांपासून करित आलेल्या एंजॉय मेंट चे हे परिणाम आहे मित्रा असे माझा मी च मला बोलून गेलो. पण बायको आणि मुलीचे काय? त्यांची यात काय चुक? त्यांनी का आपल्यामुळे हे सहन कराव?

Advertisements

4 thoughts on “ती, ती, ती आणि मी….

  1. सर,आपण आपल्या मनातील वेदना सहज शब्दात मांडल्या आहेत.आपणासोबतच्या २०१५ मधील मुंबई प्रवासात आपले बालपण ते नोकरी असा जीवनप्रवास ऐकला होता.आतापर्यंत आपण आत्मविश्वासाने लढा देऊन परिस्थितीवर मात केलेली आहे. ती ताकद,शक्ति आपणास परमेश्वराने दिलेली आहे. ऐथुन पुढेही तितक्याच आत्मविश्वासाने लढण्याचा निर्धार ठेवा.

  2. फार मनस्वी लिहिले आहे.खरी चूक न तुमची ना तुमच्या कुटुंबियांची, ती आहे त्या मूर्ख देवदासाची.लिहिण्याचा जसा धीर तुम्हाला झाला, तसाच लढून जिंकायचा निर्धार ही ठेवा.

    • आपणास आवडलेले दिसतय माझे छोटेसे लिखाण. धन्यवाद. तो देवदास आज ही त्याच अवस्थेत जीवन जगत आहे.
      आपल्यासारख्या थोरामोठ्यांचे शुभाशीर्वाद माझ्या पाठिशी असल्यामुळे मला कशाची ही भिती वाटत नाही. असेच आपले प्रेम व आशिर्वाद अखंड राहु द्यावेत ही विनंती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s