डोरबेल..


एकेकाळी विज नव्हतीच. त्यामुळे डोरबेल असण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. त्याकाळी खेड्यापाड्यातच काय शहरात ही विज कमीच होती. तेव्हा घरी पाहुणे आले कि दार बंद असल्यास दारावरची कडी वाजवायचे बस. मुळात पुर्वी लोकाचा एक दुसर्यावर इतका विश्वास असायचा कि दिवसा दार बंद केले जात नव्हते. फक्त रात्री च बंद असायचे.

गंमत म्हणजे आपल्याकडे पाहुणे आले आहेत हे परिसरातील शेजारी पाजारी यांच्या आवाजानेच ओळखले जायचे. कारण असे प्रत्येकाचे नातेवाईक यांना वाड्यातील प्रत्येक जण ओळखायचा.

आता तसे नाही. माणसं आत्मकेंद्रित झाली. आपल्या घराच्या चार भिंतीत स्वतःला कोंडून घेऊ लागली. विशेष करून शहरांमध्ये फ्लॅट संस्कृती उदयाला आली आणि मानुस मानसापासून दुरावत गेला.

प्रथम शेजारी पाजारी व हळूहळू नातेवाईक ही नकोसे वाटायला लागले.

यात आणखी भर पाडली ती टि.व्हि. ने. पण यात ही खाजगी वाहिन्यांचे पेव फुटले आणि मनुष्य प्राणी त्यात 24 तास त्यात गुरफटून गेला.

हे काय कमी होते कि काय तंत्रज्ञानात आणखी एक उत्क्रांती झाली आणि मोबाईल फोन जन्माला आला. बर आला तर आला पण त्यात केमरा, आणि नंतर चक्क संगणक च घुसवला गेला. आता तुम्हाला फक्त एक छान पैकी स्मॉर्ट फोन खिशात असला तरी सर्व जग खिशात असल्यासारखे वाटते.

असो, विषय भरकटत चाललाय.

तर मुख्य विषय डोरबेल चा होता. फ्लॅट संस्कृती आली. दरवाजे बंद असणे बंधनकारक. उघडे ठेवले तर तुम्ही गावंढळ. बंद दरवाजे म्हणजे सुसंस्कृत. आणि येथेच डोरबेल ची जाणीव वाटली. गरज आविष्काराची जननी असते.

मागच्या 20-25 वर्षात अख्ख्या जगात तांत्रिक उत्क्रांती आली. नाही तर पुर्वी तीच ती जूनी विद्युत उपकरणे वापरली जात असत. बल्ब ही तेच आणि पंखे ही तेच. आता तर आकर्षक रंगसंगती असलेली उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत.

डोरबेल ही पूर्वी एकाच प्रकार ची मिळत असे. आता तर शैकडो प्रकार उपलब्ध आहेत. पोपटाच्या आवाजात ही आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s