नोज फिडिंग…


मित्रांनो, शिर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल न! आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. आपण लहानपणी मला आठवते लाईट गेली कि अंधार व्हायचा आणि मग आई चिमणी लाव न लवकर असे आपण म्हणत असु. तेव्हा बाबा रागवून म्हणायचे खा कि अंधारात काही नाकात घास जाणार नाही.

अहो नोज फिडिंग शक्य तरी आहे का? पण आहे. मी कधी याची कल्पना ही केली नव्हती. पण आज मी स्वतः नोज फिडिंग अनुभवत आहे.( मित्रांनो माफ करा आजारपण हा खाजगी विषय आहे पण त्याचे कौतुक करणे मला योग्य वाटले म्हणून ही पोस्ट)

मित्रांनो, मध्यंतरी माझ्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. तोंडात शस्त्रक्रिया झाल्याने तोंडातुन जेवण करणे शक्य नाही. म्हणून नाकातून पोटात एक नळी टाकलेली आहे. त्यातून पातळ पदार्थ, चहा, दुध आणि पाणी “पुरवले” जाते. “भरवले” जाते असे म्हणणे योग्य होणार नसल्याने “पुरवले” शब्द वापरला आहे.

असो, हा आयुष्यातील एक वेगळाच अनुभव आहे.

गंमत म्हणजे आपण काय खालले याचा स्वादच समजत नाही. काही तरी पोटात गेल आणि पोट भरल असं वाटते. ढेकर ही येतातच.

यावरून एक मात्र समजले कि स्वाद हा फक्त आणि फक्त जीभेलाच कळतो. असे म्हणतात ही काय सटरफटर खातोय. जीभेचे चोचले पुरवतोय तो दुसरे काय??

कडू, गोड, तिखट, आंबट असा काही प्रश्न उदभवत नाही. पोटाला स्वादाचा प्रश्नच नाही. निसर्गाने त्याला हे नेमून दिलेले काम नाही. हे काम जीभेला नेमलेले असल्याने तिनेच ते करावयाचे असते.

निसर्गाने शरीरातील प्रत्येक अवयवाला जे काम नेमलेले आहे तेच काम तो अवयव करतो. यावरून हे सिद्ध होते कि दुसर्याच्या कामात कोणीही ढवळाढवळ करू नये.

हा एक वेगळा अनुभव सध्या मी घेत आहे.

आणखी एक सांगतो वैद्यकीय क्षेत्र प्रचंड प्रमाणात प्रगत झालेले आहे. त्यांचे ही कौतुक करावे तितके कमीच.

Advertisements

2 thoughts on “नोज फिडिंग…

  1. असे सर्व त्रास,ते ही स्वत: विषयी इतक्या सहजपणे लिहिणे,ही तुमची हिम्मत, धीर आहे, तुमच्या ह्या गुणांना खरोखर सलाम.कधी ही हा विश्र्वास डळमळीत होऊ देऊ नका.लौकर बरे वर्मा,ह्या शुभेच्छा.

    • धन्यवाद ताई, आपणास सरांनी सांगितले असेलच माझ्या आजारपणा विषयी. माझा मनोनिग्रह असतो प्रत्येक विषय न डगमगता हाताळणे. आपल्या सारख्यांच्या शुभेच्छा सोबत असतांना मला कसली भीती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s