मित्रांनो, नवनवीन तंत्रज्ञान आले की नवीन संज्ञा तयार होतात असा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल. कारण आपल्या न कळत त्या संज्ञा किंवा शब्द आपण आत्मसात करतो किंवा असे म्हणता येईल की ते नवीन शब्द इतक्या सहज आपल्या अंगवळणी पडून जातात कि आपल्याला कळत सुद्धा नाही. असाच एक शब्द आहे सेल्फी.
मोबाईल मध्ये आधी साधा केमरा आला. त्याने समोरच्या चे फोटो घेणे शक्य झाले. पण तंत्रज्ञान थांबणार कसं? मोबाईल वापरणार्याला स्वतः चा फोटो काढण्याचा मोह झाला तर तो कसा काढेल? त्यांनी त्याच मोबाईल ने काढून बघितला असेल. पण त्रास होतो हे पाहिले आणि समोरून एक केमरा बसवून टाकला. आता स्वतः चा फोटो स्वतः काढणे ह्या क्रियेला काही तरी नाव देने आवश्यक होते. स्वतः काढत असल्याने त्याला नाव दिले “सेल्फी”. फार छान संज्ञा आहे ही.
पण या सेल्फी चे वाईट परिणाम ही दिसत आहेत. नको तेथे ही सेल्फी काढण्याचे धाडस करतात आणि ते अंगलट येते किंवा जीवावर बेतते.
अहो, कोणी धावत्या रेल्वेच्या समोर सेल्फी काढण्याची कल्पना ही करेल का? पण करतात. मध्यंतरी एक बातमी आली होती. समुद्रात विमान कोसळले. त्यातून जी लोकं बाहेर पडली त्यांनी तेथे ही बुडत्या विमानासह सेल्फी काढली.म्हणजे प्राणांची किंमत सेल्फी पेक्षा ही कमी. डोंगराच्या शिखरावर जाऊन सेल्फी घेतात आणि कडेलोट होतो अशा बातम्या वर्तमान पत्रात झळकत असतातच.
महिला मंडळी ह्या सेल्फीचा एक चांगला उपयोग करून घेऊ शकतात. तो कसा ते आपण बघु.
महिलांना नेहमी छोटा आरसा चेहरा बघण्यासाठी सोबत ठेवावा लागतो. तो त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. सेल्फी मोडमध्ये मोबाईल हा आरशाचे काम करतो. म्हणजे थोडे का होईना वजन कमी होऊ शकले नाही का??