पॉजिटिव्ह म्हणजे अधिक (+) व निगेटिव्ह म्हणजे वजा (-) हे सरळ सरळ गणितीय अर्थ आहेत यांचे. पॉजिटिव्ह हा चांगला मानला जातो तर निगेटिव्ह वाईट. असे म्हटले जाते कि जे निगेटिव्ह विचार सरणी चे लोकं असतात त्यांच्या मनात प्रथम एखाद्या बाबतीत निगेटिव्ह विचार येतात. त्याच बाबतीत पॉजिटिव्ह विचार सरणीच्या लोकांच्या मनात पॉजिटिव्ह विचार प्रथम येतात. हे कितपत खरे असेल हे मी तपासून पाहिलेले नाही. किंवा तसा प्रयत्न ही केलेला नाही. याबाबतीत एक सोप उदाहरण नेहमी सांगितले जाते. ते म्हणजे अर्धा पाण्याने भरलेला ग्लास. मी येथे लिहलेले हे वाक्य पॉजिटिव्ह विचारसरणीचे आहे. म्हणजे यातून पॉझिटिव्हिटी झळकत आहे. हे वाक्य कानी पडल्यावर मनात दुखद भाव किंवा शल्य असे काही वाटत नाही.
याला दुसर्या प्रकारे असे संबोधित करता येते. अर्धा रिकामा ग्लास. या शब्दांचा फरक आहे. “भरलेला ” व “रिकामा “. हे दोन शब्द. यात भरलेला हा पॉजिटिव्ह व रिकामा हा निगेटिव्ह शब्द आहे.
पॉजिटिव्ह शब्द कानी पडल्यावर मन प्रसन्न होते. प्रफुल्लित होते. तेच निगेटिव्ह शब्द कानी पडल्यावर मन दुखी होते.
काही जागा ही अशा असतात कि जेथे गेल्यावर मन प्रसन्न होते. जसे देऊळ किंवा मंदिर. डोळे बंद करून जरी देऊळा जवळ घेऊन गेले तरी कळते कि येथे देऊळ आहे. तेच स्मशानभूमीत गेल्यावर मन प्रसन्न होईल का? तसेच संगीताचे ही असते काही संगीत कानी पडले तर मन प्रसन्न होते.
पण हेच शब्द आयुष्यात इतर बर्याच ठिकाणी वापरले जातात.
विचार करण्याची पद्धत: प्रत्येक मानसाची आपली स्वतंत्र मानसिकता असते व त्यानुसार त्याची वैचारिक पातळी किंवा विचार करण्याची पद्धत असते.
1) आपण एक उदाहरण बघु. आई आपल्या १२-१३ वर्षाच्या मुलाला रोडवरच्या एका किराणा दुकानात पाठवते. सोसायटी मधून बाहेर पडल्यावर डावीकडे ते दुकान आहे. रस्ता ओलांडून जायचं नसतं. तरी ही आई म्हणते “बाळा सांभाळून जा बर. रस्त्यावर वाहने बघून चल.”
बाळ: “काय आई. किती निगेटिव्ह थिंकिंग आहे तुझे.”
आता यात आईचे काय निगेटिव्ह थिंकिंग आहे बर. पण बरीच मंडळी, माझ्या मते ५०% निगेटिव्ह म्हणतील व उरलेली अर्थातच पॉजिटिव्ह.
माझ्या मते येथे आईच्या काळजाला बाळाची काळजी वाटत असल्याने ती तसे बोलली. रस्त्यावर विरुद्ध बाजूने ही वाहने चालवतात काही महाभाग. तसेच परत सोसायटी त येतांना त्याला उजव्या बाजूने यावे लागेलच ज्याला आपण राँग साईड म्हणतो. त्यामुळे आईला काळजी वाटणे साहजिकच आहे. आईसठी हा निगेटिव्ह विचार मुळीच नाही. पण बाळाला तसे वाटले ते त्याच्या द्रुष्टीने. कारण त्याला स्वतः आत्मविश्वास आहे.
पण आईच्या काळजीने बाळाचा आत्मविश्वास काही प्रमाणात तरी कमी होतो हे मात्र नक्की.
2) नवरा सिगरेट पितो. हे बायकोला आवडत नाही. ती सतत म्हणते “अहो सिगारेट ने केंसर होतो न. मग सोडा न तिला.”
नवरा: “अग काय हे निगेटिव्ह विचार.”
यामध्ये बायको निगेटिव्ह विचारांची आहे असे मला तरी वाटत नाही. कारण सिगारेट पिल्याने केंसर होतो हे सर्व जगाला माहित आहे. तरी ही नवरा तिला निगेटिव्ह म्हणतो हे योग्य नाही. बर तो कसलाही विचार मनात आणत नाही. म्हणजे तो पॉजिटिव्ह ही नाही आणि निगेटिव्ह ही नाही.
वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा हे शब्द वापरले जातात. काही बाबतीत तर पॉजिटिव्ह शब्द फारच वाईट धरला जातो. चिंता वाढविणारा असतो. उदाहरण द्यायचे झाले तर HIV चे देता येईल. तपासणी केल्यावर रिपोर्ट मधे HIV आहे असा आला तर पॉजिटिव्ह म्हटले जाते. जे चिंता वाढविणारे आहे. याबाबतीत निगेटिव्ह रिपोर्ट चांगला मानला जातो.