लेन कटिंग(19569)

लेन कटिंगला मराठीत काय म्हणावे हे सूचत नसल्याने मी तसाच शिर्षक दिला आहे या माझ्या पोस्ट ला.

पूर्वी फक्त देशातील हायवे मोठे असायचे. कारण तेव्हा जनसंख्या कमी होती,…….या पुढील लेख खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://ravindra1659.wordpress.com/2019/09/19/%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97/

श्रेष्ठदान…(19568)

आपल्या कडे दानधर्माला खूप महत्त्व दिले गेले आहे. मग ते कोणत्याही स्वरूपात का असेना.

शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितात ते विद्यादान. भिक्षुकाला अन्नदान किंवा धनदान किंवा एखादी वस्तू दान दिली जाते. तसेच रक्त दान. जनसंख्या व वाहने वाढल्यानंतर अपघातात मरण पावणारांचे प्रमाण खूप वाढले. डोक्याला मार लागून कोमात गेलेल्यांचे प्रमाण ही खूपच वाढले आहे. असा रुग्ण कोमातून बाहेर कधी येईल, किती वर्षांनी येईल कसलीच खात्री नसते. तेव्हा अशा रुग्णांचे अवयव दान करण्याचा विचार केला जातो.

याशिवाय एक वेगळे दान ही आहे. त्याला म्हणतात अवयव दान. अवयव म्हणजे शारीरिक अवयव. जसे, ह्रदय, किडनी, इ. जेव्हा पासून आपल्याकडे वैद्यकीय शास्त्र प्रगत झाले आहे तेव्हा पासून अवयव दानाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती. एक तरुण अगदी २०-२२ वर्षांचा. त्याचा अपघात झाला व डोक्याला मार लागल्याने तो कोमात गेला. कोमातून मनुष्य परत फिरेल का? याची शास्वती नसल्याने गरीब बिचारे त्याचा खर्च करण्याच्यी क्षमता नसते. अशा परिस्थितीत ते काय करू शकतात? बातमीनुसार त्याच्या नातेवाईकांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. तीन लोकांना त्याने जीवदान मिळाले.

यावरून माझा एक अनुभव सांगू इच्छितो. साधारण २००७ चा जुलै महिना होता. टु व्हिलर वर ऑफिस मधून घरी येत होतो. शासकीय वाहन दिमतीला होते पण प्रामाणिकपणा नेहमीच आड आलेला आहे. म्हणून स्वतः ची टु व्हिलर नेहमी वापरत होतो.

मोठ्या जवाबदारी चे काम असल्याने सतत व्यस्त होतो. घरी जाताना कार्यालयीन कामाचे विचार मनात घोळू लागले आणि शुद्ध हरपली. तेही गाडी चालवत असतांना. काय झाले काही समजले नाही. रस्त्याच्या मधोमध गाडी स्लिप होऊन पडलो. कसा ते मला माहित नाही. शुद्ध हरपली होती माझी. रहदारी चा रस्ता असल्याने नशीब बलवत्तर म्हणून वाहने थांबली. अन्यथा काही खरे नव्हते. कोणी तरी मदतीला आले. एका रिक्शावाल्याने पेसेंजर असतांना बसवले. मी मोबाईल वरून घरी सांगितले. रिक्शावाल्याने घरी सोडले. नंतर दवाखान्यात भरती केले. यातील मला काही आठवत नाही. नंतर मला सांगितले गेले. आय.सी.यु. मधे घेतले. डोक्यात रक्त गोठल्याने त्या काळातील मेमोरी पुसली गेली असे डॉक्टरांनी नंतर सांगितले. एक आठवडा दवाखान्यात होतो. कोण आले भेटले काय काय झाले काहीच आठवत नाही. नंतर समजले त्या अवस्थेत ही मी ऑफिस मधील सर्वांना कामाबद्दल सूचना व आदेश देत होतो. इतकेच नव्हे तर वरिष्ठ कार्यालयातील प्रमुखांना मोबाईलवरून संपर्क साधून कामाची सद्दस्थिती इ. सांगत होतो. हे ही मला नंतर कळाले. कार्यालय प्रमुख असल्याने व महत्त्वाची जवाबदारी असल्याने मला रजा मिळाली नाही. मी त्याच अवस्थेत माझी जवाबदारी योग्य रित्या पार पाडली. डोक्याला जखम व गळ्यात टांगलेला हात घेऊन मुंबई येथे बैठका घेतल्या. ईश्वरीय शक्ती प्राप्त झाल्यागत मी कामे केली व निर्णय ही घेतले. असो.

विषयांतर झाले व वैयक्तिक विषय मांडला गेला. पुन्हा मुळ विषयाला येऊ या. त्या मुलाच्या पालकांचे कौतुक करावेसे वाटते.

मला ही वाटते की आपण अवयव दान किंवा देहदान करावे. हे शरीर जाळून नष्ट करण्यापेक्षा जर कोणाच्या तरी कामी आले तर काय हरकत आहे.

असे वाचण्यात आले आहे कि पारशी समाजात मेल्यावर सुद्धा हे शरीर उपयोगी यावे म्हणून अगियारी मधे टांगून दिले जाते. जेणेकरून पक्षी त्यास खाऊन टाकतील.

मेल्यावर सुद्धा हे शरीर कोणाला आयुष्य देत असेल तर यापेक्षा श्रेष्ठदान काय असू शकते??

छप्पर फाडके….(19567)

एखादाच नशीब घेऊन जन्माला येतो असे म्हणतात. हे खरे ही आहे. या घटनेला बघून तरी माझी खात्री पटली आहे.

सोनी टि.व्हि.वर सध्या एक कार्यक्रम सुरु आहे. “कौन बनेगा करोडपती” परवा एक माऊली या कार्यक्रमात आली होती.

अंजनगाव सुर्जी जळगाव येथील बबिता ताडे. या माऊली शाळेतील मुलांना खिचडी बनवून देण्याचे काम २००२ पासून करित आहेत. त्यासाठी त्यांना मानधन म्हणून मासिक फक्त रु. १५००/- मिळतात. हे जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांनी विचारल्यावर सांगितले तेव्हा अमिताभ बच्चन हे सुन्न झाले.

त्या माऊली चे कौतुक करणे भाग आहे. कारण त्या दिवसातून दोन वेळा ४५० विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवितात. तरी ही त्यांच्या चेहर्यावर कोठेही निराशा किंवा नाराजी दिसत नव्हती.

त्यांनी पूर्ण उत्साहाने खेळायला सुरुवात केली. कोठेही आपला उत्साह कमी पडू दिला नाही.

शेवटपर्यंत त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. एक खेडूत स्री इतक्या आत्मविश्वासाने खेळू शकते हे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. त्यांच्या तोंडून वारंवार हे शब्द बाहेर पडत होते कि मला दाखवून द्यायचे होते कि एक खिचडी बनविणारी सुद्धा कमी नाही व मी येथून एक करोड जिंकून जाणार!

या आत्मविश्वासाच्या अगदी विरुद्ध त्यांच्या स्वतः साठीच्या अपेक्षा होत्या. सुरुवातीलाच त्यांनी सांगितले होते कि त्यांचा स्वतः चा मोबाईल नाही म्हणून त्यांना स्मार्ट फोन घ्यायचा आहे. मग बच्चन यांनी त्यांना एक स्मार्ट फोन भेट दिला.

जेव्हा रक्कम वाढत गेली तेव्हा शिवमंदिर दुरुस्त करावयाचे आहे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. एक कोटी जिंकल्यावर हे पैसे माझ्या घरासाठी मुलांसाठी आहेत हेच ती माऊली बोलली.

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी लॉजिकचा पूर्ण वापर केलेला मला आढळला. अहो, सात कोटीसाठीचा शेवटच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा त्यांनी बरोबर दिले. मात्र एक कोटीनंतर त्यांनी माघार घेतल्याने त्या एक कोटी जिंकल्या.

त्या माऊली ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.(सर्व फोटो साठी गुगल चा आभार )

ऊर्जा….(19566)

सध्या जागतिक मंदीचा काळ सुरू आहे. मध्यंतरी बातम्या येत होत्या की कार उत्पादक कंपन्यांनी उत्पादन थांबविले आहे कारण ग्राहकच नाही. ठिक आहे. कार खरेदी हे दिवास्वप्न असते.

त्यामुळे मंदीची झळ त्याला बसली असेल हे मान्य होऊ शकते. पण बिस्कीट उद्योगाला ही… हे मला आश्चर्यकारक वाटले. एका प्रसिद्ध बिस्कीट कंपनी बद्दल बातमी होती ती. असो. पण मला आश्चर्य याचे वाटले की मंदी आहे म्हणून लोकांनी बिस्कीट खाणे बंद केले??

ही बातमी वाचून मला दया आली व मी सकाळ संध्याकाळ बिस्कीट खायला सुरुवात केली. झाले असे कि मध्यंतरी माझे ऑपरेशन झाले होते तेव्हा तोंडातील दात काढून टाकले होते. म्हणून बिस्कीट खावून दिवस काढतोय. इनडायरेक्टली बिस्कीट उद्योगाला ऊर्जा च देत आहे न मी! बरोबर आहे न मित्रांनो! पण हो हा गैरसमज करून घेऊ नका कि कार उद्योगाला ही ऊर्जा देऊ करणार आहे मी. हा हा हा हा!!!😊😊☺️हा झाला गमतीचा भाग.

पण काल सरकारने कंपनी कर कपात केल्याने शेयर मार्केटमधे सुनामी आली. अजून पत्रकार परिषद सुरु होती तेव्हा मी बातम्या ऐकत होतो, मी पाहिले एकदम ८०० पॉईंट ने मार्केट ने उसळी घेतली होती. नंतर मी टि.व्हि. बंद केला.

पण रात्री बातम्या पाहिल्या तर एका दिवसात मार्केट ने २२५० पॉईंट ने उसळी घेतली होती. आज वर्तमानपत्र वाचले तर म्हणे काल गुंतवणूकदारांनी ६.८२ लाख कोटी रुपये कमाविले. ही बातमी वाचून आश्चर्य वाटणे साहजिकच आहे.

वर्तमानपत्र वाचताना सहज नजर जाते तेव्हा समजते शेअर मार्केट रोज वर खाली होतच असते. त्याला फक्त निमित्त लागते. कुठलातरी धागा सापडला कि मार्केट वर जाते किंवा खाली तरी येते.

गंमत वाटते त्याची. अर्थात असा धागा सापडणे आवश्यक असते अन्यथा मार्केट एकाच ठिकाणी थांबून राहिल. आणि थांबला तो संपला. म्हणून मार्केटला दररोज काही न काही बूस्टर लागतोच.

मला ह्या शेअर बाजाराची आणखी एक गंमत वाटते.

तेथे खेळणारे म्हणजे गुंतवणूक करणारे तेच असतात. म्हणजे कमावणारे ही तेच व घालवणारे ही तेच. फक्त खिसे वेगळे असतात. याच्या खिस्यातून त्याच्या खिस्यात व त्याच्या खिस्यातून त्या तिसर्या खिस्यात. मात्र फायदा सरकार ला ! कर मिळतो त्यातून!

गंमत आहे नाही😊☺️😊☺️

तंत्रज्ञान…..(19565)

विज्ञान आणि तंत्रज्ञानाने म्हणजे वैज्ञानिकांनी/अभियंत्यांनी वेळोवेळी शोध लावून माणसाचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. असे अनेक प्रयोग करून नवीन उपकरणे तयार केली व नंतर त्यांचा व्यावसायिक वापर ही सुरू झाला.

उदाहरण द्यायचे झाले तर विमानाचा आविष्कार हे माणसासाठी सुखकर साधन ठरले. पूर्वी सीमेपार जाण्यासाठी जहाज वापरले जात होते. महिने लागत असत प्रवासाला. विमानाने काही तासांमध्ये पोहोचता येते.

अलिकडच्या काळातील उदाहरण म्हणजे मेट्रो. याबद्दल सांगायचे झाले तर लगेच मनात भूतकाळ डोकावतो. झाले असे कि मी १९९८ च्या ऑक्टोबर महिन्यात ऐन दिवाळीच्या रात्री विमानात विराजमान झालो होतो. का?व कशासाठी? तर जापान देशात चार आठवड्याच्या प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी. याबद्दल या “माझ्या मना “वरील एक पेज “माझा विमानप्रवासा”वर माहिती आहे. मी जापान देशात प्रथम मेट्रो ट्रेन पाहिली होती. तस बघितले तर हा माझ्या आयुष्यातील पहिला व शेवटचा विदेश प्रवास होता. त्यानंतर ही योग आले पण मला नको होते म्हणून मी नाकारले. सारे जहाँ से अच्छा……

जापान मधे मी लोकलमध्ये ही प्रवास केला होता आणि बुलेट ट्रेन मधे ही.

कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास केला तरी प्रवास शांततेत व्हायचा. अजिबात दणका किंवा झटका असे काही नाही. असे म्हणता येईल कि पोटातले पाणी सुद्धा हलत नव्हते. असो.

प्रशिक्षण संपले आणि परतीचा प्रवास करुन मुंबई येथे आलो.

लोकलने प्रवास केला. तेव्हा लागलीच मनात दोन्ही ट्रेनची तुलना झाली. अक्षरशः जमीन आसमानाचा फरक जाणवत होता दोन्ही ट्रेन मधे. मनात आले आपण आणखी हजार वर्षे त्यांची बरोबरी करु शकत नाही. पण तेव्हा कल्पना नव्हती आपण बदलू. दिल्लीत मेट्रो आली आणि देश बदलत गेला. नंतर एक एक शहर करत मेट्रोचा पसारा वाढला. आता तर अनेक शहरांमधे मेट्रोसेवा सुरू होत आहे.

असो.

यानंतर इंटरनेट. १९९८ मधे आपल्या कडे मी गेलो तेव्हा मुंबई येथे स्टॉक एक्सचेंज जवळ एकच सायबर केफे सुरु झाले होते. दर होता तासाला रु.१००/-तेव्हा तर ऑफिस मधे ही इंटरनेट नव्हते. व्हि.एस. एन. एल. मधे सुरू झाले होते. मी ऑफिस चे फेक्स तेथे जाऊनच विदेशात पिठवित होतो. नंतर त्याचा ही पसारा वाढला.

नंतर आणखी एक अनोखे यंत्र आले. ते म्हणजे मोबाईल. १९९८ मधे आपल्या कडे मोबाईल चे वारे सुरू झाले होते पण अद्याप मोबाईल आला नव्हता. त्यात ही प्रथम पेजर आले. त्यावरून मेसेज पाठवता येत होते. नंतर आले मोबाईल. पण ते मोठा एंटिना असलेले. मोबाईल चे डबळे ही मोठेच होते. दर पण मिनीटासाठी मला वाटते रू. १८/- असेच काही तरी असावे. इनकमिंग साठी सुद्धा चार्जेस होते. गंमत सांगाविसी वाटते आहे या मोबाईल बद्दल.

जापान मधे त्याकाळी मोबाईल असे फुटपाथवर मिळायचे. आम्ही सुटीच्या दिवसी शहरात फेरफटका मारत असतांना एका दुकानात बाहेर फुटपाथवर हरेक माल १० येन (तेथील चलन) असा दर होता वाटते. म्हणजे आपले तेव्हा चे रु.३/-. मी दुकानात गेलो. दोन मोबाईल दे म्हणून पैसे पण दिले. त्याला इंग्रजी समजत नसल्याने व तो काय म्हणत आहे हे आम्हाला समजत नसल्याने बरीच अडचण झाली. थोड्या वेळाने एक मुलगी दुकानात आली. तिला इंग्रजी येत होते. तिला मी माझे म्हणणे सांगितले. तिने दुकानदाराला सांगितले पण त्याने नकार दिला. कारण तर हे मोबाईल विदेशी लोकांसाठी नाही.

आता मागच्या काही काळापासून एका नवीन यंत्राने जगभर उच्छाद मांडला आहे. नाव आहे ड्रोन. आहे साधे सोपे उपकरण. पण अलीकडे त्याचा वापर खूप वाढला आहे. त्याचा बेस्ट वापर फोटोग्राफीसाठी होतो. खेडोपाडी सुद्धा वापर होत आहे. सुरक्षेसाठी सुद्धा त्याचा वापर होतो.

आताच काही काळापूर्वी बातम्यांमधे या यंत्राच्या वापराबद्दल एक बातमी सांगितली गेली. अरब देशात तेलाच्या विहिरींवर या यंत्राने हल्ला करून आग लावण्यात आली. त्यामुळे जगभरात पेट्रोल, डिजल चे भाव भडकणार. आश्चर्य वाटले न! ड्रोन चा या कामासाठी वापर केला जाईल ही कल्पना ही आली नसेल कोणाच्या मनात.

मध्यंतरी व्हाट्सएपवर एक व्हिडिओ वायरल झाला होता. या ड्रोन यंत्राचा वापर करून वाटमारी किंवा लूटमार केल्याचे त्यात दाखविले होते.

हे नवीन उपकरण तयार केले तेव्हा कोणाला कल्पना ही नसेल की याचा असा गैरवापर ही होऊ शकतो.

(सर्व चित्रांसाठी गुगलचे आभार )