मित्रांनो, इस्रो ने आज सांगितले कि विक्रमची थर्मल चित्र ऑर्बिटर ने पाठविली आहेत व तो चांद्रभूमीवर पडला आहे. पण त्याच्याशी संपर्क होत नाही. सतत प्रयत्न केले जात आहेत. त्याला सूचना देता आल्या तर तो स्वतः उभा राहु शकणार आहे. तशी यंत्रणा त्याच्यात आहे.
यातून मला एक विकट प्रश्न पडला आहे तो असा कि त्याला येथून सूचना दिल्या तरच तो उभा राहू शकणार आहे. त्याच्यात विचार करण्याची क्षमता नाही का? या आर्टिफिशीयल इंटेलिजन्सच्या अत्याधुनिक युगात विक्रम मधे अशी यंत्रणा असती तर चंद्रावर पडल्यावर तो कदाचित स्वतः पुन्हा उभा राहिला असता.
आता मला समजले कि हे अंतरिक्ष यान पुर्ण पणे जमिनीवरुन संचलित होत असतात. माझा तर समज होता कि ते तेथील परिस्थितीनुरुप स्वतः संचलित होतात. असो. पण माझा समज गैरसमज जे असेल ते असेल पण जर स्वयंचलित असेल तर ते स्वतः ला सावरुन परत उभे राहून कार्यरत होईल.
हो बरोबर आहे सर… पण भविष्यात यात सुधारणा होऊन पुढच्या वेळी आपले यान नक्की यशस्वी होईल अशी आशा आहे.
LikeLike
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
LikeLike
आपली अभिव्यक्ती छान आहे, पण या बाबतीत मला वाटते कि इस्रो असो किंवा नासा, जर लँडर दोन किलोमीटर उंचीवरून आदळणे असेल तर त्याच्या बहुतेक यंत्रणा भ्रष्ट झाले असाव्यात. दुसरे म्हणजे असे कि वजना मुळे आणि अतिशय कमी जागेमुळे, फार प्रगत प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रणेला पहिल्याच प्रकल्पात वापरणे शक्य झाले नसेल. पण आपण म्हणता त्याप्रमाणे पुढील मोहिमांमध्ये हे शक्य होऊ शकते.
LikeLike
धन्यवाद सर. मध्यंतरी एक व्हिडिओ वायरल झाला होता. त्यात लँडिंग दाखविले होते. मला वाटते त्यांनी अचानक कोसळण्याबाबत विचार केला असावा व ते आदळून निकामी होऊ नये अशी यंत्रणा असावी.
भविष्यात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स चा वापर होईल अशी खात्री वाटते सर.
LikeLike