आम्ही स्मॉर्ट


आश्चर्य झाला असेल न शिर्षक पाहिल्यावर. अहो, या म्हातारपणी कसला आलाय स्मॉर्टनेस, आता फक्त धोतर नेस नो पेंटशर्ट. म्हणजे साधी राहणी हो. या शहरांमध्ये कसलं आलय धोतर आणि नेसत कोणाला येत? माझे वडील धोतर नेसत व्हते बुवा! मी कधी प्रयत्न ही करून पाहिला नाही.

जाऊ दे ते, अस तुम्ही वैतागून म्हणू नये म्हणून मुळ मुद्दा वर परत येतो. तर येथे “आम्ही” म्हणजे “मी” व माझा “फोन” असा आहे बर का!!

मी सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. ही दोन वर्ष कशी व कधी निघून गेली काही कळलेच नाही. सेवेत असतांना जरा ही उसंत मिळत नव्हती. सतत काम, काम नी काम. अर्थात ऑफिस काम. नौकरी ला लागल्यापासून सौ. ओरडत आहेत पण शेवटी जवाबदारी असतेच न.

मला तर प्रश्न पडला होता कि सेवानिवृत्त झाल्यावर वेळ कसा जाईल? पण गेला. मागील ३-४ महिने तर या माझ्या आजारपणातच गेले.

पण रिकामटेकडा माणूस रिकामा बसून वेडा नाही का होणार? त्यावर मात करण्यासाठी साधनं जी उपलब्ध झाली आहेत!

सर्वात उपयोगी साधन आहे “स्मॉर्ट फोन” . मित्रांनो, ह्या स्मॉर्ट फोनचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो सेवानिवृत्त झालेल्यांना झालाय. दिवस कसा निघून जातो काही कळत नाही.

त्यातल्यात्यात हे व्हाट्सएप जेव्हा पासून आलय व आम्ही त्याला हेंडल करण्यात सरावलो आहे तेव्हा पासून तर दिवस लहान वाटू लागलाय. जितक हे व्हाट्सएप प्रसिद्ध झाल आहे तितके इतर नाही.

मला वाटते पहिल्यांदा २०१० अखेर मी पहिला स्मॉर्ट फोन घेतला. तेव्हा दुकानात हाताळून सुद्धा बघायची हिंमत झाली नव्हती माझी. सोबत कन्या होती. तिने होकार दिला आणि घेतला. काही दिवसांनी हाताळणे जमले.

अहो या स्मॉर्ट फोन व व्हाट्सएपमुळेच तर आज आमच्या साठीमधे आमचे शाळेचे शिक्षक जे आज ७५-८० वयाचे असतील त्यांना भेटणे शक्य झाले आहे. आज आमच्या ग्रुपमध्ये आमचे सर, बालपणीचे वर्गमित्र व शाळेतील इतर मित्र आहेत.

आहोत न आम्ही स्मॉर्ट??☺️☺️😊😊

Advertisements

2 thoughts on “आम्ही स्मॉर्ट

  1. स्मार्ट तुम्ही पूर्वी पासूनच होता कोष्टीजी, तरीही होय, स्मार्टफोनमुळे आपण वाजवीपेक्षा जास्तच स्मार्ट झालो आहोत हे खरे !! अगदी युट्युब वर धोतर कसे नेसावे याचे प्रात्यक्षिक ते ॲटम बॉम्ब कसा बनवावा पर्यंत सर्व काही मिळते. आपण ते काही करत नाही, हो पण ‘खाली दिमाग शैतान का घर’ पेक्षा बरे. नाही काय ?

    • धन्यवाद सर मला लहानपणापासून आतापर्यंत च्या संपूर्ण आयुष्यासाठी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. मनःपूर्वक आभार सर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s