तो आता दिवाळीचे फराळ खाऊनच जाणार. किंवा फटाके फोडून जाणार. आणखी काय काय? अरे बहिणीने ओवाळून सुद्धा झालं न आता. फराळ ही संपला आणि दिवाळी ही संपली. पण तो अजून चिपकून बसला आहे.
काय? कोण तो? असे विचारताय का? ओळखा तुम्हीच! नाही ओळखत! असू दे ! आता तुम्हाला वेळ कुठे आहे रिकामी कामे करायला! आम्ही आपले रिकामटेकडे. काही तरी उद्योग करत असतो.
चला मीच सांगतो. अहो!😊दिवाळी झाली, भाऊबीज झाली, फराळ ही संपला पण तो काही केल्या जायला तयार नाही.
काल संध्याकाळी मी चक्क पावसात भिजलो. जोरदार पाऊस अचानक सुरू झाला. रस्ता ओलांडत होतो. अर्धा पार केला आणि पाऊस सुरु. ट्राफिक तर विचारू नका. रस्त्यावर उभ्या उभ्या भिजलो हो. 😢. काल रात्रभर पाऊस होता.