💫💥✨🎁💥💰💫💥
पणत्या सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन
डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह
घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर
आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह
आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा…
“मी आणि माझ्या कुटुंबियांकडून आपणा सर्वांना दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा “
💫💥✨💫💥✨💫💥✨💫
अप्रतिम, तुम्हाला सुद्धा दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.
LikeLike
मनःपूर्वक धन्यवाद सर.
LikeLike